Lokmat Sakhi >Beauty > चहाचं पाणी 'या' पद्धतीने वापरून केस धुवून तर पाहा! केसांच्या सगळ्या समस्या होतील छुमंतर..

चहाचं पाणी 'या' पद्धतीने वापरून केस धुवून तर पाहा! केसांच्या सगळ्या समस्या होतील छुमंतर..

Use of Tea Water For Hair Wash: चहाचं पाणी तुमच्या रुक्ष, कोरड्या केसांवर काय जादू करतं ते एकदा बघाच..(benefits of tea water for hair)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2025 16:13 IST2025-08-26T16:12:28+5:302025-08-26T16:13:07+5:30

Use of Tea Water For Hair Wash: चहाचं पाणी तुमच्या रुक्ष, कोरड्या केसांवर काय जादू करतं ते एकदा बघाच..(benefits of tea water for hair)

use of tea water for hair wash, benefits of tea water for hair, home made solution for fast hair growth and smooth and silky hair  | चहाचं पाणी 'या' पद्धतीने वापरून केस धुवून तर पाहा! केसांच्या सगळ्या समस्या होतील छुमंतर..

चहाचं पाणी 'या' पद्धतीने वापरून केस धुवून तर पाहा! केसांच्या सगळ्या समस्या होतील छुमंतर..

Highlights काही दिवस हा उपाय नियमितपणे केल्यास तुमच्या केसांच्या तक्रारी बऱ्याच कमी होतील.

हल्ली केसांच्या समस्या खूप जास्त वाढल्या आहेत. कोणाचे केस कमी वयातच पांढरे होत आहेत तर कोणाच्या केसांमध्ये खूपच जास्त कोंडा आहे. काही जणींचे केस खूप लांब असतात. पण त्यांच्या केसांवर अजिबातच चमक नसते. अगदी राठ, कोरडे झालेले दिसतात. शिवाय काही जणींच्या केसांना वाढच नसते. बहुसंख्य लोकांना छळणारी आणखी एक समस्या म्हणजे केस गळणे. रोजच्यारोजच केस एवढे जास्त गळतात की काही दिवसांतच डोक्याला टक्कल पडतंय की काय अशी भीती वाटू लागते (home made solution for fast hair growth and smooth and silky hair). तुम्हालाही केसांच्या या सगळ्या समस्या छळत असतील तर हा एक सोपा घरगुती उपाय लगेच करून पाहा (Use of Tea Water For Hair Wash). एक खास पद्धत वापरून चहाच्या पाण्याने केस धुवा. (benefits of tea water for hair)

 

चहाच्या पाण्याने केस धुण्याचे फायदे

चहाच्या पाण्याने केस कसे धुवायचे आणि त्याचे नेमके काय फायदे होतात ते आता पाहूया.. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी १ ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये २ चमचे चहा पावडर घाला. आता हे पाणी गॅसवर गरम करायला ठेवा. ते उकळून अर्धं झालं की मग गॅस बंद करा. 

१० दिवस उत्तम टिकणाऱ्या स्वादिष्ट खिरापतीची खास रेसिपी- खिरापत खाऊन सगळेच होतील खुश

आता हे चहाचं पाणी थंड होऊ द्या. त्या पाण्यामध्ये १ चमचा ॲलोव्हेरा जेल, १ चमचा कॉफी पावडर आणि आणि तुमचा नेहमीचा शाम्पू घाला. केस धुण्यासाठी तुम्ही दरवेळी जेवढा शाम्पू घेता साधारण तेवढाच शाम्पू यासाठी वापरावा.

 

आता सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या. यानंतर केस ओले करा आणि वरील पद्धतीने तयार केलेल्या पाण्याचा वापर करून केस धुवा. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्यास अगदी महिना भरातच केसांवर खूप छान परिणाम दिसून येईल.

गणेशोत्सव: तळणीच्या मोदकासाठी परफेक्ट सारण कसं करायचं? घ्या रेसिपी- मोदक होतील खमंग, चवदार

चहा पावडर, कॉफी पावडर, ॲलोव्हेरा जेल यांच्या एकत्रित वापरामुळे केसांची मुळं पक्की होण्यास मदत होते. त्यामुळे केस गळणं कमी होतं आणि त्यांची वाढही चांगली होते. ॲलोव्हेरा जेलमुळे केस मऊ, सिल्की होतात तर कॉफीमुळे केसांवर छान चमक येते. 


 

Web Title: use of tea water for hair wash, benefits of tea water for hair, home made solution for fast hair growth and smooth and silky hair 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.