सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने बाजारात भरपूर प्रमाणात आवळे विकायला आलेले आहेत. पुढे काही दिवस आवळे असतील आणि त्यानंतर आवळ्याचा हंगाम संपतो. म्हणूनच सध्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या आवळ्यांचा उपयोग तुमच्या केसांसाठी आणि त्वचेसाठी करून घ्या. केसांना व्यवस्थित पोषण न मिळाल्याने तसेच हार्मोन्सचं संतुलन बिघडल्यामुळे केस गळतात. या दोन्ही समस्यांचं एकच उत्तर हवं असेल तर ते म्हणजे आवळा (how to make amla juice?). केस गळणं कमी करण्यासाठी आणि केसांची चांगली वाढ व्हावी यासाठी आवळ्याचा वापर कसा करायचा ते पाहा...(use of aavla for skin and hair)
केस गळणं कमी होण्यासाठी आवळा कशा पद्धतीने खावा?
हा उपाय करण्यासाठी साधारण ८ ते १० आवळे घ्या. आवळ्यांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे केसांसाठी तसेच त्वचेसाठी आवळा अतिशय उपयुक्त आहे. आवळ्याचे बारीक काप करून त्याच्यातल्या बिया काढून टाका.
महिलांचं डोकं जास्त चालतं की पुरुषांचं? तुम्हाला काय वाटतं? ९० टक्के लोकांचं उत्तर चुकलंय...
यानंतर कडिपत्त्याची मुठभर पाने स्वच्छ धुवून घ्या. २ टेबलस्पून आल्याचे बारीक तुकडे आणि अर्धा चमचा काळे मिरे हे देखील आपल्याला वापरायचे आहेत. हे सगळे पदार्थ थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. त्यानंतर ते पाणी गाळून घ्या.
गाळून घेतलेलं पाणी आईस ट्रेमध्ये भरून ठेवा आणि त्याचे बर्फ तयार करून घ्या. यानंतर रोज सकाळी १ ग्लास गरम पाणी घ्या. त्या पाण्यात तयार केलेले एकेक आईस क्यूब घाला आणि रोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्ता झाल्यानंतर हे पाणी पिऊन घ्या.
व्हिटॅमिन बी १२ वाढण्यासाठी २ घरगुती शाकाहारी पदार्थ- बी १२ ची कमतरता भरून काढणारे साधेसोपे उपाय
हे पाणी नियमितपणे प्यायल्यास शरीरातील हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते. त्याचा खूप चांगला परिणाम केसांवर आणि त्वचेवर दिसून येतो, अशी माहिती chhaya_sharma87 या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
