Join us
Daily Top 2Weekly Top 5

रखरखीत केस होतील सिल्की, चमकदार- आठवड्यातून फक्त एकदा 'हा' उपाय करा, केस राहतील काळेभोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2025 15:45 IST

Home Hacks For Silky And Shiny Hair: थंडीमुळे केस कोरडे झाले असतील तर पुढे सांगितलेला एक घरगुती उपाय करून पाहा..(use of aloe vera for silky hair)

ठळक मुद्देकोरफड, रोजमेरी ऑईल आणि मेथ्या यांच्या गुणधर्मामुळे केस गळणं कमी होऊन त्यांची चांगली वाढही होईल. 

हिवाळ्याच्या दिवसांत केसांची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. कारण या दिवसांत त्वचा कोरडी पडते. त्यामुळे स्काल्प म्हणजेच डोक्याची त्वचाही कोरडी होते. त्यामुळे मग डोक्यामध्ये काेंडा होण्याचे प्रमाण वाढते. डोक्यातला कोंडा वाढला की मग केस गळण्याचे प्रमाणही वाढते. केस कोरडे आणि रफ व्हायला लागतात. हिवाळ्यात उद्भवणाऱ्या केसांच्या या समस्या कमी करायच्या असतील तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय लगेचच करून पाहा (use of aloe vera for silky hair). हा उपाय केल्याने केसांवर छान चमक येऊन ते खूप सुळसुळीत, सिल्की होतील आणि काळेभोर राहतील.(how to use aloe vera on dry hair)

 

कोरडे केस सिल्की, चमकदार होण्यासाठी उपाय

केस कोरडे झाले असतील तर हा घरगुती उपाय तुम्हाला नक्कीच खूप उपयोगी ठरू शकतो. हा उपाय आठवड्यातून फक्त एकदा करा. केसांवर लगेचच खूप छान परिणाम दिसून येईल.

सॅलाड म्हणून 'या' भाज्या कधीही कच्च्या खाऊ नका- पोटाला त्रास होऊन तब्येत बिघडेल

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी कोरफडीचं एक ताजं पान तोडून घ्या. तोडल्यानंतर १० ते १५ मिनिटे तसंच राहू द्या. त्यानंतर त्यातून पिवळा पदार्थ बाहेर पडून गेल्यानंतर ते स्वच्छ धुवा. धुतल्यानंतर पान मधोमध उभं कापून कोरफडीचा गर काढून घ्या. 

 

आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कोरफडीचा गर, पाण्यात ८ ते १० तास भिजवलेल्या चमचाभर मेथ्या, एक चमचा गुलाबजल, ६ ते ७ थेंब रोजमेरी ऑईल असं सगळं घाला आणि सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या.

रकुलप्रित सिंगचं साधं- सोपं स्किनकेअर रुटीन! त्वचेसाठी केळी आणि दह्याचा 'असा' करते मस्त वापर

यानंतर हा लेप केसांच्या मुळांपासून ते शेवटच्या टोकांपर्यंत लावा. त्यानंतर अर्धा ते पाऊण तासाने एकदा सल्फेट फ्री माईल्ड शाम्पू वापरून केस धुवून टाका. केसांना खूप मऊपणा येईल आणि ते छान चमकदार दिसतील. कोरफड, रोजमेरी ऑईल आणि मेथ्या यांच्या गुणधर्मामुळे केस गळणं कमी होऊन त्यांची चांगली वाढही होईल. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Silky, shiny hair: Use this remedy once a week for black hair.

Web Summary : Combat dry winter hair with this simple aloe vera remedy. It adds shine, makes hair silky, and promotes growth. Apply a paste of aloe vera, fenugreek, rose water, and rosemary oil. Wash off after an hour with mild shampoo.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीथंडीत त्वचेची काळजीहोम रेमेडी