मेकअप कितीही चांगला असला तरीही जोपर्यंत आपले केस छान सेट झालेले नसतील, तोपर्यंत आपले सौंदर्य खुलत नाही. म्हणूनच तर जेव्हा महत्त्वाचा कार्यक्रम असतो, कसली पार्टी असते किंवा मग मस्त आऊटिंग, शॉपिंग, हॉटेलिंग असं ठरलेलं असतं, तेव्हा आपण सगळ्यात आधी हेअरवॉश करत असतो. पण बऱ्याचदा असंही होतं की काही- काही कार्यक्रम खूपच अर्जंट ठरतात. मग अगदी केस धुण्याइतका वेळही आपल्याजवळ नसतो. मग अशावेळी आपला नाईलाज होतो आणि तसेच चिपचिपित केस घेऊन आपण घराबाहेर पडतो. म्हणूनच तर आता पुन्हा जर अशी काही अर्जंट बाहेर जाण्याची वेळ आली तर केस न धुताही ते कसे छान सेट करायचे, याचा एक सोपा उपाय जाणून घ्या.
ऑईली केस सिल्की कसे करायचे?हा उपाय घरातल्या घरात आणि अगदीच कमी वेळेत म्हणजेच केवळ अवघ्या काही मिनिटात करता येतो. यासाठी आपल्याला लागणार आहे फक्त एक बेबी पावडर. सगळ्यात आधी तर केसांचा मधून भांग पाडून घ्या आणि त्या भागावर बेबी पावडर टाका. यानंतर असेच केसाचे वेगवेगळे भांग पाडून घ्या आणि त्या भांगामध्ये पावडर टाका. यानंतर आता बोटांच्या टोकाने हलक्या हाताने डोक्याला मालिश करा. मालिश करताना अवघ्या काही मिनिटांतच केसांवर दिसून येणारी पावडर हळूहळू नाहीशी होत जाईल आणि केस मोकळे- मोकळे होतील. यानंतर तुम्हाला जशी पाहिजे तशी हेअरस्टाईल करा आणि बाहेर जाण्यासाठी झटपट तयार व्हा.
ही काळजी घ्या....- हा उपाय करताना कोणतेही केमिकल्स नसणारी लहान मुलांची बेबी पावडर वापरावी.- केसांच्या मुळांना मालिश करताना हळूवार हाताने करावी.- केसांचा चिपचिपितपणा घालविण्यासाठी हा काही कायमस्वरूपी उपाय नाही. त्यामुळे महिन्यातून एकदा हा उपाय करायला हरकत नाही. पण त्याचा अतिरेक टाळावा.