Lokmat Sakhi >Beauty > उर्फी जावेदनं केलेली फिलर सर्जरी काय असते? धोका आणि परिणाम काय होतात, डॉक्टर सांगतात..

उर्फी जावेदनं केलेली फिलर सर्जरी काय असते? धोका आणि परिणाम काय होतात, डॉक्टर सांगतात..

skin fillers explained: celebrity cosmetic procedures : Urfi Javed filler surgery: फिलर सर्जरी केल्याने उर्फीचा चेहरा दिसतोय खराब, नेमकं झालं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2025 12:40 IST2025-07-28T12:39:43+5:302025-07-28T12:40:30+5:30

skin fillers explained: celebrity cosmetic procedures : Urfi Javed filler surgery: फिलर सर्जरी केल्याने उर्फीचा चेहरा दिसतोय खराब, नेमकं झालं काय?

Urfi Javed lips filler surgery what is dermal filler treatment side effects cosmetic surgery risks | उर्फी जावेदनं केलेली फिलर सर्जरी काय असते? धोका आणि परिणाम काय होतात, डॉक्टर सांगतात..

उर्फी जावेदनं केलेली फिलर सर्जरी काय असते? धोका आणि परिणाम काय होतात, डॉक्टर सांगतात..

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली आहे.(Urfi Javed) कुणी केसांची, कुणी नाकाची तर कुणी चेहऱ्याची अशा डोक्याच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत अनेक सर्जरी करता येतात.(Urfi Javed filler surgerब) पण या सर्जरी नेहमीच यशस्वी होतील असं नाही. काही ब्युटी ट्रिटमेंट्समुळे चेहरा सुंदर होण्याऐवजी तो अधिकच खराब दिसू लागतो.(what is dermal filler ) सध्या उर्फी जावेदच्या अशाच एका फसलेल्या सर्जरीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. (filler treatment side effects)
उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या फॅशनच्या अंतरगीपणामुळे ट्रोल होत असते. पण अनेकदा तिला तिच्या ओठांवरुन देखील ट्रोल करण्यात आलं. अलकडीचे तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला.(cosmetic surgery risks) त्यात तिचा चेहरा बऱ्यापैकी सुजलेला दिसत होता. तिने सांगितलं की, काही दिवसांपूर्वी ओठांचा आकार वाढवण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी केली होती. पण ही सर्जरी फसली आणि तिचे ओठ आणि चेहरा सुजला.(Urfi Javed transformation) उर्फी म्हणते हे फिलर्स योग्यप्रकारे लावण्यात आले नव्हते, त्यामुळे मी हे फिलर्स काढण्याचा निर्णय घेतला. या सर्जरीसाठी किती खर्च करावा लागतो?, याचा परिणाम कसा होतो? जाणून घेऊया. 

केसांना फाटे फुटले- कोरडे झाले? घरीच करा बोटॉक्स, सोपी ट्रिक- खराट्यासारखे केस होतील मऊ-सुळसुळीत

त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुपमा रामपाल यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणतात. फिलर्समध्ये हायलूरॉनिक अॅसिडचे अणू असतात. जे शरीराच्या कोणत्याही भागात इंजेक्शनद्वारे आपण घालू शकतो. इतकंच नाही तर आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या हे हायलूरॉनिक अॅसिड असतं. याचं मुख्य काम पाणी शोषून घेण्याचे असतं. ज्यामुळे त्वचा मुलायम, नितळ आणि तजेलदार राहते. डॉक्टर म्हणतात शरीरातील जो भाग आपल्याला जाड किंवा भरलेला हवा असतो. त्या भागात हायलूरॉनिक अॅसिड इंजेक्शनद्वारे टाकले जाते. चेहऱ्याच्या बाबतीत सर्वसाधारणपणे गाल, ओठ, नाक, डोळ्यांच्या खालच्या बाजूला, जॉ लाइन आणि हनुवटीमध्ये हे फिलर्स टाकता येतात. 

त्वचेवर येईल तेज! स्वयंपाकघरातील ३ पदार्थांनी करा चेहरा स्वच्छ, पिंपल्स- सुरकुत्यांचा त्रास होईल कमी

या शस्त्रक्रियेला जवळपास दोन तास लागतात असं डॉक्टरांचे मत आहे. ज्या जागेवर इंजेक्शन द्यायचे आहे त्याला क्रीम लावून बधीर केले जाते. त्यानंतर ते फिलर इंजेक्ट केलं जातं. या शस्त्रक्रियेसाठी साधरणत: २५ हजार ते ३५ हजार रुपये खर्च येतो. याचा प्रभाव जास्तीत जास्त सहा महिने ते वर्षभरापर्यंत राहतो. जर हे इंजेक्शन प्रोफेशनलशिवाय किंवा काळजी न घेता दिल्यास चेहरा कुरुप दिसू शकतो. जर हे फिलर ओठांमध्ये टाकण्यात आलं तर ते ओठांच्या वरच्या बाजूला पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे ओठ विचित्र दिसू लागतात. यामध्ये ओठ किंवा चेहरा खराब दिसू लागला तर शस्त्रक्रिया रिव्हर्सदेखील केली जाते. इंजेक्शनचा दुष्परिणाम झाल्यास जागा निळी पडते, लाल होते, सूज येते, वेदना होतात आणि खाज येऊ लागते.  

Web Title: Urfi Javed lips filler surgery what is dermal filler treatment side effects cosmetic surgery risks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.