'उर्फी जावेद' नाव जितकं चित्रविचित्र तितकीच तिची फॅशन, स्टाईल आणि कपडे देखील विचित्रचं. उर्फी कायमच तिच्या आगळ्यावेगळ्या फॅशन सेन्समुळे नेहमी चर्चेत असते. तिचा बोल्ड अंदाज आणि अनोखी स्टाईल स्टेटमेंट अनेकदा लोकांचे लक्ष वेधून घेते. परंतु, आता उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या एका नव्या ट्रीटमेंटमुळे (Urfi Javed Removed Sweat Smell From Her Armpits With Help Of Botox Know Fact As Per Expert) चर्चेत आली आहे. नुकतेच तिने तिच्या ओठांचे (Uorfi Javed reveals her armpits don’t smell) लीप फिलर्स काढून टाकल्याने तिचे ओठ पुन्हा पहिल्यासारखे नॉर्मल दिसू लागले आहेत. परंतु यासोबतच, तिने चक्क काखेत घाम येऊच नये म्हणून अंडरआर्म्स बोटॉक्स ट्रिटमेंट करुन घेतली आहे(Uorfi Javed sweat free underarms).
घामाच्या समस्येने अनेकजण फारच हैराण होतात, विशेषतः काखेतून येणाऱ्या घामामुळे खूप त्रास होतो. यामुळे फक्त कपड्यांवर डागच पडत नाही, तर त्यातून दुर्गंधीही येऊ लागते. पण आता या समस्येवर एक खास उपाय उपलब्ध आहे. उर्फीने बॉटॉक्स (Botox) इंजेक्शन्सच्या माध्यमातून ही ट्रीटमेंट करून घेतली आहे. तिने स्वतःच सोशल मिडियावर याबद्दल माहिती दिली. उर्फी सांगते काखेत घाम येऊच नये याउलट कायम एक मंद सुगंध येत राहावा, यासाठी तिने खास अंडरआर्म्स बोटॉक्स ट्रिटमेंट करून घेतली आहे. काखेतला (Uorfi Javed armpit smell solution) घाम कायमचा थांबवणारी ही बॉटॉक्स ट्रिटमेंट म्हणजे नेमकं आहे तरी काय? ही ट्रिटमेंट करुन घेणं नक्की फायदेशीर आहे का ? यांबद्दल कॉस्मेटोलॉजिस्ट नेमकं काय सांगतात ते पाहूयात...
काखेत घाम व घामाची दुर्गंधी येऊच नये म्हणून उर्फीने केला खास उपाय...
काखेत जास्त घाम येणे आणि त्यामुळे येणाऱ्या दुर्गंधीच्या समस्येवर बोटॉक्स ट्रिटमेंटचा उपाय फायदेशीर ठरतो. याला वैद्यकीय भाषेत अॅक्सिलरी हायपरहायड्रोसिस (Axillary Hyperhidrosis) असे म्हणतात. नुकतीच, फॅशन इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री उर्फी जावेदने तिच्या काखेतून घामाची दुर्गंधी का येत नाही, याबद्दल खुलासा केला.
मेहेंदी लावूनही केसांना रंग येत नाही? 'या' खास ट्रिकने भिजवा मेहेंदी - येईल सुंदर रंग...
Mashable India ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "माझ्या काखेतून घामाचा वास येत नाही, कारण मी बोटॉक्स (Botox) ट्रीटमेंट घेतली आहे. या ट्रिटमेंटमुळे काखेत घाम येतच नाही त्यामुळे घामाची दुर्गंधी येण्याचा प्रश्नच येत नाही." उर्फीने सांगितलेल्या या उपायामुळे अनेकांना आश्चर्य वाटले. कारण बोटॉक्सचा उपयोग सामान्यतः चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी केला जातो. पण वैद्यकीय क्षेत्रात बोटॉक्सचा उपयोग काखेतून येणाऱ्या घामावर उपचार म्हणून देखील केला जातो.
अंडरआर्म्स बोटॉक्स (Axillary Botox) म्हणजे काय?
अंडरआर्म्स बोटॉक्स (Botox) हे क्लोस्ट्रिडियम बोट्युलिनम (Clostridium botulinum) नावाच्या जीवाणूपासून तयार केलेले शुद्ध प्रोटीन आहे. जेव्हा हे प्रोटीन काखेत इंजेक्ट केले जाते, तेव्हा ते घामाच्या ग्रंथींना उत्तेजित करणाऱ्या घटकांना तात्पुरते थांबवते. यामुळे, घामाचे उत्पादन प्रचंड प्रमाणांत कमी होते. या उपचाराचा परिणाम अनेक महिन्यांपर्यंत टिकतो, ज्यामुळे काखेतून येणाऱ्या घामाच्या समस्येपासून आराम मिळतो. थोडक्यात, बोटॉक्स थेट दुर्गंधी थांबवत नसले तरी, घामाचे प्रमाण कमी करून अप्रत्यक्षपणे दुर्गंधी कमी करण्यास मदत करते.
बोटॉक्स ट्रिटमेंटमुळे काखेतली दुर्गंधी थांबते का?
बोटॉक्सचा उपयोग फक्त चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठीच नाही, तर इतर अनेक उपचारांसाठीही केला जातो, ज्यात काखेतून येणाऱ्या घामावर नियंत्रण मिळवणे (Axillary Hyperhidrosis) यावर देखील एक खास ट्रिटमेंट आहे. याबद्दल इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत नवी दिल्ली येथील सौंदर्य चिकित्सक, कॉस्मेटोलॉजिस्ट आणि त्वचा विशेषतज्ज्ञ डॉ. करुणा मल्होत्रा यांनी सांगितले की, "बोटॉक्स थेट घामाच्या वासाला थांबवत नाही. मात्र, ते काखेतून बाहेर पडणाऱ्या घामाचे प्रमाण कमी करते. जेव्हा घाम कमी येतो, तेव्हा त्वचेवरील बॅक्टेरियांची वाढ आणि त्यांची क्रियाशीलता देखील कमी होते, ज्यामुळे घामाच्या दुर्गंधीचे प्रमाण आपोआप कमी होते."