Lokmat Sakhi >Beauty > ९ वर्षांनंतर उर्फी जावेदने काढले लिप फिलर्स आणि चेहरा सुजला भप्प, दिसतंय विचित्रच कारण...

९ वर्षांनंतर उर्फी जावेदने काढले लिप फिलर्स आणि चेहरा सुजला भप्प, दिसतंय विचित्रच कारण...

Urfi Javed gets lip filler dissolved : Uorfi Javed's filler dissolving procedure to fix misaligned lips leaves her face painfully swollen and red : Why did Uorfi Javed get her lip fillers dissolved : Uorfi Javed gets her lip fillers dissolved after 9 years, shares pictures of her swollen face : सुजलेले ओठ, बदलेला चेहरा! उर्फीला नेमकं झालं काय? सुंदर दिसण्याच्या नादात ब्यूटी ट्रिटमेंटने केला घात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2025 18:33 IST2025-07-21T18:31:27+5:302025-07-21T18:33:16+5:30

Urfi Javed gets lip filler dissolved : Uorfi Javed's filler dissolving procedure to fix misaligned lips leaves her face painfully swollen and red : Why did Uorfi Javed get her lip fillers dissolved : Uorfi Javed gets her lip fillers dissolved after 9 years, shares pictures of her swollen face : सुजलेले ओठ, बदलेला चेहरा! उर्फीला नेमकं झालं काय? सुंदर दिसण्याच्या नादात ब्यूटी ट्रिटमेंटने केला घात...

Uorfi Javed gets her lip fillers dissolved after 9 years, shares pictures of her swollen face Urfi Javed gets lip filler dissolved Uorfi Javed's filler dissolving procedure to fix misaligned lips leaves her face painfully swollen and red | ९ वर्षांनंतर उर्फी जावेदने काढले लिप फिलर्स आणि चेहरा सुजला भप्प, दिसतंय विचित्रच कारण...

९ वर्षांनंतर उर्फी जावेदने काढले लिप फिलर्स आणि चेहरा सुजला भप्प, दिसतंय विचित्रच कारण...

सुंदर दिसण्यासाठी सेलिब्रिटीज, बॉलिवूड अभिनेत्री नक्की काय-काय करतील याचा अंदाज लावणे जरा कठीणच. आत्तापर्यंत अनेक अभिनेत्रींनी सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या (Urfi Javed gets lip filler dissolved) प्रकारच्या सर्जरी किंवा महागड्या ब्यूटी ट्रिटमेंट्स केल्याचे ऐकले असेल. कुणी ओठांची तर कुणी नाकाची अशा केसांपासून पायांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरी केल्या जातात.यातही काहीजणींच्या सर्जरी, महागामोलाच्या (Uorfi Javed's filler dissolving procedure to fix misaligned lips leaves her face painfully swollen and red) ब्यूटी ट्रिटमेंट्स यशस्वी झाल्या तर काहींच्या फसल्याच. या सर्जरीमुळे (Why did Uorfi Javed get her lip fillers dissolved) अनेकजणींच सौंदर्य खुलुन रुपच पालटून गेलं तर काहीजणींच नैसर्गिक सौंदर्य गमावून फजितीच झाली. सध्या उर्फी जावेदच्या अशाच एका फसलेल्या ओठांच्या सर्जरीची जोरदार चर्चा सुरु आहे(Uorfi Javed gets her lip fillers dissolved after 9 years, shares pictures of her swollen face).

उर्फी जावेद तिच्या फॅशनसोबतच स्किन केअर आणि कॉस्मेटिक ट्रिटमेंटबाबतही नेहमीच सोशल मीडियावर बोलताना दिसते. तिने यापूर्वी लिप फिलर्स घेतल्याचं स्वतः उघडपणे कबूल केलं होतं, ज्यामुळे तिच्या ओठांचा आकार मोठा आणि अधिक उठावदार दिसत होता. काही काळापूर्वी उर्फीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यात तिने लिप फिलर्समुळे झालेल्या त्रासाबद्दल सांगितलं होतं. आता पुन्हा एकदा उर्फीने असाच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती लिप फिलर्स डिझॉल्व केल्याचे दिसत आहे. उर्फी जावेदने असे केल्यामुळे सध्या लिप फिलर्स चांगले की वाईट अशी चर्चा सुरु आहे. 

उर्फी ने लिप फिलर्स काढण्याचा निर्णय का घेतला ? 

उर्फी जावेदच्या ओठांचा आकार मोठा आणि अधिक उठावदार असल्याने कायमच तिच्यावर टीका आणि ट्रोल केले जायचे. परंतु तिने ओठांवरील लिप फिलर्स काढल्यावर तिचे सोशल मीडियावर नेटकरी कौतुक करताना दिसत आहेत. आता उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो खूपच वेदनादायक आहे, यामध्ये ती ९ वर्षांनी तिचे लिप फिलर काढताना दिसत आहे. पण या प्रक्रियेदरम्यान तिच्या ओठांची स्थिती खूपच वाईट झालेली दिसतेय. तिचे सुजलेले ओठ पाहून युजर्स हैराण होत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं – "नाही, हा कोणताही फिल्टर नाही आहे. मी लिप फिलर्स काढून  निर्णय घेतलाय कारण ते माझ्यासाठी खूपच त्रासदायक होत आहेत". 

गुडघेदुखीचा त्रास-सांध्यांतून कट-कट आवाज येतो? डॉक्टर सांगतात ५ उपाय - दुखणे होईल कमी...

लिप फिलर चांगले की वाईट ?

लिप फिलर्स ही सुंदर दिसण्यासाठी वापरली जाणारी एक कॉस्मेटिक ट्रीटमेंट आहे. हे तसं सुरक्षित मानलं जातं, पण फक्त अनुभवी आणि सर्टिफाईड डॉक्टरांकडूनच करून घ्यावं. चुकीच्या पद्धतीनं किंवा अयोग्य प्रमाणात करून घेतल्यास याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. लिप फिलर्स चुकीच्या पद्धतीने केल्यास ओठ गरजेपेक्षा जास्त सुजणं, इंजेक्शनच्या ठिकाणी चट्टे, लालसरपणा किंवा सूज येणे, ओठ अत्यंत संवेदनशील होणे, दुखणं किंवा जळजळ होणे, ओठांचा नैसर्गिक शेप बिघडणं, काहीवेळा फिलर्स हलू लागतात, त्यामुळे ओठ वाकडे किंवा असमान दिसू शकतात. फिलर्समुळे फंगल, बॅक्टेरियल इंफेक्शन होण्याचा धोका असतो. काहीवेळा धमनी ब्लॉकेज, टिशू डॅमेज किंवा ओठांवर गाठ तयार होणं यासारख्या गंभीर समस्या देखील निर्माण होऊ शकतात. 

आईबाबांसह घरात वडिलधाऱ्यांना असेल डायबिटिस तर मुलांना लावा ४ सवयी, मुलांचा लठ्ठपणा धोकादायक...

लिप फिलर्सची किंमत किती असते ? 

भारताच्या विविध शहरांमध्ये आणि त्या शहरांतील वेगवेगळ्या क्लिनिक्समध्ये लिप फिलर्सची किंमत वेगवेगळी असते. याची सुरुवात साधारणतः १८ हजार रुपये पासून होते आणि काही ठिकाणी हे दर ४० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात. बेसिक प्रोसीजरसाठी १८ हजार रुपये खर्च येतो, तर मोठ्या प्रमाणावर फिलर्स हवे असल्यास त्याची किंमत ४० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. याशिवाय अनेकदा हे दर सेशन्सवरही अवलंबून असतात.

मिठाच्या पाण्यानं चेहरा धुवा-बघा तुमच्या चेहऱ्यावरचं वाढणारं तेज! चवीपुरतं मीठ बदलून टाकेल रुप...

उर्फी जावेदच्या या धाडसी निर्णयाचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. माझ्या अनुभवातून इतरांनीही योग्य तो विचार करून सौंदर्य उपचार घ्यावेत, असा संदेश ती देताना दिसते.

Web Title: Uorfi Javed gets her lip fillers dissolved after 9 years, shares pictures of her swollen face Urfi Javed gets lip filler dissolved Uorfi Javed's filler dissolving procedure to fix misaligned lips leaves her face painfully swollen and red

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.