केस आपले सौंदर्य अधिक खुलून दिसण्यात भर पाडतात. प्रत्येकीला आपले केस छान, सुंदर, काळेभोर आणि आपल्याला शोभून दिसतील असेच असावे असं वाटत. आपल्यापैकी (Try this hack to find out your perfect hair length) काहीजणींना मोठे, लांबसडक केस आवडतात तर काहींना छोटे केस आवडतात. पण नेमकं आपल्याला कोणत्या प्रकारचे केस शोभून (What length hair suits your face) दिसतील हे अनेकींना माहीतच नसते(How to Figure Out Short Hair Will Look Good or long hair Will Look Good).
काहीवेळा तर अनेकजणी अशा द्विधा मनस्थितीत असतात की केस वाढवायचे की छोटेच राहू द्यावेत. खरंतर, आपल्या चेहऱ्याची ठेवणं आणि चेहऱ्याचा आकार यावरून आपल्याला लांब केस चांगले दिसतील की शॉर्ट हे ठरत असते. चेहरापट्टीनुसार, जर तुम्ही केस लांब ठेवायचे की शॉर्ट हे ठरवलं तर तुमचे व्यक्तिमत्व अधिकच खुलून दिसण्यास मदत होऊ शकते. आपल्याला लांब केस चांगले दिसतील की शॉर्ट हे ओळखण्यासाठी आपण घरच्याघरीच एक साधीसोपी ट्रिक नक्की ट्राय करून पाहू शकतो(What hair length suits your face shape).
तुम्हाला लांब केस सूट होतील की शॉर्ट हे कसे ओळखावे ?
आपल्याला लांब केस सूट होतील की शॉर्ट हे ठरवण्यासाठीची खास ट्रिक aashistyling या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ही ट्रिक करण्यासाठी तुम्हांला फक्त दोन पेन आणि एका पट्टीची गरज लागणार आहे. आता नेमकं करायचं काय ते पाहूयात.
खोबरेल तेलात मिसळा फक्त 'हे' ३ पदार्थ, चेहऱ्यावर कधीच दिसणार नाहीत एजिंगच्या खुणा...
सगळ्यांत आधी एक पेन घेऊन ते आपल्या कानाच्या बरोबर मागे उभे धरावे. (कानाच्या पाळीला पेनाचे टोकं चिकटवून उभे धरावे. ज्या भागात आपण कानातले घालतो ज्या भागात पेनाचे टोकं येईल असे पाहावे.) त्यानंतर, दुसरे पेन हातात आडवे धरून ते बरोबर आपल्या हनुवटीला चिकटेल असे आडवे धरावे. आता ही दोन्ही पेनं एकमेकांना जिथे छेद देतात त्या भागावर एक खूण करावी.
घामामुळे टिकली सतत कपाळावरुन पडते? ६ टिप्स, टिकली पडणार नाही, पुरळ पण येणार नाही...
मग एक पट्टी घेऊन खूण केलेल्या भागापासून वर संपूर्ण पेनाची लांबी मोजावी. जर लांबी २.५ इंचांपेक्षा जास्त असेल, तर लहान केस तुमच्यावर चांगले दिसतील आणि जर २.५ इंचांपेक्षा कमी असेल, तर लांब केस तुमच्यावर चांगले दिसतील. अशाप्रकारे, तुम्ही दोन पेनांच्या मदतीने अगदी काही सेकंदातच ठरवू शकता की तुम्हाला कोणत्या प्रकारचे केस अधिक जास्त चांगले दिसतील.