Lokmat Sakhi >Beauty > जास्वंदीच्या पानाफुलांचा हेअर मास्क पावसाळ्यात करतो केसांवर जादू, कोरडे-राठ केस होतात मऊमऊ सुंदर...

जास्वंदीच्या पानाफुलांचा हेअर मास्क पावसाळ्यात करतो केसांवर जादू, कोरडे-राठ केस होतात मऊमऊ सुंदर...

Try this ancient Ayurvedic Hibiscus Hair Mask For Frizzy Hair During Rainy Days : Ways to Use Hibiscus For Healthy Hair : Make Hibiscus Hair Masks At Home For Healthy Hair : पावसाळ्यात केसांचा फ्रिजीनेस, कोरडेपणा कमी करण्यासाठी फायदेशीर घरगुती हेअर मास्क...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2025 18:44 IST2025-05-28T18:31:23+5:302025-05-28T18:44:19+5:30

Try this ancient Ayurvedic Hibiscus Hair Mask For Frizzy Hair During Rainy Days : Ways to Use Hibiscus For Healthy Hair : Make Hibiscus Hair Masks At Home For Healthy Hair : पावसाळ्यात केसांचा फ्रिजीनेस, कोरडेपणा कमी करण्यासाठी फायदेशीर घरगुती हेअर मास्क...

Try this ancient Ayurvedic Hibiscus Hair Mask For Frizzy Hair During Rainy Days Ways to Use Hibiscus For Healthy Hair Make Hibiscus Hair Masks At Home For Healthy Hair | जास्वंदीच्या पानाफुलांचा हेअर मास्क पावसाळ्यात करतो केसांवर जादू, कोरडे-राठ केस होतात मऊमऊ सुंदर...

जास्वंदीच्या पानाफुलांचा हेअर मास्क पावसाळ्यात करतो केसांवर जादू, कोरडे-राठ केस होतात मऊमऊ सुंदर...

पावसाळ्याचे दिवस आता सुरु झाले आहेत. पावसाळ्यात केसांची अधिक जास्त काळजी घ्यावी लागते. केसांचे आरोग्य व सौंदर्य विशेषतः पावसाळ्यातच बिघडते. या ऋतूमध्ये हवामानात आर्द्रतेचे प्रमाण खूप वाढते, ज्यामुळे केसांमध्ये नैसर्गिक ओलावा टिकत नाही आणि ते लवकर कोरडे, निस्तेज आणि फ्रिझी (Frizzy) होतात. याशिवाय पावसाचे पाणी, प्रदूषण, वारंवार भिजणं, केसांची योग्य काळजी न घेणे आणि गरजेपेक्षा जास्तवेळ शॅम्पू करणं यामुळे केसांची मुळं कमकुवत (Try this ancient Ayurvedic Hibiscus Hair Mask For Frizzy Hair During Rainy Days) होतात आणि त्यांचा पोतही बिघडतो. एवढेच नाही तर, केसांची मुळं आणि स्काल्पला योग्य पद्धतीने पोषण मिळत नाही, आणि त्याचा थेट परिणाम केसांच्या (Ways to Use Hibiscus For Healthy Hair) एकूण आरोग्यावर होतो. यामुळे, काहीजणांना केस गळतीची समस्या सतावते, तर काहीजणांना केस गुंतणे केसांना फाटे फुटणे अशा समस्या त्रास देतात(Make Hibiscus Hair Masks At Home For Healthy Hair).

अशा परिस्थितीत, केसांची नैसर्गिक चमक आणि मऊपणा टिकवून ठेवण्यासाठी केसांची योग्य निगा राखणे वश्यक असते. या ऋतूमध्ये वातावरणातील आर्द्रतेमुळे केसांचे फारच नुकसान होते. पावसाळ्यात केसांचा फ्रिझीनेस आणि कोरडेपणा कमी करून त्यांना आरोग्यदायी, मऊमुलायम आणि सुंदर ठेवण्यासाठी घरगुती व नैसर्गिक उपाय उपयोगी ठरू शकतात. पावसाळ्यात केसांच्या कोरडे पडण्याची तसेच फ्रिझीनेस वाढण्याची समस्या वरचेवर सतावत असेल तर एक घरगुती हेअर मास्क आपण केसांना लावू शकतो. पावसाळ्यात केसांचा फ्रिजीनेस आणि कोरडेपणा कमी करण्यासाठी फायदेशीर असा हेअर मास्क कसा करायचा ते पाहूयात. 

साहित्य :- 

१. जास्वंदीची फुल - ४ ते ५ फुलं 
२. जास्वंदीची पाने - ५ ते ६ पाने
३. एलोवेरा जेल - १ टेबलस्पून 
४. नारळाचे किंवा बदामाचे तेल - २ टेबलस्पून
५. दही - १ टेबलस्पून  

अमोनियायुक्त हेअर कलर्सना म्हणा नाही! मेथी दाणे, हळद, अळशीचा नॅचरल हेअर कलर - केस दिसतील काळेभोर...


रात्रभर लॅपटॉपवर काम केल्याने, डोळयांच्या पफीनेस वाढला, फक्त २ स्टीलचे चमचे करतील जादू...

कृती :- 

१. सगळ्यांतआधी जास्वंदीची पाने आणि फुले स्वच्छ धुवून घ्यावीत. 
२. आता एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात जास्वंदीची पाने आणि फुले एकत्रित वाटून त्यांची पेस्ट तयार करून घ्यावी. ही तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून त्यात एलोवेरा जेल मिक्स करून घ्यावे. 
३. त्यानंतर या मिश्रणात नारळाचे किंवा बदामाचे तेल या दोघांपैकी कोणतेही एक तेल मिसळून घ्यावे. 
४. सगळ्यात शेवटी आपण यात दही देखील मिसळू शकता. 
५. हे सगळे घटक एकत्रित मिसळून चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. केसांसाठी हेअर मास्क वापरण्यासाठी तयार आहे. 

नाकावरच्या ब्लॅकहेड्समुळे चेहरा निस्तेज दिसतो? १ सोपा उपाय - ५ मिनिटांत ब्लॅकहेड्स गायब, दुखणारही नाही...

याचा वापर कसा करावा ? 

पावसाळ्यात केसांचा कोरडेपणा आणि फ्रिझीनेस कमी करण्यासाठी, खास तयार केलेला हेअर मास्क केसांवर आठवड्यातून किमान २ वेळा तरी लावावा.    

पावसाळ्यात केसांसाठी हा हेअर मास्क कसा फायदेशीर ठरतो ? 

१. जास्वंदीची पाने आणि फुले केसांची वाढ होण्यास मदत करते आणि स्काल्पला थंडावा देते. याचबरोबर, केसांच्या मुळांना बळकट करण्यास मदत करते. 

२. एलोवेरा जेल केसांना खोलवर मॉइश्चराइज करते आणि केस मऊ, रेशमी आणि चमकदार बनवण्यास मदत होते. 

३. तेल केसांच्या मुळांना पोषण देते. केसगळती कमी करतो आणि केस तुटण्याची समस्या कमी होते. 

४. दही कोरड्या टाळूला नैसर्गिक ओलावा देतो. डॅन्ड्रफ कमी करण्यात मदत करतो आणि स्कल्पला आराम देतो.

Web Title: Try this ancient Ayurvedic Hibiscus Hair Mask For Frizzy Hair During Rainy Days Ways to Use Hibiscus For Healthy Hair Make Hibiscus Hair Masks At Home For Healthy Hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.