उंची ही तुमच्या सौंदर्यासाठीचं एक प्रमाण मानलं जातं. जे लोक उंच असतात त्यांचं आपोआपच समोरच्यावर एक वेगळं इम्प्रेशन पडतं. त्यामुळेच तर उंचीने कमी असणाऱ्या ठेंगण्या मुलीसुद्धा हाय हिल्स घालून उंची वाढवण्याचा आणि अधिक आकर्षक दिसण्याचा प्रयत्न करतात. पण फक्त एवढं करूनच जमणार नाही. त्यासाठी तुम्हाला आणखी अशा काही गोष्टी करणंही गरजेचं आहे ज्या गोष्टी अभिनेत्री आलिया भट नेहमीच करताना दिसते. ठेंगणी असूनही आलिया भट इतकी उंच कशी काय दिसते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर बघा उंच दिसण्यामागचं तिचं हे खास सिक्रेट..(Top 3 Secrets Of Actress Alia Bhat To Look Tall)
ठेंगणी असूनही आलिया भट एवढी उंच कशी दिसते?
आपली उंची जास्त आहे हे भासवण्यासाठी आलिया भट नेमकं काय करते, याविषयीच्या काही खास टिप्स आणि ट्रिक्स gehnaghar.in या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आल्या आहेत. त्या टिप्स फॉलो करून तुम्हीही आहात त्यापेक्षा अधिक उंच दिसू शकता.
रोज सुर्यफुलाच्या चमचाभर बिया खा, वजन कमी होऊन त्वचा आणि केसही होतील सुंदर...
१. उंच दिसण्यासाठी साहजिकच उंच टाचेच्या चपला, बूट घालणं हा एक उपाय तर आहेच. पण त्यासोबतच दागिन्यांची निवड थोडी हटके पद्धतीने केली पाहिजे. कानातले घालताना ते टॉप्स, रिंग, चांदबाली या प्रकारातले घालू नका. त्याऐवजी लांब झुमके किंवा डँगलिंग प्रकारातले कानातले घालण्यास प्राधान्य द्या.
२. तुमच्या ड्रेसचा किंवा ब्लाऊजचा गळा हा ओपन नेक प्रकारातला हवा. म्हणजे समोरच्या बाजूने बऱ्यापैकी मोकळा असणारा डिप यू किंवा डिप व्ही नेक या प्रकारातला ठेवा. यामुळेही तुमच्या उंचीमध्ये फरक जाणवतो.
डोक्यात सतत कोंडा होणाऱ्या १० पैकी ६ जणांना असतो स्काल्प सोरायसिस! बघा या आजाराची लक्षणं
३. फ्लोरल प्रिंट किंवा प्लेन रंगाचे कपडे घाला. आलिया भट बऱ्याचदा अशाच प्रकारच्या कपड्यांमध्ये दिसते. त्यामुळे ती उंच वाटते.