डार्क चॉकलेट म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येत ते गर्द काळेभोर, गोडसर पण थोडे कडू असे चॉकलेट. डार्क चॉकलेट खायला अनेकांना आवडत. आपल्यापैकी बऱ्याचजणींच्या (How to use chocolate for hair growth) बॅगेत कायम एक ना एक तरी डार्क चॉकलेट (Dark Chocolate For Hair) असतंच. खरंतर, डार्क चॉकलेट आपण आवडतं म्हणून किंवा काहीवेळा टाईमपास म्हणून तर कधी गोड खावेसे वाटले अशा वेगवेगळ्या कारणांसाठी खातो. पण डार्क चॉकलेट खाल्ल्याने आपल्या केसांच्या सौंदर्यात भर पडून केसांच्या अनेक समस्या (The Surprising Connection Between Dark Chocolate & Hair Growth Suggested By Doctor) कमी होतात. खरं सांगायचं झालं, तर डार्क चॉकलेट फक्त खाण्यासाठीच नाही, तर केसांच्या आरोग्यासाठीसुद्धा खूप फायदेशीर आहे(Healthy Reasons to Eat Dark Chocolate).
डार्क चॉकलेट मधील नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स हे केसगळती कमी करण्यास, स्काल्पला पोषण देण्याबरोबरच केसांना नैसर्गिक चमक देण्यासाठी उपयुक्त ठरतात. फ्लेव्हनॉइड्स, लोह, झिंक आणि मॅग्नेशियमसारख्या पोषक घटकांनीयुक्त डार्क चॉकलेट केवळ त्वचेसाठीच नव्हे, तर केसांच्या मजबुतीसाठीही उपयोगी ठरते. विशेषतः जर तुमचे केस कोरडे, निर्जीव किंवा निस्तेज झाले असतील, तर तुमच्या आहारात डार्क चॉकलेटचा समावेश करणे हा एक सोपा आणि चविष्ट उपाय असू शकतो. केसांच्या अनेक समस्यांवर वेगवेगळे हजारो उपाय करूनही काहीच फरक दिसत नसेल तर आपण हा डार्क चॉकलेटचा सोपा आणि गोड उपाय करुन पाहायला हरकत नाही. नवी दिल्लीतील लाजपत नगर येथील अॅलांटिस हेल्थकेअरच्या त्वचारोगतज्ज्ञ आणि ब्युटी थेरपिस्ट डॉ. चांदनी जैन गुप्ता यांनी नवभारत टाइम्सशी बोलताना केसांसाठी डार्क चॉकलेट खाणे कसे फायदेशीर आहे, याबद्दल अधिक माहिती सांगितली आहे.
डार्क चॉकलेट खाण्याचे केसांना होणारे फायदे...
१. स्काल्पला पोषण मिळते :- डार्क चॉकलेटमध्ये असणारे आरोग्यदायी फॅट्स स्काल्पचा कोरडेपणा दूर करण्यात मदत करतात आणि स्काल्पच्या पेशींची दुरुस्ती करतात. डार्क चॉकलेट खाल्ल्याने स्काल्पचे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे केसांच्या मुळांना अधिक पोषण मिळते आणि नवीन केसांची वाढ अधिक वेगाने होऊ लागते.
त्वचेसाठी बेसन फायदेशीर पण ‘या’ लोकांनी मुळीच बेसनाचे लेप लावू नयेत, कायमचं नुकसान होतं...
२. स्ट्रेस कमी करून केसांना मजबुती देते :- केसगळतीचं एक मुख्य कारण म्हणजे मानसिक ताणतणाव. डार्क चॉकलेटमध्ये नैसर्गिकरित्या असणारी सेरोटोनिन आणि एंडोर्फिन ही 'फील गुड' रसायनं आपली मनःस्थिती सुधारण्यात मदत करतात आणि स्ट्रेस कमी करतात. त्यामुळे केस गळतीचं प्रमाण घटतं आणि केसांची नैसर्गिक वाढ अधिक जलद गतीने होते.
३. कोरड्या, निर्जीव केसांना चमक येण्यासाठी :- जर तुमचे केस निस्तेज, कोरडे आणि वारंवर तुटत असतील, तर डार्क चॉकलेटमधील ओमेगा-६ फॅटी ॲसिड त्यांना खोलवर पोषण देऊन मॉइश्चराईझ करण्याचे काम करतात. हे घटक केसांमधील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे केस अधिक मऊ, चमकदार आणि गुळगुळीत बनतात.
आंब्याची हिरवीगार पानं केसांसाठी वरदान! या ३ पद्धतींनी केसांना लावा, केसांच्या समस्या गायब...
४. रोगप्रतिकारक शक्ती वाढवा व केसगळती थांबवा :- डार्क चॉकलेटमध्ये असणारे झिंक आणि लोह यांसारखे पोषक घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. मजबूत रोगप्रतिकारक शक्तीमुळे स्काल्पवरील बुरशीजन्य संसर्ग आणि इतर त्रास टाळता येतात, ज्यामुळे केसगळतीची समस्या हळूहळू कमी होण्यास मदत होते.
पपईची पानं म्हणजे त्वचेसाठी वरदान, पपईच्या पानांचा ‘असा’ फेसमास्क चेहऱ्यावर आणतो नवी चमक...
५. केसांसाठी डार्क चॉकलेटचा हेअर मास्क :- केसांसाठी डार्क चॉकलेटचा हेअर मास्क तयार करण्यासाठी, एका बाऊलमध्ये पिकलेले केळं मॅश करून त्यात डार्क चॉकलेटचे ४ तुकडे वितळवून घाला. या मिश्रणात १ टेबलस्पून मध घाला. आता हा हेअर मास्क केसांच्या फक्त लांबीवर लावून घ्यावा. (मुळांना लावू नये. मग केस बांधून ठेवा ४५ मिनिटानंतर केस स्वच्छ धुवून घ्यावेत. आपण यात केळ्याऐवजी दही देखील घालू शकता.
६. डार्क चॉकलेट किती प्रमाणांत खावे :- डार्क चॉकलेट आरोग्यासाठी फायदेशीर असले, तरी ते संतुलित प्रमाणात खाणे अत्यंत आवश्यक असते. दररोज २० ते ३० ग्रॅम शुद्ध डार्क चॉकलेट (७०% किंवा त्याहून अधिक कोको असलेले) खाल्यास चांगले त्याचे आपल्या आरोग्याला चांगले फायदे मिळू शकतात. शक्य असल्यास कमी साखर असलेली व कृत्रिम चव नसलेल्या डार्क चॉकलेटची निवड करावी. हे चॉकलेट तुम्ही नाश्त्याच्या वेळी किंवा संध्याकाळी टी - टाईमच्या वेळी खाऊ शकता.