आपले केस लांबसडक, घनदाट आणि काळेभोर असावेत, अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. दक्षिण भागातील महिलांचे लांबसडक, जाडजूड आणि काळेभोर केस हे नेहमीच चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरतो. या महिलांचे जाडजूड आणि लांबसडक, काळेभोर केस पाहून अनेक महिलांना त्यांच्या केसांचे नेमके सिक्रेट काय आहे, असा प्रश्न पडतो. य महिलांचे एवढे लांब, दाट आणि काळेभोर केस, वयाच्या कितव्याही वर्षी कायम तसेच कसे काय टिकून राहतात. त्यांच्या केसांची नैसर्गिक चमक आणि मजबुती ही प्रत्येक महिलेला हवीहवीशी वाटते, पण यासाठी नेमकं करायचं काय असा प्रश्न पडतो(secret to long hair of South Indian women).
केसांचे सौंदर्य कायम टिकवून ठेवण्यासाठी या महिला महागडे हेअर केअर प्रॉडक्ट्स नाही तर चक्क घरगुती उपाय करतात. खरंतर, त्यांच्या या केसांच्या सौंदर्याचे सिक्रेट महागड्या हेअर केअर प्रॉडक्ट्समध्ये नाही, तर त्यांच्या घरगुती पारंपरिक तेलात दडलेलं असतं. हे घरगुती पारंपरिक तेल नैसर्गिक पदार्थांपासून तयार केलं जातं आणि त्यात केसांना पोषण देणारे घटक मुबलक प्रमाणात असतात. दक्षिण भारतात, विशेषतः खोबरेल तेल आणि नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांचा वापर करून तेल तयार करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, जी केसांच्या मुळांना पोषण देऊन त्यांना मजबुती देते आणि केसांची वाढ होण्यास मदत करते. साऊथ इंडियन महिलांचे केस इतके सुंदर ठेवण्यामागचं नेमकं हे घरगुती तेलाचं सिक्रेट काय आहे आणि हे तेल पारंपरिक पद्धतीने घरच्याघरीच ( south indian women hair care routine) कसं तयार करायचं ते पाहूयात...
साऊथ इंडियन महिलांच्या घनदाट, लांबसडक केसांचे सिक्रेट...
साऊथ इंडियन महिलांच्या जाडजूड आणि लांबसडक केसांमागील नेमके सिक्रेट आणि त्यांच्या पारंपरिक होममेड हेअर ऑईलची कृती व त्यातील जादुई घटक कोणते आहेत, याबद्दल अधिक माहिती घेऊयात. साऊथ इंडियन महिला केसांसाठी वापरत असलेले घरगुती, पारंपरिक तेल तयार करण्यासाठी आपल्याला २ कप खोबरेल तेल, २ टेबलस्पून मेथी दाणे, १५ ते २० कडीपत्त्याची पाने, १ टेबलस्पून एलोवेरा जेल, १५ ते २० तुळशीची पाने, २ ते ३ आवळ्याचे बारीक तुकडे इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
एका भांड्यात खोबरेल तेल घेऊन ते व्यवस्थित गरम करुन घ्यावे. खोबरेल तेल थोडे गरम झाल्यावर त्यात मेथी दाणे, कडीपत्त्याची पाने, एलोवेरा जेल, तुळशीची पाने, आवळ्याचे बारीक तुकडे घालावेत. या तेलाला मंद आचेवर तोपर्यंत शिजवावे, जोपर्यंत तेलाचा रंग बदलत नाही. यानंतर हे तेल थंड करून गाळून घ्यावे. या तेलाला केस धुण्यापूर्वी लावावे. आपल्याला आठवड्यातून २ वेळा याचा उपयोग करायला हवा. सर्व सामग्री नैसर्गिक असल्याने केसांवर कोणतेही दुष्परिणाम होत नाही.
हे घरगुती पारंपरिक तेल केसांना लावण्याचे फायदे...
१. खोबरेल तेल :- खोबरेल तेल केसांच्या मुळांमध्ये खोलवर जाते, ज्यामुळे केसांना आतून पोषण मिळते. खोबरेल तेल केसांना नैसर्गिक पद्धतीने मॉइश्चराईझ करते ज्यामुळे कोरडेपणा दूर होतो आणि केस चमकदार दिसतात.
२. मेथी दाणे :- मेथी दाण्यांमध्ये निकोटिनिक अॅसिड आणि प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे केस गळणे थांबते आणि मुळे मजबूत होतात. केसांच्या वाढीला चालना देते आणि केस दाट, मजबूत करण्यास मदत करते.
३. कडीपत्त्याची पाने :- कढीपत्त्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन 'बी' असते, जे केसांच्या नैसर्गिक रंगाचे संरक्षण करते आणि केस अकाली पांढरे होण्यापासून वाचवते. कढीपत्ता नवीन केसांची वाढ होण्यास मदत करते.
४. एलोवेरा जेल :- कोरफडीमध्ये थंडावा देणारे गुणधर्म असतात, जे टाळूवरील खाज आणि जळजळ कमी करतात. यामुळे स्काल्पचा पीएच स्तर योग्य राखला जातो, ज्यामुळे केस निरोगी राहतात. कोरफड केस मऊ आणि चमकदार बनवते.
५. तुळशीची पाने :- तुळस स्काल्पचे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे केसांच्या मुळांना चांगले पोषण मिळते. यात असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म स्काल्पला स्वच्छ ठेवण्यास आणि संसर्ग टाळण्यास मदत करतात.
६. आवळा :- आवळ्यामध्ये व्हिटॅमिन 'सी' मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे केसांमधील कोलॅजन उत्पादन वाढते आणि केस मजबूत होतात. आवळा केसांना नैसर्गिकरित्या कंडिशनिंग करते, ज्यामुळे केस मुलायम होतात आणि तुटत नाहीत.
