Join us

फक्त २ आठवड्यात हेअर डायचा रंग उडतो, केस दिसतात कसेतरीच? ४ चुका टाळा, रंग टिकेल भरपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2024 17:40 IST

The 4 Most Common Hair Color Mistakes: How to Fix Them? : केसांना डाय लावताना ४ चुका अवश्य टाळा..

आजकाल कमी वयात लोकांच्या केसांच्या निगडीत समस्या वाढत आहेत (Hair Care Tips). मुख्य म्हणजे कमी वयात लोकांचे केस गळत आहेत (Beauty Tips). शिवाय पांढरेही होत आहे. पांढऱ्या केसांमुळे केसांची शोभा काहीशी कमी होते. शिवाय पांढऱ्या केसांमुळे आपला लूकही खराब होतो. पांढऱ्या केसांमुळे आपण वयस्करही वाटतो.

पांढऱ्या केसांवर उपाय म्हणून आपण मेहेंदी किंवा डायचा वापर करतो. पण यामुळेही केस निर्जीव आणि खराब होतात. पांढरे केस काळे करण्यासाठी काही जण डायचाही वापर करतात. पण ४ - ५ हेअर वॉशनंतर केसांचा पंधरा रंग पुन्हा दिसून येतो. जर केसांचा रंग लवकर जात असेल तर, काही चुका टाळा. या चुकांमुळे केसांवर डायचा रंग जास्त वेळ राहत नाही(The 4 Most Common Hair Color Mistakes: How to Fix Them?).

वसुबारस : दिवाळीचा पहिला दिवा उजळताना काढा स्पेशल वसूबारस सोपी रांगोळी; इतकी सुंदर की पाहात राहावे..

हेअर डाय केल्यानंतर कोणत्या चुका टाळाव्या?

योग्य काळजी घेणे आवश्यक

हेअर डाय केल्यानंतर केसांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. हेअर डाय केल्यानंतर विशिष्ट आणि एकाच प्रकारच्या शाम्पूचा वापर करावा. यामुळे डायचा रंग लवकर निघत नाही. शिवाय केस निर्जीवही दिसत नाही.

कोमट पाण्याचा वापर टाळा

हेअर डाय केलं असेल तर, शक्यतो केस धुताना कोमट पाण्याचा वापर टाळा. कोमट पाण्याने केस धुतल्याने केस रुक्ष होतात. शिवाय विरळ होतात. केस धुण्यासाठी थंड किंवा कमी कोमट पाण्याचा वापर करावा.

हीटिंग टूल्सपासून दूर रहा

केसांना रंग दिल्यानंतर, स्ट्रेटनर हीटिंग टूल्सपासून दूर रहा. यामुळे केस खराब होतात. शिवाय डायचा रंगही कमी होतो.

थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा

नियमांचे पालन करा

केसांवर जास्त काळ हेअर कलर ठेवणे टाळावे. पॅकेटवर लिहिलेल्या नियमांनुसारच रंग वापरा. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स