Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > कपभर चहाचं पाणी केसांवर करते जादू, घरगुती स्वस्त आणि मस्त उपाय - केसांना येईल काचेसारखी चमक...

कपभर चहाचं पाणी केसांवर करते जादू, घरगुती स्वस्त आणि मस्त उपाय - केसांना येईल काचेसारखी चमक...

tea water for hair growth : how to use tea water for hair : tea water hair rinse benefits : चहाच्या पाण्याचा वापर केसांसाठी नैसर्गिक सिरमसारखा करता येतो, पाहा नेमकं करायचं काय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2026 19:00 IST2026-03-09T19:00:00+5:302026-03-09T19:00:02+5:30

tea water for hair growth : how to use tea water for hair : tea water hair rinse benefits : चहाच्या पाण्याचा वापर केसांसाठी नैसर्गिक सिरमसारखा करता येतो, पाहा नेमकं करायचं काय...

tea water for hair growth how to use tea water for hair tea water hair rinse benefits | कपभर चहाचं पाणी केसांवर करते जादू, घरगुती स्वस्त आणि मस्त उपाय - केसांना येईल काचेसारखी चमक...

कपभर चहाचं पाणी केसांवर करते जादू, घरगुती स्वस्त आणि मस्त उपाय - केसांना येईल काचेसारखी चमक...

आपल्या दिवसाची सुरुवात ज्या वाफाळलेल्या चहाने होते, तोच चहा केवळ थकवा घालवण्यासाठीच नाही, तर तुमच्या केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठीही तितकाच गुणकारी आहे. आपल्या केसांसाठी चहा पावडरचे पाणी म्हणजे फायदेशीर जादुई सीरम ठरु शकते. आजकाल केसगळती, कोंडा आणि कोरडेपणा अशा केसांशी संबंधित अनेक समस्या बहुतेक सगळ्याचंजणींना सतावतात...केसांची काळजी घेण्यासाठी आपल्यापैकी बऱ्याचजणी महागडे सिरम, स्प्रे किंवा विविध हेअर प्रॉडक्ट्स वापरतात. मात्र काहीवेळा घरातच असलेल्या साध्या पदार्थांमुळे केसांना उत्तम पोषण मिळू शकते( tea water hair rinse benefits).

चहाच्या पाण्याचा वापर केसांसाठी नैसर्गिक सिरमसारखा करता येतो... चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि टॅनिन्स असतात जे केसांना पोषण देण्यास मदत करतात. यामुळे केस अधिक मऊ, चमकदार आणि मजबूत होण्यास मदत मिळू शकते. योग्य पद्धतीने वापरल्यास चहाचे पाणी केसांसाठी एक उत्तम घरगुती उपाय ठरू शकतो. चहाच्या पाण्याचा (how to use tea water for hair) केसांसाठी सिरम म्हणून कसा वापर करायचा आणि त्याचे फायदे (tea water for hair growth) काय आहेत ते पाहूयात... 

चहाच्या पाण्यात असं काय असतं?

चहामध्ये 'कॅफिन' (Caffeine) आणि 'टॅनिन्स' (Tannins) मुबलक प्रमाणात असतात. कॅफिन हे केसांच्या मुळांना पुरेसे पोषण देते. ज्यामुळे केसांची वाढ वेगाने होते. तर टॅनिन्स केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यास आणि केसांना चमक आणण्यास मदत करतात.

फक्त २ रुपयांच्या शाम्पूने करा घरच्याघरीच पेडीक्युअर! नको महागडे उपाय - काळेपणा होईल कमी, पाय दिसतील सुंदर... 

चहा पावडरचे हेअर सिरम कसे तयार करावे? 

१ ते २ कप पाणी गरम करायला ठेवा. त्यात २ ते ३ चमचे चहा पावडर घाला. हे पाणी ५ ते ७ मिनिटे नीट उकळू द्या, जेणेकरून त्याचा अर्क पाण्यात पूर्णपणे उतरेल. तयार झालेला हा काढा गाळून घ्या आणि पूर्णपणे थंड होऊ द्या. थंड झालेले हे पाणी एका स्प्रे बाटलीमध्ये भरून ठेवा.

वाटीभर दह्याची कमाल! खुंटलेल्या केसांची वाढ होईल दुप्पट वेगाने - करून पहावा असा  उपाय...

चहा पावडरचे पाणी केसांसाठी कसे वापरावे ? 

केस धुतल्यानंतर (शाम्पू झाल्यावर), हे चहाचे पाणी केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत स्प्रे करा. हलक्या हाताने ५ मिनिटे स्काल्पचा मसाज करा. १५ ते २० मिनिटे तसेच ठेवा आणि त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवा (पुन्हा शाम्पू करण्याची गरज नाही).

हा खास घरगुती उपाय करण्याचे फायदे... 

१. केस गळतीवर नियंत्रण :- चहापत्तीमधील अँटी-ऑक्सिडंट्स मुळांना मजबूत करतात, ज्यामुळे केस गळणे कमी होते.

२. पांढऱ्या केसांपासून सुटका :- ज्यांचे केस नुकतेच पांढरे होऊ लागले आहेत, त्यांच्यासाठी चहाचे पाणी हा उत्तम पर्याय आहे. हे केसांना नैसर्गिकरित्या डार्क टोन देते.

३. डँड्रफ कमी होतो :- चहामध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असल्याने स्काल्पला येणारी खाज आणि कोंडा दूर होतो.

४. चमकदार केस :- चहाच्या पाण्याने केस धुतल्यास केसांना नैसर्गिक चमक येते आणि ते मऊ होतात.

Web Title : चाय पत्ती का पानी: बालों के लिए कमाल के फायदे, चमक और घरेलू उपाय!

Web Summary : चाय पत्ती का पानी बालों को मजबूत करता है, बालों का झड़ना कम करता है और चमक बढ़ाता है। यह बालों को काला कर सकता है, रूसी कम कर सकता है और मुलायम, स्वस्थ बालों को बढ़ावा दे सकता है। शैम्पू के बाद धो लें।

Web Title : Tea powder water: Amazing hair benefits, shine, and home remedy!

Web Summary : Tea powder water strengthens hair, reduces hair fall, and adds shine. It can darken hair, reduce dandruff, and promote softer, healthier hair. Use as a post-shampoo rinse.