हल्ली केसांच्या वेगवेगळ्या तक्रारी खूप वाढल्या आहेत. काही जणींचे केस खूप गळतात तर काही जणींच्या केसांना अजिबातच वाढ नसते. सध्या तर कमी वयात केस पांढरे होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. अशा केसांसंंबंधित कोणत्याही तक्रारी असतील तर आहारामध्ये काही बदल करून पाहाणं खूप गरजेचं आहे. कारण आहारातून पुरेसे पौष्टिक घटक मिळाले नाही तर त्याचा केसांवर वाईट परिणाम होत जातो (superfood for hair). म्हणूनच केसांच्या कोणत्या तक्रारी कमी करण्यासाठी काय खायला पाहिजे ते पाहूया..(food for long and strong hair)
केस दाट, लांब आणि काळेभोर होण्यासाठी उपाय
१. केस जर खूप पातळ असतील, केसांची वाढ होत नसेल तर झिंकयुक्त पदार्थ जास्तीतजास्त प्रमाणात खायला हवे. यासाठी तुम्ही अक्रोड, बदाम असे पदार्थ खाऊ शकता.
मुलांची स्मरणशक्ती, एकाग्रता वाढून अभ्यासात होतील हुशार, रामदेव बाबा सांगतात ४ उपाय
२. केस गळण्याचं प्रमाण खूप वाढलं असेल तर आहारात लोकयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खायला हवे. त्यासाठी पालक, बीट, हिरव्या पालेभाज्या, गूळ, फुटाणे असे पदार्थ योग्य प्रमाणात खायला हवे.
३. केस दाट आणि जाड होण्यासाठी आहारात प्रोटीनयुक्त पदार्थ जास्त ठेवा. राजमा, पनीर, दुग्धजन्य पदार्थ आहारात जास्त प्रमाणात हवे. त्यासोबतच ओमेगा ३ असणारे पदार्थही पुरेशा प्रमाणात खा. त्यासाठी चिया सीड्स, जवस असे पदार्थ खाऊ शकता.
या गोष्टींचीही काळजी घ्या
केसांची चांगली वाढ होण्यासाठी शिर्षासन, सर्वांगासन असे व्यायाम करणंही फायदेशीर ठरतं. कारण त्यामुळे डोक्याकडे योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होतो आणि त्यामुळे केसांच्या मुळांना चांगला ऑक्सिजन मिळून केसांची मुळं पक्की होण्यासाठी मदत होते.
नव्या नवरीसाठी बनारसी शालूचे सुंदर डिझाईन्स.. बघा पारंपरिक साड्यांचा अधुनिक साज, ६ आकर्षक रंग
डोक्याला नियमितपणे मालिश करणे, कोणताही माईल्ड शाम्पू वापरणे, केसांवर वेगवेगळे हिटींग ट्रिटमेंट वारंवार न करणे असे काही उपाय जर नियमितपणे केले तरी केस गळण्याचं प्रमाण बरंच कमी होऊ शकतं.
