Summer color : केसांत रंगीली बट, हातात - कानात निऑन रंग ! - Marathi News | Summer color - colorful butt in hair, neon color in hands and ears! | Latest sakhi News at Lokmat.com
>ब्यूटी > Summer color : केसांत रंगीली बट, हातात - कानात निऑन रंग !

Summer color : केसांत रंगीली बट, हातात - कानात निऑन रंग !

मागच्या वर्षाच्या शेवटी आणि या वर्षाच्या सुरुवातीलाच निऑन हे बाद कॅटेगरीत जमा झाले होते. मात्र या चमकिल्या रंगांनी स्वत:ला पूर्ण बाद होऊ दिलेलं नाही. ते अगदी ‘किंचित’ प्रमाणात उन्हाळ्यातही चकचकणार आहेतच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:32 PM2021-03-26T16:32:37+5:302021-03-26T16:51:49+5:30

मागच्या वर्षाच्या शेवटी आणि या वर्षाच्या सुरुवातीलाच निऑन हे बाद कॅटेगरीत जमा झाले होते. मात्र या चमकिल्या रंगांनी स्वत:ला पूर्ण बाद होऊ दिलेलं नाही. ते अगदी ‘किंचित’ प्रमाणात उन्हाळ्यातही चकचकणार आहेतच.

Summer color - colorful butt in hair, neon color in hands and ears! | Summer color : केसांत रंगीली बट, हातात - कानात निऑन रंग !

Summer color : केसांत रंगीली बट, हातात - कानात निऑन रंग !

Next

श्रावणी बॅनर्जी

पूर्वी उन्हाळा आला की, सरसकट पांढरे कपडे वापरले जायचे. स्वच्छ. शुभ्र. नाहीतर मग पेस्टल शेडचे सुती, कॉटनचे कपडे हे सगळ्यात सोयीचे. आपलं हवामान कायमच उष्ण त्यामुळे तसंही आपल्याकडे ‘समर’चं पाश्चिमात्य जगाला असतं तसं काही कौतूक नसतं. पण तिकडे ज्याची लाट ते स्वीकारायचं असा एक टप्पा येऊन गेल्यानं मधली काही वर्षे पाश्चिमात्य समर कलेक्शन्स आपल्याकडेही लॉँच होऊ लागली. शेवटी एकदाचं आपल्याला कळलं की, आपल्याकडचा उन्हाळा वेगळा, त्या उन्हाच्या झळांपासून वाचायचं तर आपले पर्याय आपल्याला शोधायला हवेत. तेच बदल आता काही अंशी तरी आपल्याकडे दिसू लागले आहेत. आणि म्हणूनच आपल्याकडच्या उन्हाळ्यात यंदा कुठला रंग ‘इन’ आहे असं विचाराल तर त्याचं उत्तर- पांढरा असंच द्यावं लागेल. पांढरा रंग, आणि फ्लोरल प्रिण्ट्स हाच यंदाचा सगळ्यात मोठा ट्रेण्ड. आणि हा ट्रेण्डच एक ट्रेण्डसेटर असल्यानं आता तो बराच काळ टिकेल अशी शक्यता आहे. त्यामुळे मस्त शुभ्र सफेद उन्हाळी कपडे हीच आपली फॅशन असं मानायला काही हरकत नाही. पण तरीही तारुण्याला इतर रंगांची मोहिनी पडतेच. त्यामुळे पांढऱ्या रंगाचे कपडे घातले म्हणून त्यांचं जग फिकं, बोअर होण्याची शक्यता नाही. कारण या व्हाईटचा हात धरुन निऑन आणि फ्लोरोसण्ट कलर्स पुन्हा तरुण जगण्यात दाखल झाले होते. मागच्या वर्षाच्या शेवटी आणि या वर्षाच्या सुरुवातीलाच निऑन हे बाद कॅटेगरीत जमा झाले होते. मात्र या चमकिल्या रंगांनी स्वत:ला पूर्ण बाद होऊ दिलेलं नाही. ते अगदी ‘किंचित’ प्रमाणात उन्हाळ्यातही चकचकणार आहेतच. फक्त त्यांचं रूप फक्त आता बदलतं आहे.

व्हाईट+निऑन

हे यंदाचं उन्हाळी फॅशन स्टेटमेण्ट आहे.

साधे, पांढरे कपडेही थोडयाशा चमकिल्या रंगांनी  फॅशन स्टेटमेण्ट ठरू शकतात. 

 

समर निऑन नेल्स

नेल आर्ट हा प्रकार तर आताशा खूप लोकप्रिय आहे. त्यातही निऑन नेल आर्ट हा तरुण मुलींच्या जगातला एक अत्यंत लेटेस्ट ट्रेण्ड आहे. निऑन कलर्स नखांवर स्टायलिशली मिरवायला जिगर लागते म्हणतात.आता समर निऑन नेल्स हे त्याच्यापुढचं पाऊल. म्हणजे काय तर बाकी सगळा पोषाख पांढरा, पेस्टल शेड्समध्ये असेल तर हे निऑन नेल्स सगळा माहौलच रंगील करतात.  निऑन कलरच्या नेलपेण्ट काय कुणीही वापरुच शकतं.

ग्रीन आयलायनर

उन्हाळ्यात घामाच्या धारा लागल्या तर कोण कशाला मेकप करेल. कितीही वॉटरप्रुफ असला मेकप तरी नकोच वाटतात ती पुटं चेहऱ्यावर. मग त्यावर हा सोपा उपाय काळं काजळ, किंवा आयलायनरला उन्हाळी सुट्टी द्यायची आणि कलर काजळ किंवा आयलायनर वापरायचं. त्यातही सध्या ग्रीन आयलायनर तरुण जगात एकदम मशहुर आहे.

जांभळ्या-निळ्या-गुलाबी आयशॅडो 

 

संध्याकाळी फिरायला जायचंय, छोटं गेटटुगेदर पार्टी आहे तर किती नटून जाणार? त्यातही गरम होण्याचा धोका. त्यामुळे एकच काहीतरी कलरफुल पण ठळकपणे करणं हा सध्याचा ट्रेण्ड. म्हणून मग बाकी मेकपला सुट्टी, अगदी लिपस्टिकलाही सुट्टी द्यायची. आणि फक्त डोळ्यांना जांभळी, निळी, गुलाबी असे आयशॅडो वापरायचे.

 

हातात/कानात निऑन

 

पांढरे/सोबर/पेस्टल शेड्सचे ड्रेसेस. पण त्याला कॉण्ट्रास्ट डार्क निऑन कलर्सचे कानात नुस्ते चमचमते खडे असलेले कानातले म्हणजेच स्टड घालता येतात. हातात एखादंच निऑन ब्रेसलेट घातलं तरी आपला लूक कलरफुल दिसतो.

 

केसात रंगीली बट

हे सगळ्यात सेफ पण भारी काम. आपला आत्ताच लूक आहे तसाच ठेवायचा. पण केसातली एकच बट कुठल्या तरी झटॅक रंगांत रंगवायची. बाकी रंगरुप तेच. या एका रंगीत बटमुळे सगळे फॅशनचे इफ ॲण्ड बट्सच संपून जातात.

Web Title: Summer color - colorful butt in hair, neon color in hands and ears!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.