Join us

एक ढगळा टी शर्ट तुम्हाला स्टायलिश work from home लूक देऊ शकतो, ट्राय इट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 15:31 IST

घरुन काम करताना गबाळंच राहिलं पाहिजे, असं थोडंच आहे, आपण आपल्याला सुंदर दिसलो पाहिजे..

ठळक मुद्देजरा सुंदर दिसू, मस्त मूड ठेवू कामाला लागू.. घरात बसून उदास डल कशाला व्हायचं?

श्रावणी बॅनर्जी   

आता उन्हाळा सुरु झाला, त्यात वर्क फ्रॉम होम. घरातले पैजामे आता परत फॅशन ट्रेण्ड होणार. पण ते सतत वापरताना आपल्याला मरगळ येते. कामाचा स्पीड गाठता येत नाही, ऑफिससारखं फोकस करता येत नाही असंही वाटतं. त्यावर एक साधा उपाय आहे, ढगळा टीशर्ट. म्हणजे काय तर ' स्टाइल हॅक्स'. आपल्याकडे असलेल्या कपड्यानांचा एक वेगळा, फ्रेश लुक देण्याची ही कला. स्टाइल हॅक्स. आता या लॉकडाऊन काळात ते आपल्याला फार उपयोगी पडू शकतात. ते ही घरातल्या घरात. फूल स्वींगमध्ये आपण आपल्यालाच फ्रेश वाटेल असे काही प्रयोग करु शकतो.सुंदर दिसणं हे आपल्या ॲटिट्यूडवरही अवलंबून असतंच ना!

तर काय करता येईल?

१. लूज टी -शर्ट घाला. पैजामावर लूज फुलाफुलांचा टीशर्ट घालूनही मस्त वावरता येतं. उन्हाचा त्रास नाही. झूम किंवा ऑनलाइन कॉल लागलाच. तर त्यावर एक छान कॉटन स्टोल गुंडाळून घ्या. फॉर्मलही दिसेल आणि मस्तही.२. एरव्ही घरात काम करताना या लूज टी शर्टला एक छोटोशी गाठ मारता येऊ शकते, समोरुन. क्रॉप टॉप लूक . घरातल्या घरात. फुल स्टाइल.३. प्लेन, स्ट्राइप, प्रिंटेड, बॉक्सि फिट कुठल्याही टी -शर्ट वापरून तुम्ही भर उन्हाळ्यात आपला आपल्यालाच मस्त वाटेल असा लूक देऊ शकता.४. तेच हेअरस्टाईलचंही. गरम होतं, त्यामुळे केस बांधून ठेवावेच लागतात. मात्र केसांना मस्त क्लीप्स लावणं, मोठ्ठे वेगळे बो लावणं, हे तर सहज जमू शकेल.५. आता प्रश्न असा की हे का करायचं, घरातच तर रहायचं असतं. पण प्रश्न घरातच राहण्याचा नाही तर गबाळे झालो की आपला मूड आणि आत्मविश्वास दोन्ही कमी होऊ शकतं, होतंच. त्यामुळे कामावर परिणाम होतो. त्यापेक्षा जरा सुंदर दिसू, मस्त मूड ठेवू कामाला लागू.. घरात बसून उदास डल कशाला व्हायचं?

 

टॅग्स :ब्यूटी टिप्स