आपले केस हे आपल्या व्यक्तीमत्वाचा एक महत्वाचा अविभाज्य भाग आहे. केस छान, सुंदर, घनदाट, लांबसडक, काळेभोर असावेत अशी प्रत्येकीची इच्छा असतेच. परंतु आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रदूषण, ताणतणाव आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे केसांच्या अनेक समस्यांना सामोरे (Special Trick To Soak Mehendi) जावे लागते. केस गळणे, अकाली पांढरे होणे आणि केसांमधील नैसर्गिक चमक कमी होणे यांसारख्या समस्या फारच कॉमन झाल्या आहेत. केसांच्या अनेक (Natural Hair Coloring With Mehendi) समस्या दूर करून केसांची योग्य ती काळजी घेण्यासाठी केसांसाठी घरगुती हेअर मास्क वापरणे फायदेशीर ठरते. हेअर मास्क केसांना आवश्यक पोषण देतात आणि त्यांना मुळापासून मजबूत बनवतात(how to apply mehendi on hair for best results).
विशेषतः, नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले हेअर मास्क केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यास मदत करतात. नैसर्गिक पद्धतीने केसांना रंग देणे आणि त्यांची योग्य निगा राखणे यासाठी घरगुती उपाय हेच सर्वात सुरक्षित आणि टिकाऊ पर्याय ठरतात. घरच्याघरी सहज तयार करता येणारे नैसर्गिक हेअर मास्क केसांना फक्त सुंदर रंगच देत नाहीत, तर त्यांना पोषण, मजबूती आणि (Soak mehendi with this special trick - it will get a beautiful color) आरोग्यदायी चमकही देतात. केसांची योग्य निगा राखण्यासाठी आणि त्यांना नैसर्गिकरित्या रंग देण्यासाठी साधासोपा आणि घरगुती हेअर मास्क कसा तयार करायचा ते पाहूयात.
केसांसाठी घरगुती हेअर मास्क कसा तयार करायचा...
केसांसाठी घरगुती हेअर मास्क तयार करण्यासाठी आपल्याला घरातच सहज उपलब्ध असणाऱ्या काही नैसर्गिक पदार्थांची गरज लागणार आहे. केसांसाठी घरगुती हेअर मास्क कसा तयार करावा हे इंस्टाग्रामवरील beautifulyoutips या अकाउंटवरुन शेअर करण्यात आले आहे. हा घरगुती हेअर मास्क तयार करण्यासाठी आपल्याला मेहेंदी पावडर केसांच्या उंचीनुसार, १/२ कप अळशीच्या बिया, २ टेबलस्पून कलोंजी, २ टेबलस्पून मेथी दाणे, १ टेबलस्पून चहा पावडर, जास्वंदीच्या फुलांच्या सुकलेल्या पाकळ्या, बीटरूटचा रस इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
हेअर मास्क कसा तयार करायचा ?
सगळ्यांत आधी एका मोठ्या बाऊलमध्ये मेहेंदी पावडर काढून घ्यावी. त्यानंतर, एका भांड्यात पाणी गरम करून त्यात अळशीच्या बिया घालाव्यात त्या हलकेच गरम करून त्या पाण्याचे जेलमध्ये रूपांतर होऊ द्यावे, मग हे अळशीचे तयार जेल मेहेंदी पावडर मध्ये घालावे. मग एका भांडयात पाणी घेऊन त्यात कलोंजी, मेथी दाणे, चहा पावडर, जास्वंदीच्या फुलांच्या सुकलेल्या पाकळ्या असे सगळे घटक घालूंन ते पाणी मंद आचेवर उकळवून घ्यावे. मग हे पाणी उकळल्यावर गॅस बंद करून गाळून घ्यावे. गाळून घेतलेले हे पाणी आपण मेहेंदी पावडरमध्ये ओतावे. सगळ्यात शेवटी या मेहेंदी पावडरमध्ये बीटरूटचा रस घालावा. आता हे सगळे जिन्नस चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. केसांसाठी मेहेंदी आणि खास औषधी हेअर मास्क देखील तयार आहे.
आईबाबांसोबत आता लहान मुलांचेही केस होतात पांढरे, काळ्या केसांसाठी पाहा ‘हा’ उपाय-टाळा केमिकल...
या हेअर मास्कचा वापर केसांसाठी कसा करावा ?
सगळयात आधी केसांचा गुंता सोडवूंन घ्यावा. त्यानंतर ब्रश किंवा हातांच्या मदतीने हा तयार मेहेंदीचा हेअर मास्क केसांवर व्यवस्थित लावून घ्यावा. मग ३ तास हा हेअर मास्क केसांवर तसाच लावून ठेवून द्यावा. ३ तासानंतर केस फक्त पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. मग केस व्यवस्थित सुकल्यानंतर केसांवर हलकेच तेल लावावे रात्रभर केसांवर तेल तसेच लावून ठेवावे. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे केस शाम्पूने स्वच्छ धुवून घ्यावेत.