Join us
Daily Top 2Weekly Top 5

साऊथ इंडियन महिलांचा १ रुपयाचा घरगुती उपाय! काळ्याभोर, रेशमी केसांसाठी पितात खास ड्रिंक - केस वाढतील वेगाने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2026 17:50 IST

how to make beauty booster drink for skin & hair south indian ladies : how to make beauty booster drink for skin and hair : South Indian beauty drink for skin and hair : साऊथ इंडियन महिलांचे केस इतके सुंदर ठेवण्यामागे नेमकं हे घरगुती ड्रिंकच सिक्रेट काय आहे ते पाहा...

साऊथ इंडियन महिलांचे केस पाहिले की कुणालाही आश्चर्य वाटते. नैसर्गिकरीत्या लांबसडक, काळेभोर, जाड आणि घनदाट केस हे त्यांच्या सौंदर्याचे खास वैशिष्ट्य मानले जाते. दाट, काळेभोर आणि गुडघ्यापर्यंत लांब सडक केस ही दक्षिण भारतीय (South Indian) महिलांची जणू ओळखच आहे. साऊथ इंडियन अभिनेत्री (South Indian ladies beauty secret drink) असोत किंवा सामान्य महिला, त्यांच्या केसांची चमक आणि ताकद नेहमीच आपल्याला थक्क करते. अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की, इतकी धावपळ आणि प्रदूषण असूनही त्यांचे केस इतके सुंदर कसे? आपण महागडे शॅम्पू आणि पार्लर ट्रिटमेंट करून जे मिळवू शकत नाही, ते त्यांना सहज कसं जमतं? (how to make beauty booster drink for skin & hair south indian ladies).

आपले केस लांबसडक, घनदाट आणि काळेभोर असावेत, अशी प्रत्येक महिलेंची इच्छा असते. दक्षिण भागातील महिलांचे लांबसडक, जाडजूड आणि काळेभोर केस हे नेहमीच चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरतो. या महिलांचे एवढे लांब, दाट आणि काळेभोर केस, वयाच्या कित्येक वर्षी कायम तसेच कसे काय टिकून राहतात. त्यांच्या केसांची नैसर्गिक चमक आणि मजबुती ही प्रत्येक महिलेला हवीहवीशी वाटते, पण यासाठी नेमकं कायचं काय असा प्रश्न पडतो. केसांच्या सौंदर्याचे हे गुपित कोणत्याही महागड्या उत्पादनांत नसून त्यांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या खास घरगुती (how to make beauty booster drink for skin and hair) उपायांमध्ये दडलेले आहे. निसर्गातील शुद्ध घटकांचा वापर करून केसांची निगा कशी राखायची, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.

दक्षिण भारतात, विशेषतः नैसर्गिक व आयुर्वेदिक घटकांचा वापर करून एका खास पद्धतीचे ड्रिंक तयार करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, जी केसांच्या मुळांना पोषण देऊन त्यांना मजबुती देते आणि केसांची वाढ होण्यास मदत करते. साऊथ इंडियन महिलांचे केस इतके सुंदर ठेवण्यामागे नेमकं हे घरगुती ड्रिंकच सिक्रेट काय आहे आणि हे घरगुती ड्रिंक पारंपरिक पद्धतीने घरच्याघरी (south indian women hair care routine) कसं तयार करायचं ते पाहूयात…

केसांचे आरोग्य व सौंदर्य जपण्यासाठी हे खास घरगुती ड्रिंक कसं तयार करायचं... 

केसांच्या सौंदर्यासाठी हे घरगुती ड्रिंक तयार करण्यासाठी आपल्याला आवळा १/२ कप, आल्याचे तुकडे २ छोटे तुकडे, कच्च्या हळदीचे २ छोटे तुकडे, ४ ते ५ काळीमिरीचे दाणे इतक्या साहित्याची गरज आहे. 

शाम्पूमध्ये २ पदार्थ मिसळल्याने केस होतील गुडघ्यापर्यंत लांब! केसगळती होईल दूर - सुंदर केसांचे सुपरहिट सिक्रेट...

१ रुपयाही खर्च न करता काढा नाकावरचे ब्लॅकहेड्स मिनिटभरात! ५ मॅजिकल उपाय - त्वचा होईल आरशासारखी नितळ... 

असे तयार करा हेअर ग्रोथ मॅजिक ड्रिंक... 

सर्वात आधी घेतलेले सर्व पदार्थ स्वच्छ धुवून घ्या आणि आलं, कच्च्या हळदीची साल काढून छोटे तुकडे करा. आवळ्याची साल काढण्याची गरज नाही. आवळा स्वच्छ धुवून त्याचे थेट छोटे तुकडे करून घ्या. आता हे सर्व तुकडे मिक्सरच्या भांड्यात टाका.चवीसाठी वरून थोडी काळीमिरी पूड किंवा दाणे घाला. मिक्सर मध्ये आवश्यकतेनुसार पाणी मिसळा आणि सर्व मिश्रण व्यवस्थित वाटून घ्या. मिश्रण एकजीव झाले की, एका गाळणीच्या मदतीने हा रस गाळून घ्या. तुमचे 'हेल्थ अँड हेअर ड्रिंक' तयार आहे. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही हे पेय रोज सकाळी बनवून पिऊ शकता. हे ड्रिंक एकदाच जास्त प्रमाणात तयार करू तुम्ही ते आईस ट्रे मध्ये भरून ठेवू शकता आणि फ्रिजरमध्ये ठेवून त्याचे खडे (Ice Cubes) तयार करू शकता. आता तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे की, रोज सकाळी एका पेल्यात गरम पाणी घेऊन त्यामध्ये हा एक आईस क्यूब टाकायचा आणि ते पाणी प्यायचे आहे.

या ड्रिंकचे फायदे... 

१. त्वचा आणि केस :- तुमचे केस लांबसडक होतात आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते.

२. पचनसंस्था :- हे पेय पोटाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असून पचनशक्ती सुधारते.

३. संपूर्ण आरोग्य :- हे ड्रिंक प्यायल्याने फक्त सौंदर्याचीच नाही, तर आपल्या आरोग्याचीही उत्तम काळजी घेऊ शकता.

English
हिंदी सारांश
Web Title : South Indian women's secret: A homemade drink for hair growth.

Web Summary : South Indian women's long, black hair is admired. Their secret? A homemade drink with ingredients like amla, ginger, and turmeric. Drink promotes hair growth, skin health, and digestion. Regular intake leads to strong, lustrous hair.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय