वाढत्या केसगळतीमुळे अनेकजण हैराण झाले आहेत. आजकाल ताण-तणावामुळे अनेकांना केसांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. आजकाल केस खूप गळतात ही तक्रार जवळपास प्रत्येक घरात ऐकायला मिळते.(South Indian hair care) महिला असोत वा पुरुष, तरुण असोत वा मध्यमवयीन केसगळती हा आता सामान्य पण त्रासदायक विषय बनला आहे. आंघोळ करताना, केस विंचरताना किंवा उशीवर पडलेले केस पाहिले की अनेकांना भीती वाटू लागते.(hair oil for hair growth) केस गळणं थोड्या प्रमाणात नैसर्गिक असलं तरी ते वाढू लागलं की त्यामागची कारणं समजून घेणं गरजेचं ठरतं.(hair massage benefits)महागडे शॅम्पू, सिरम किंवा ट्रीटमेंट्स करुनही अनेकांना केस गळती, कोरडेपणा आणि केस न वाढण्याची समस्या सतावत असते.(natural hair growth oil) अशावेळी आपल्या लक्षात एकच गोष्ट येते साउथ इंडियन मुलींचे केस इतके लांब, दाट आणि चमकदार कसे? त्या कोणतंही महागडं प्रॉडक्ट वापरत नसून, केसांच्या निगेसाठी वापरलं जाणारं एक खास तेल आणि त्याची योग्य पद्धत हे मुख्य कारण मानलं जातं.
साउथ इंडियन हेअर केअरमध्ये सर्वाधिक वापरलं जाणारं तेल म्हणजे नारळाचे तेल. पण हे साध नारळाचे तेल नसून अनेकदा आयुर्वेदिक घटकांसोबत वापरलं जातं. शुद्ध कोल्ड-प्रेस्ड नारळ तेल केसांच्या मुळांपर्यंत खोलवर पोहोचतं. यामुळे टाळू तर कोरडी राहाणार नाही. केसांच्या मुळांना पोषण मिळतं आणि केसगळती कमी होण्यास मदत होते.
केसांच्या वाढीसाठी योग्य तेल आणि टाळूची मालिश होणं देखील गरजेचं आहे. शुद्ध नारळाच्या तेलात कढीपत्ता, आवळा, भृगंराज किंवा मेथी मिसळून तेल तयार केलं जातं. या घटकांमुळे केसांची वाढ अधिक जोमाने होण्यास मदत मिळते. या तेलात असणारे पोषक घटक केसांच्या मुळांना बळकटी देतात.
तेल लावण्याची पद्धतही तितकीच महत्त्वाची आहे. आठवड्यातून दोन वेळा केसांना कोमट तेल घेऊन टाळूवर मालिश केल्यास फायदा होतो. तसेच केसांची चंपी केल्याने रक्ताभिसरण सुधारतं आणि केसांच्या मुळापर्यंत पोषण पोहोचतं. रात्रभर केसांना तेल लावून दुसऱ्या दिवशी सौम्य शाम्पूने केस धुतले जातात. केसांना योग्य पद्धतीने तेल लावल्यास फायदा होईल.
Web Summary : Battling hair fall? South Indian women use special coconut oil infused with Ayurvedic ingredients like curry leaves and amla. Regular warm oil massages improve circulation and nourish roots, promoting rapid growth and reducing hair loss. It's a natural, effective solution.
Web Summary : बालों के झड़ने से परेशान हैं? दक्षिण भारतीय महिलाएं करी पत्ते और आंवला जैसे आयुर्वेदिक तत्वों से युक्त विशेष नारियल तेल का उपयोग करती हैं। नियमित रूप से गर्म तेल से मालिश करने से रक्त परिसंचरण में सुधार होता है और जड़ें पोषण पाती हैं, जिससे तेजी से विकास होता है और बालों का झड़ना कम होता है। यह एक प्राकृतिक, प्रभावी उपाय है।