दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा बॉलिवूडमधील फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाते. तिचा लूक, फॅशन, फिटनेस हा कायमच चर्चेचा विषय असतो. सोनाक्षी नेहमी सोशल मिडीयावर अॅक्टिव्ह असते, ती आपले फोटो,व्हिडिओ आणि फिटनेस फंडे तसेच ब्यूटी सिक्रेट इंटरनेटवर शेअर करत असते. सोनाक्षी सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्याआधी (Sonakshi Sinha Shows How To Make Hair Growth Spray) आपलं वाढलेलं वजन कमी करून, फिट अँड फाईन झाली होती. सोनाक्षी आपल्या फिटनेससोबतच सौंदर्याची देखील तितकीच काळजी घेते(How to make hair growth spray at home).
त्वचा आणि केसांसाठी महागडे प्रॉडक्ट्स वापरण्याऐवजी ती नेहमी घरगुती आणि देसी उपायांना प्राधान्य देते. केसांशी संबंधित समस्या आपल्याप्रमाणेच सोनाक्षीला देखील सतावतात. केसांशी संबंधित अनेक समस्यांसाठी ती खास पदार्थांपासून तयार केलेल्या घरगुती स्प्रेचा वापर करते. या हेअर स्प्रेमुळे केस तुटणे थांबते आणि केसांची वाढ पूर्वीपेक्षा चांगली होते. अशा परिस्थितीत, जर आपण देखील केसांशी संबंधित अनेक समस्यांनी हैराण असाल तर आपण या स्प्रेचा वापर करु शकतो. आपले केस लांबसडक आणि निरोगी दिसावेत असे वाटत असेल, तर तुम्ही देखील सोनाक्षी प्रमाणेच तिचा सिक्रेट हेअर स्प्रे केसांसाठी नक्की ट्राय करून पाहू शकता.
सोनाक्षीचा सिक्रेट हेअर स्प्रे कसा तयार करायचा ?
साहित्य :-
१. मेथी दाणे :- १ टेबलस्पून
२. रोझमेरी - १ कप
३. लवंग - १ टेबलस्पून
४. पाणी - १ ग्लास
कृती :-
हा घरगुती हेअर स्प्रे तयार करण्यासाठी सर्वातआधी, एका भांड्यात पाणी घेऊन ते पाणी व्यवस्थित उकळवून घ्यावे. त्यानंतर पाण्यांत रोझमेरी, लवंग आणि मेथीचे दाणे घाला आणि ते चांगले उकळवा. पाणी व्यवस्थित उकळल्यावर ते थंड करा, गाळून घ्या आणि नंतर ते स्प्रे बाटलीत भरुन स्टोअर करा. हा हेअर स्प्रे केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत स्प्रे करून हलक्या हाताने मसाज करून घ्यावा. एक ते दीड तास केसांवर ते तसेच राहू द्यावे. त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्यावेत.
खोबरेल तेलात मिसळा 'हा' पदार्थ आणि सनस्क्रीन तयार, नको महागडे सनस्क्रीन - होईल पैशांची बचत...
दह्यात चमचाभर 'हे' पीठ कालवून खा! त्वचा दिसेल तरुण - चेहऱ्यावरुन ओळखताच येणार नाही तुमचं वय...
हा हेअर स्प्रे केसांना लावण्याचे फायदे...
१. रोझमेरी :- रोझमेरीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. याचबरोवर, यात अँटी-ऑक्सिडंट्सने आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म देखील फार मोठ्या प्रमाणात असतात. रोझमेरी स्कॅल्पमधील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करते. याचबरोबर, रोझमेरी कोंडा आणि स्काल्पला येणारी खाज दूर करण्यासाठी देखील प्रभावी आहे. केसांवर स्प्रे म्हणून लावण्याव्यतिरिक्त, तुम्ही रोझमेरी तेल देखील केसांसाठी वापरू शकता.
२. लवंग :- लवंगामध्ये अँटीमायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म भरपूर असतात. यामुळे स्काल्पची त्वचा निरोगी राहते आणि केस चमकदार देखील दिसतात.
३. मेथी दाणे :- मेथीचे दाणे केसांसाठी खूप फायदेशीर ठरतात. केसगळती नियंत्रित करण्यास, केसांची वाढ होण्यासाठी, केस मजबूत करण्यास आणि कोंड्याची समस्या कमी करण्यास मदत करते. मेथीमध्ये प्रथिने, लोह आणि जीवनसत्त्वे देखील चांगल्या प्रमाणात असतात, यामुळे केसांच्या वाढीस अधिक मदत होते.