Join us  

चेहरा सुंदर दिसावा म्हणून प्रयत्न करतो, पण त्वचेचं काय?लपवलं तरी त्वचा खरं वय सांगतेच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 3:51 PM

वयाच्या विशीत-तिशीत-चाळीशीत त्वचा बदलते, त्याप्रमाणे तिची निगा राखायला हवी.

ठळक मुद्देरोजच्या अनियमित आहारवेळांमुळे शरीरात रक्ताभिसरण योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे मग व्हीटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी शरीराला योग्य प्रमाणात मिळत नाही. मग चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला सुरुवात होते..

श्रावणी बॅनर्जी 

सुंदर दिसणं नक्की कशावर अवलंबून असतं? रंगावर? मग कतरिना सुंदर आहे आणि बिपाशा किंवा प्रियांका नाही असं आपण म्हणू का? नाही ना? मग गोरं होण्यासाठी आपण सतराशे नव्वद क्रिम्स का? लावतो. आपण वर्षानुवर्षे  जाहिरातीतलं प्रोडक्ट घरी आणतो आणि मग आपापले प्रयत्न करतो, छान दिसावं म्हणून.पण खरंच हे असं सगळं करून आपण छान दिसतो असं आपल्याला वाटतं का? आपली त्वचा सुंदर आहे असं आपण म्हणतो का? त्वचा हा आपल्या शरीराचा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आपण आपल्याला वाटेल ते करून आपल्या त्वचेचे आणखी हाल करून घेत असतो. आपण वेळेवर जेवतो का? ताजी फळं किंवा ज्युस नियमित घेतो का?  आपण तर पोटॅटो चिप्स किती खातो. पाणी पुरी, पावभाजी असलं सगळं अरबट चरबट खातो. खूप काम आहे म्हणून मग खूप कॉफी प्या किंवा मग उगाचच व्यसन म्हणून चहाचे कपच्या कप पोटात ढकलतो ना. या असल्या शेड्यूलमुळे आपल्या स्किनचंच सोडा तर आरोग्याचंही नुकसान होतं.रोजच्या अनियमित आहारवेळांमुळे शरीरात रक्ताभिसरण योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे मग व्हीटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी शरीराला योग्य प्रमाणात मिळत नाही. मग चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला सुरुवात होते.. त्वचा खराब होण्यामागे आणखी एक कारण म्हणजे सतत उन्हात किंवा धुळीत जाणं. यामुळे त्वचा खराब होतेच पण ब्लॅक हेड्, डेड स्किन असे प्रकारही होतात.

काय कराल मग अशा वेळी? कशी घ्याल काळजी तुमच्या त्वचेची?

1. या सगळ्यासाठी जगण्यात नियमितता आणायला हवी. रोज जेवायला हवं वेळच्यावेळी.2. वयानुसारापली त्वाचा बदलत राहते. आपण वयापरत्वे आणखीन मॅच्युअर होत जातो. विशीत या वयात सुरकुत्यांची वगैरे काळजी करण्याची मुळीच गरज नाही. कारण या वयात आपल्या शरीरात कोलॅजन खूप प्रमाणात असतं, त्वचा तरूण असते. पण या वयात सगळ्यात मोठी समस्या असते ती पिंपल्सची. त्यामुळे या वयात त्वचा खूप तेलकट होते. किंवा जर मुळातच त्वचा कोरडी असेल तर पिंपल्समुळे डाग पडणं, ब्लॅक हेड्स होणं असलं काही होत राहतं. पिंपल्स थांबवण्यासाठी क्लिनअप करणं किंवा रोजच्या रोज सकाळी आणि रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुणं, सनस्क्रीन वापरणं,  खूप पाणी पिणं असे उपाय करणं गरजेचं असतं.3. तिशीत एकूणच त्वचा धड ना तेलकट धड ना कोरडी अशा स्थितीत असते. त्वचेचा काही भाग कोरडा असतो काही भाग खूप तेलकट होतो. या वयात आपल्या शरीरात  व्हिटॅमिन बी, सी आणि इ कमी झालेलं असतं. त्यामुळे उन्हाचा खूप त्रास होतो. ब्लॅक हेड्स प्रचंड प्रमाणात होतात. हे टाळण्यासाठीआहारात हे सारे व्हिटॅमिन्स असावेत. गरज पडल्यास औषध घ्यावे, क्रीम तशा वापराव्यात.4. चाळीशीत त्वचेचे प्रश्न जास्त जाणवू लागतात. डोळ्याजवळ आणि ओठांजवळ सुरकुत्या पडायला सुरवात होते. त्वचेतलं तेलाचं प्रमाण कमी होतं. याकाळात त्वचेतले मॉइश्चरायझर डॉक्टरांच्या मदतीनं सांभाळायला हवं.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी