कमी वयात केस पांढरे होणं हे आता खूपच कॉमन झालं आहे. तिशीच्या आतबाहेर असणाऱ्या कित्येक लाेकांचेही केस हल्ली पांढरेच आहेत. आता पांढरे केस लपवायचे म्हणजे त्यांना नियमितपणे मेहेंदी लावणं किंवा डाय- कलर करणं गरजेचं आहे. पण या दोन्ही गोष्टी खूप वेळखाऊ आहेत. कधी कधी असंही होतं की आपल्याला अचानक एखाद्या कार्यक्रमाला, मिटिंगला किंवा कुठेतरी फिरायला, समारंभाला जाण्याचं आमंत्रण येतं. त्यामुळे मग पांढरे झालेले केस काळे करायला अजिबातच वेळ नसतो. म्हणूनच अशावेळी ही एक खास पावडर तुमच्याकडे तयार असू द्या. ही पावडर थेट पांढऱ्या केसांवर लावून टाका. जोपर्यंत तुम्ही केस धुणार नाही, तोपर्यंत ती पावडर तुमच्या केसांमधून निघणार नाही. बघा त्यासाठी नेमकं काय करायचं...(simple trick to turn your gray hair into black instantly)
पांढरे केस इंस्टंट काळे करण्याचा उपाय
पांढरे केस अगदी झटपट काळे कसे करायचे याचा एक मस्त व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सांगण्यात आल्यानुसार २ चमचे बडिशेप घ्या. गॅसवर लोखंडी तवा किंवा कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये बडिशेप घालून ती चांगली भाजून घ्या.
Summer Shopping: AC खरेदी करताना 'या' गोष्टी तपासून घ्या, नाहीतर पैसा वाया गेलाच म्हणून समजा..
बडिशेप अगदी काळी होईल एवढे भाजावी. त्यानंतर त्यात थोडी कॉफी पावडरही घालावी. आता बडिशेप थंड झाल्यानंतर ती मिक्सरमध्ये घाला किंवा खलबत्त्यात कुटून अगदी बारीक पावडर तयार करा. ही पावडर एखाद्या डब्यात भरून ठेवा. जेव्हा तुम्हाला अगदी झटपट केस काळे करायचे असतील तेव्हा एखाद्या ब्रशने किंवा सरळ हाताच्या बोटांनीच ही पावडर पांढऱ्या केसांवर लावा. केस लगेचच काळे होतील.
हे उपाय करून पाहा..
१. पांढरे केस अगदी झटपट काळे करायचे असतील तर एखाद्या जुन्या काजळाचा, मस्काऱ्याचा किंवा मग आयशॅडोचा वापरही करू शकता. ते सरळ केसांवर लावून टाकायचं. केसांना छान काळा रंग येईल.
२. वरील उपायात आपण बडिशेप भाजून त्याचा काळा रंग केसांना लावण्याचा उपाय पाहिला. त्याचप्रमाणे तुम्ही कांद्याची टरफलं भाजून त्याचा काळा रंग करून ठेवू शकता. हा काळा रंगही केसांना लावला तर तुम्ही जोपर्यंत धूत नाही तोपर्यंत केसांचा काळा रंग निघत नाही. एकदा ट्राय करून पाहा.
