Lokmat Sakhi >Beauty > Dandruff: जावेद हबीब सांगतात डोक्यातला कोंडा घालवून केस गळणं थांबविण्याचा सगळ्यात सोपा उपाय

Dandruff: जावेद हबीब सांगतात डोक्यातला कोंडा घालवून केस गळणं थांबविण्याचा सगळ्यात सोपा उपाय

Simple Solution To Control Hair Loss and Dandruff: केसात खूप कोंडा झाला असेल आणि केस गळण्याचं प्रमाण वाढलं असेल तर जावेद हबीब यांनी सांगितलेला हा सोपा उपाय करून पाहाच..(Jawed Habib explains how to get rid of dandruff and hair fall?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2025 09:15 IST2025-08-26T09:05:04+5:302025-08-26T09:15:01+5:30

Simple Solution To Control Hair Loss and Dandruff: केसात खूप कोंडा झाला असेल आणि केस गळण्याचं प्रमाण वाढलं असेल तर जावेद हबीब यांनी सांगितलेला हा सोपा उपाय करून पाहाच..(Jawed Habib explains how to get rid of dandruff and hair fall?)

simple solution to control hair loss and dandruff, jawed habib explains how to get rid of dandruff and hair fall | Dandruff: जावेद हबीब सांगतात डोक्यातला कोंडा घालवून केस गळणं थांबविण्याचा सगळ्यात सोपा उपाय

Dandruff: जावेद हबीब सांगतात डोक्यातला कोंडा घालवून केस गळणं थांबविण्याचा सगळ्यात सोपा उपाय

Highlightsत्वचेचं इन्फेक्शन कमी झालं की मग केसांची मुळं पक्की होऊन केस गळण्याचं प्रमाणही कमी होईल. काही दिवस हा उपाय करून पाहा. 

केसांच्या वेगवेगळ्या समस्या हल्ली खूप वाढल्या आहेत. त्या समस्यांपैकी बहुतांश लोकांना छळणाऱ्या २ सगळ्यात महत्त्वाच्या समस्या म्हणजे एक तर डोक्यामध्ये सतत कोंडा असणे आणि दुसरे म्हणजे केस गळण्याचं प्रमाण खूप वाढणे. बरेच लोक असे आहेत, ज्यांच्या डोक्यात कायम कोंडा असतोच.. त्या कोंड्यामुळे मग डोक्यातून खूप कुबट, घाण वास येऊ लागतो. कोंडा म्हणजे डोक्यात असलेलं एकप्रकारचं इन्फेक्शन. त्यामुळे मग केस गळण्याचं प्रमाणही वाढतं (simple solution to control hair loss and dandruff). डोक्यात सतत खाज येते आणि मग काही वेळेला तर खाजवून खाजवून जखमाही होतात. हा सगळा त्रास कमी करायचा असेल तर जावेद हबीब यांनी सांगितलेला सोपा उपाय लगेचच करून पाहा..(Jawed Habib explains how to get rid of dandruff and hair fall?)

 

डोक्यातला कोंडा आणि केस गळणं कमी करण्यासाठी उपाय

डोक्यातला कोंडा आणि गळणारे केस या दोन्ही समस्या कायमच्या घालवायच्या असतील तर नेमका काय घरगुती उपाय करावा, याविषयीची माहिती ब्यूटी एक्सपर्ट जावेद हबीब यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

दूध गरम होताना उजव्या बाजुने ढवळावं की डाव्या बाजुने? वाचा चरक संहितामधली रंजक माहिती 

यामध्ये ते सांगतात की डोक्यात घाम येऊन कोंडा होण्याचं प्रमाण खूप वाढतं. त्यामुळे स्काल्प म्हणजेच डोक्याची त्वचा स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी ते सांगतात की अगदी रोजच केसांच्या मुळाशी तसेच केसांच्या लांबीवर मोहरीचं तेल लावा.

 

मोहरीचं तेल लावून केसांना मालिश करणं मात्र टाळा. त्यानंतर साधारण अर्ध्या ते एक तासाने नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. 

हरितालिका: उपवासाच्या दिवशी ॲसिडीटी वाढून डोकं दुखतं? ६ नियम पाळा, उपवासाचा त्रास होणार नाही

यामुळे डोक्याची त्वचा स्वच्छ होईल. त्यामुळे मग डोक्यातला कोंडाही आपोआपच कमी होईल आणि एकदा त्वचेचं इन्फेक्शन कमी झालं की मग केसांची मुळं पक्की होऊन केस गळण्याचं प्रमाणही कमी होईल. काही दिवस हा उपाय करून पाहा. 


 

Web Title: simple solution to control hair loss and dandruff, jawed habib explains how to get rid of dandruff and hair fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.