Join us
Daily Top 2Weekly Top 5

केस झाडूसारखे कोरडे, रुक्ष झाले? १ सोपा उपाय- ८ दिवसांत केस होतील रेशमासारखे मऊ- सुळसुळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2026 13:43 IST

Simple Remedies For Reducing Dryness of Hair: केसांचा कोरडेपणा खूप वाढला असेल तर पुढे सांगितलेला एक सोपा घरगुती उपाय करून पाहा...(how to get smooth and silky hair?)

ठळक मुद्देआठवड्यातून एकदा हा उपाय करा. केसांवर खूप छान परिणाम दिसून येईल.

बऱ्याच जणींची अशी तक्रार असते की त्यांचे केस खूप जास्त कोरडे, खरखरीत झालेले असतात. केसांना खूप रुक्षपणा आलेला असतो. असे कोरडे केस अजिबातच चांगले दिसत नाहीत. म्हणूनच अशा केसांना जर पुन्हा एकदा छान सिल्की, चमकदार करायचं असेल तर पुढे सांगितलेला एक सोपा घरगुती उपाय करून पाहा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अजिबातच जास्तीचे पैसे खर्च करण्याची गरज नाही (how to get smooth and silky hair?). घरगुती साहित्य वापरून केसांना अतिशय उत्तम इफेक्ट मिळवून देणारा हा उपाय नेमका कसा करायचा ते पाहा...(home hacks for silky and shiny hair)

 

केस सिल्की, चमकदार होण्यासाठी उपाय

केसांना छान चमक येऊन ते अगदी सिल्की व्हावेत, यासाठी कोणता घरगुती उपाय करता येऊ शकतो याविषयीची माहिती mirror_salon_academy_nashik या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

सतत माकड हाड दुखतं, बसणं-उठणं झालं अवघड? ३ सोपे व्यायाम करा-दुखणं होईल कमी

हा उपाय करण्यासाठी आपल्याला ग्रीन टी आणि नारळाचं दूध लागणार आहे. सगळ्यात आधी तर १ कप पाण्यामध्ये २ टेबलस्पून ग्रीन टी घाला आणि तो चांगला उकळवून घ्या. थंड झाल्यानंतर त्यामध्ये ३ चमचे नारळाचं दूध आणि १ टीस्पून लिंबाचा रस घाला. जर तुमचे केस खूपच कोरडे असतील तर यामध्येच १ टीस्पून खोबरेल तेलही घालू शकता.

आता हे सगळे पदार्थ कालवून एकत्र करा. याने सुरुवातीला स्काल्पला मसाज करा आणि नंतर केसांच्या लांबीवरही लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने एखादा माईल्ड शाम्पू वापरून केस धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा उपाय करा. केसांवर खूप छान परिणाम दिसून येईल.

 

हा उपायही करून पाहा

केस जर खूप काेरडे झाले असतील तर एक छान पिकलेली केळी घ्या. ती हातानेच बारीक कुस्करून घ्या. त्यामध्ये १ चमचा मध आणि २ ते ३ चमचे कोरफडीचा ताजा गर घाला.

मोगऱ्यावर शिंपडा 'हा' घरगुती स्प्रे, पान दिसणार नाही इतक्या येतील कळ्या- रोज काढा परडीभर फुलं

तिन्ही पदार्थ व्यवस्थित कालवून एकत्र करून घ्या आणि स्काल्पपासून ते केसांच्या शेवटच्या टोकापर्यंत लावा. अर्ध्या तासाने केस धुवून टाका. कोरफड आणि केळी या दोघांमुळे केसांना खूप छान मऊपणा आणि चमकदारपणा येतो. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Dry, rough hair fix: Simple home remedy for silky hair.

Web Summary : Transform dry, rough hair into silky locks with a simple home remedy using green tea and coconut milk. Alternatively, a banana, honey, and aloe vera mask can restore moisture and shine. Use weekly for best results.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी