Join us

केस गळणं होईल बंद- चमचाभर लवंग घेऊन करा खास उपाय- १ महिन्यात केस होतील लांब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2025 15:28 IST

Simple Home Remedy For Long Hair: केस गळण्याचं प्रमाण खूप वाढलं असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..(how to reduce hair fall?)

ठळक मुद्देकेस गळण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाय केला पाहिजे?

हल्ली केस गळण्याची समस्या खूप जास्त वाढली आहे. याचं कारण म्हणजे आहारातून आपल्या केसांना पुरेसं पोषण मिळत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कामानिमित्त राेजच घराबाहेर पडावं लागत असल्याने वाढती धूळ, धूर, प्रदुषण, ऊन यांचा माराही केसांना सहन करावा लागतो. शिवाय केसांची दर आठवड्याला देखभाल करणेही अनेकींना शक्य नसते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा केसांवर एकत्रित परिणाम होतो आणि त्यामुळे मग केस गळण्याचे प्रमाण वाढते (simple trick to control hair loss). एकीकडे केस खूप जास्त गळायला लागतात आणि दुसरीकडे त्यांची वाढ एकदम खुंटल्यासारखी होते (home hacks for fast hair growth). असं तुमच्याही केसांच्या बाबतीत होत असेल तर हा एक अतिशय सोपा उपाय करून पाहा.(simple home remedy for long hair)

 

केस गळणं कमी होऊन केसांची वाढ होण्यासाठी उपाय

केस गळण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाय केला पाहिजे, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ shiprarai2000 या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

फेशियलसाठी वेळ नाही? 'हा' घरगुती मास्क लावा; १० मिनिटांत कमाल पाहा- सोन्यासारखा चमकेल चेहरा

हा उपाय करण्यासाठी आपल्या ८ ते १० लवंग आणि ग्लासभर पाणी लागणार आहे. एका पातेल्यामध्ये पाणी घ्या आणि ते पाणी गॅसवर गरम करायला ठेवा.

आता लवंग थोड्याशा फोडून घ्या आणि पातेल्यामधल्या पाण्यामध्ये घाला. आता हे पाणी ७ ते ८ मिनिटे चांगलं खळखळ उकळू द्या. पाणी उकळून साधारण पाऊण ग्लास एवढं झालं की गॅस बंद करा. हे पाणी थंड झाल्यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.

 

आता हे पाणी तुमच्या केसांसाठी अतिशय गुणकारी ठरणार आहे. हे पाणी तुमच्या केसांच्या मुळाशी लावा. हळूवार आताने मसाज करा. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवून टाका. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा.

सिंकमध्ये, नळावर बोअरवेलच्या पाण्याचे पांढरे डाग पडले? १ सोपा उपाय- डाग जाऊन सिंक चमकेल

लवंगमध्ये असणाऱ्या ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीफंगल घटकांमुळे केसांमधला कोंडा कमी होतो. शिवाय केसांच्या त्वचेखाली रक्तप्रवाह वाढतो. यामुळे केसांची मुळं पक्की हाेतात आणि त्यामुळे केस गळण्याचं प्रमाण बरंच कमी होतं. शिवाय केसांची चांगली वाढ होण्यासही मदत होते. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी