Join us  

नवऱ्याची शेविंग क्रिम घरातल्या 'या' कामांसाठी ठरेल उपयोगी; वाचा कमी खर्चाचा सोपा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 7:17 PM

Shaving cream benefits : या उत्पादनांचा वापर सौंदर्य वाढविण्यासाठी तसेच घरातील इतर समस्यांचे निवारण करण्यासाठी केला जातो. यामध्ये पुरुष आणि स्त्रिया दोघांनी वापरलेल्या उत्पादनांचा समावेश आहे.

ठळक मुद्देजर तुमच्याघरी सोफा, बेड लेदरचा असेल तर त्याची अधिक काळजी घ्यावी लागते. लेदरच्या फर्निचरवर अनेकदा तेलाचे हात लावल्यानं डाग दिसून येतात. जिथे तेलकट, चिकट डाग असतील  ते घालवण्यासाठी तुम्ही शेविंग क्रीम लावू शकता.

घरात जर एखादी शेविंग क्रिम पडून असेल तिचा वापर फक्त दाढी करण्यासाठी पुरूषांकडून केला जातो.  वापरात नसलेली  शेविंग क्रिम पडून असेल किंवा  फारसा वापर झाला नाहिये. अशी शेविंग क्रिम तुम्ही घरात साफसफाई करण्यासाठी वापरू शकता. अशी काही कॉस्मेटिक उत्पादने आहेत जी प्रत्येकाच्या घरात आढळतात. या उत्पादनांचा वापर सौंदर्य वाढविण्यासाठी तसेच घरातील इतर समस्यांचे निवारण करण्यासाठी केला जातो.

यामध्ये पुरुष आणि स्त्रिया दोघांनी वापरलेल्या उत्पादनांचा समावेश आहे. विशेषत: पुरुषांद्वारे वापरल्या जात असलेल्या शेव्हिंग क्रीमबद्दल अशी समजूत आहे की त्याचा इतर कोणत्याही उपयोगात येऊ शकत नाही. पण तसं नाही आपण त्याचा वापर इतर कामांसाठी देखील करू शकता. विशेषतः, आपण वस्तू स्वच्छ करण्यासाठी शेव्हिंग क्रीम वापरू शकता.

फर्निचरची साफसफाई

जर तुमच्याघरी सोफा, बेड लेदरचा असेल तर त्याची अधिक काळजी घ्यावी लागते. लेदरच्या फर्निचरवर अनेकदा तेलाचे हात लावल्यानं डाग दिसून येतात. जिथे तेलकट, चिकट डाग असतील  ते घालवण्यासाठी तुम्ही शेविंग क्रीम लावू शकता. शेविंग क्रिम लावल्यानंतर ३० मिनिटं तसंच ठेवा.  त्यानंतर एका स्वच्छ कापडाच्या मदतीनं शेविंग क्रिम तुम्ही साफ करू शकता. या उपायानं तेलाचे डाग लवकर निघून जाण्यास मदत होते. 

चांदीचे दागिने स्वच्छ करता येतात.

सगळ्यांच्याच घरात चांदीचे नाणे, दागिने असतात.  खासकरून महिलांच्या रोजच्या वापरातील जोडवे, पैंजण हे चांदीचेच असतात. रोज वापरून त्याची चमक कमी होऊ लागते. अशा स्थितीत  चांदीच्या वस्तू आणि दागिन्यांवरची चमक परत आणण्यासाठी तुम्ही शेविंग क्रिमचा वापर करू शकता. काही वेळासाठी दागिने ही क्रिम लावून तशीच ठेवा. त्यानंतर पाण्यानं  स्वच्छ धुवा. ज्वेलरीचं पाणी पूर्णपणे सुकण्याची वाट पाहा. त्यानंतर तुम्ही वॉलपेपर किंवा नॅपकिनमध्ये फोल्ड करून ठेवू शकता. 

आरश्यांची स्वच्छता

बाथरूम, बेडरूम असो किंवा हॉल असतो प्रत्येक ठिकाणी आरसा असतो. घराचं सौंदर्य वाढवण्यासह चेहरा पाहण्यासाठी आरश्याचा वापर केला जातो. आरश्याची व्यवस्थित साफ सफाई केली गेली नाही तर डाग पडतात आणि जुनाट वाटू लागतो. शेविंग क्रिमचा वापर करून तुम्ही आरसा नवा कोरा करू शकता. तर तुमच्या आरश्याला पाण्याचे डाग लागले असतील शेविंग क्रिमचा वापर करून हे डाग काढता येतील.  

नेलपेंट रिमुव्हर

शेव्हिंग क्रीम देखील महिलांसाठी उपयुक्त ठरू शकते. आपलं नेल पेंट रीमूव्हर संपली असल्यास आपण शेव्हिंग क्रीमने नेल पेंट काढून टाकू शकता. यासाठी, आपल्याला आपल्या नखांवर शेव्हिंग क्रीम लावावी लागेल आणि 10 मिनिटे सोडा आणि मग  कापसाने पुसा. या उपायानं नखांतून नेल पेंट काढून टाकली जाईल. पण नेल पेंट काढण्यासाठी शेव्हिंग क्रीमचा कायमचा उपाय म्हणून विचार करू नका. नेल पेंट काढण्यासाठी चांगलं नेलपेंट रिमुव्हर उपयुक्त ठरतं. 

टॅग्स :ब्यूटी टिप्स