Join us

साडी नेसल्यावर फारच हडकुळ्या दिसता? बारीक महिलांनी साडी नेसताना लक्षात ठेवाव्या ५ टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2025 19:23 IST

Saree Draping Tips For Slim Women: बारीक मुली किंवा महिला साडी नेसल्यावर आणखीनच बारीक, हडकुळ्या, अशक्त दिसतात. असं होऊ नये म्हणून साडी नेसताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी...(how to wear saree to look little bit healthy?)

ठळक मुद्दे'काठीला साडी गुंडाळल्यासारखे वाटते आहे', अशा कमेंटही त्यांना ऐकाव्या लागतात. असं होऊ नये म्हणून ....

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे एरवी फारशा साड्या न नेसणाऱ्या महिला किंवा तरुणी लग्नसराईच्या निमित्ताने हमखास भरजरी साड्या नेसतात. बहुतांश जणींचा हा अनुभव असतो की एरवी ड्रेस किंवा जीन्स घातल्यानंतर त्या तब्येतीने थोड्या जाड दिसतात. पण साडी नेसल्यानंतर मात्र अगदी स्लिम दिसू लागतात. आता ज्या जाड असतात, त्यांच्या बाबतीत ही गोष्टी चांगली आहे. पण ज्या आधीच खूप बारीक असतात त्या साडी नेसल्यानंतर आणखीनच हडकुळ्या, अशक्त दिसू लागतात. 'काठीला साडी गुंडाळल्यासारखे वाटते आहे', अशा कमेंटही त्यांना ऐकाव्या लागतात. असं होऊ नये म्हणून ज्या महिला हडकुळ्या आहेत त्यांनी साडी नेसताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे (saree draping tips for slim women). जेणेकरून त्या साडीमध्ये खूप आकर्षक आणि छान दिसून चारचौघींत उठून दिसतील.(how to wear saree to look little bit healthy?)

 

बारीक मुलींनी साडी नेसताना काय काळजी घ्यावी?

१. बारीक मुलींनी साडी थोडी चोखंदळपणे निवडायला हवी. कारण तुमच्यासाडीचं फॅब्रिक कसं आहे हे खूप जास्त महत्त्वाचं ठरतं.

रात्रीच्या जेवणात ५ चुका कराल तर वजन- शुगर दाेन्हीही वाढेल! रक्तातली साखर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी...

जर तुम्ही अगदी तलम, पातळ फॅब्रिकची साडी नेसली तर तुम्ही त्या साडीमध्ये नक्कीच जास्त बारीक दिसाल. त्यामुळे थोडी जाडसर साडी नेसण्यास प्राधान्य द्या. ज्या साड्या नेसल्यानंतर फुगतात अशा साड्या नेसा.

 

२. ज्या महिला जाड असतात त्यांना परफेक्ट त्यांच्या मापाचाच पेटिकोट घालणे गरजेचे असते. कारण मोठ्या पेटिकोटमध्ये त्या जाड दिसतात.

दिवसभर काम करून मान- पाठ आखडते? फक्त ५ मिनिटांचं 'हे' काम करा- चटकन आराम मिळेल

पण ज्या महिला बारीक आहेत त्यांनी त्यांच्या मापापेक्षा थोडा मोठा आणि कळीदार पेटिकोट घालावा. यामुळे कंबरेचा घेर थोडा वाढलेला दिसतो आणि अगदीच काठीला साडी गुंडाळल्याप्रमाणे तुमचा लूक होत नाही.

 

३. ब्लाऊजच्या बाह्या अगदीच दंडाला चिकटलेल्या, परफेक्ट मापाच्या नको. त्याऐवजी तुम्ही फुग्यांच्या बाह्या, बेल स्लिव्ह्ज, मेगा स्लिव्ह्ज अशा बाह्यांचे ब्लाऊज घालू शकता. 

मधाने दात घासा आणि नंतर 'हा' उपाय करा! पिवळे पडलेले दात पांढरेशुभ्र होऊन चमकतील... 

४. नाजूक प्रिंटच्या किंवा प्लेन साड्या निवडण्यापेक्षा मोठ्या प्रिंटच्या साड्या नेसा.यामुळे तुम्ही आहात त्यापेक्षा जाड दिसण्यास मदत होईल.  

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सफॅशनसाडी नेसणे