केसांना तेल लावणे म्हणजे केसांची निगा राखण्याचा सर्वात महत्त्वाचा आणि बेसिक भाग आहे. केसांना तेल लावल्याने केस मजबूत होतात, त्यांना पोषण मिळते आणि ते चमकदार दिसतात हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आपल्यापैकी बऱ्याचजणी तेल थेट हातावर घेऊन ते केसांवर चोळून लावतात आणि केसांना तेल लावण्याची ही पद्धत आपण पुरेशी आहे असे समजतो. परंतु प्रत्यक्षात ही पद्धत चुकीची ठरू शकते. कारण अशा प्रकारे लावलेले तेल केसांच्या फक्त वरवरच्या भागावरच रहाते आणि मुळांपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे केसांना तेलाचे खरे पोषण मिळतच नाही(best way to apply hair oil for hair growth).
डॅन्ड्रफ, केसगळती, कोरडे रुक्ष व निस्तेज केस, केसांना फाटे फुटणे यांसारख्या समस्या वाढण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे तेल लावण्याची चुकीची पद्धत. जर केसांना योग्य पद्धतीने तेल लावून मसाज केल्यास स्काल्पचे रक्ताभिसरण वाढते, केस मुळापासून मजबूत होतात आणि केसांची वाढही जलद गतीने होते. केसांना तेलाचे अधिक पोषण मिळावे म्हणून तेल लावण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत कोणती ज्यामुळे केस मुळापासून मजबूत होतील, त्यांचे तुटणे थांबेल ( how to apply hair oil correctly) आणि त्यांना नैसर्गिक चमक मिळेल.
केसांना तेलाचे संपूर्ण पोषण मिळावे यासाठी तेल लावण्याची पद्धत...
केसांना योग्य पद्धतीने तेल लावताना आपल्याला २ ते ३ टेबलस्पून खोबरेल तेल, १ टेबलस्पून एरंडेल तेल, २ व्हिटामिन 'ई' कॅप्सूल, ग्लासभर कोमट गरम पाणी, एक नॅपकिन इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
केसांना तेल नेमकं कसं लावावं ?
केसांना योग्य पद्धतीने तेल लावण्यासाठी सर्वातआधी एका बाऊलमध्ये खोबरेल तेल घेऊन त्यात एरंडेल तेल व २ व्हिटामिन 'ई' च्या कॅप्सूल फोडून त्यातील जेल घालावे. आता हे सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. आता एका भांड्यात पाणी घेऊन ते गॅसच्या मंद आचेवर गरम करून घ्यावे. मग या गरम पाण्यात तेलाची वाटी ठेवून डबल बॉयलर पद्धतीने तेल ५ ते १० मिनिटे व्यवस्थित गरम करून घ्यावे. त्यानंतर हे कोमट तेल बोटांच्या मदतीने स्काल्प आणि केसांच्या मुळांवर तसेच संपूर्ण केसांवर लावून हलकेच मसाज करून घ्यावा. त्यानंतर किमान २ ते ३ तास हे तेल केसांवर तसेच लावून ठेवावे.
३ तासानंतर एक नॅपकिन घेऊन तो गरम पाण्यात भिजवून घ्यावा. या नॅपकिनमधील जास्तीचे पाणी काढून घ्यावे. असे हे गरम पाण्यांत भिजवून घेतलेले टॉवेल स्काल्पवर २ ते ३ सेकंदांसाठी ठेवून द्यावे, हीच स्टेप २ ते ३ वेळा पुन्हा करावी. आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा असा उपाय केल्यास केसांच्या अनेक समस्यांचे प्रमाण कमी होऊन केस सुंदर दिसू लागतील. असे केल्यानंतर सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यावेत. या पद्धतीने केसांना तेल लावून मसाज केल्यास केसांच्या अनेक तक्रारी दूर होऊन केसांचे आरोग्य व सौंदर्य टिकून राहील.
Web Summary : Applying hair oil directly can be ineffective. For stronger hair, mix coconut and castor oil with vitamin E. Warm the mixture and massage into the scalp. Cover with a warm towel, repeat twice, shampoo after 3 hours. Do this twice a week.
Web Summary : सीधे बालों में तेल लगाना अप्रभावी हो सकता है। मजबूत बालों के लिए नारियल और अरंडी के तेल को विटामिन ई के साथ मिलाएं। मिश्रण को गर्म करें और खोपड़ी में मालिश करें। गर्म तौलिये से ढकें, दो बार दोहराएं, 3 घंटे बाद शैम्पू करें। इसे हफ्ते में दो बार करें।