Lokmat Sakhi >Beauty > केस विरळ होऊन टक्कल पडण्यापूर्वी रोज खा ‘ही’ चटणी, केस होतील मोठे- दाट -जाडजूड

केस विरळ होऊन टक्कल पडण्यापूर्वी रोज खा ‘ही’ चटणी, केस होतील मोठे- दाट -जाडजूड

Remedy for thin hair naturally: Homemade chutney for hair growth: Best food for thicker hair: आपण रोज चमचाभर ही चटणी खाल्ली तर केसांची वाढ भराभर होईल. ही चटणी कशी बनवायची पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2025 15:59 IST2025-06-11T15:32:44+5:302025-06-11T15:59:02+5:30

Remedy for thin hair naturally: Homemade chutney for hair growth: Best food for thicker hair: आपण रोज चमचाभर ही चटणी खाल्ली तर केसांची वाढ भराभर होईल. ही चटणी कशी बनवायची पाहूया.

Remedy for thin hair naturally Homemade flaxseeds curry leaves chutney for hair growth Best food for thicker hair | केस विरळ होऊन टक्कल पडण्यापूर्वी रोज खा ‘ही’ चटणी, केस होतील मोठे- दाट -जाडजूड

केस विरळ होऊन टक्कल पडण्यापूर्वी रोज खा ‘ही’ चटणी, केस होतील मोठे- दाट -जाडजूड

केसांच गळणं, विरळ होणं, केसात कोंडा होण किंवा केस रुक्ष होणं यांसारख्या केसांच्या अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. वय वाढू लागले की केस अकाली पिकू लागतात.(Hair care tips) तर कमी वयातच केसांच्या अनेक तक्रारी सुरु होतात. केस गळतीच्या या समस्यांवर आपण अनेक घरगुती उपाय करतो. (Remedy for thin hair naturally)
केसांच्या वाढीसाठी केसांना आपण आयुर्वेदिक तेल, केमिकल फ्री शाम्पू, हेअर मास्क यांसारखे घटक लावून केस वाढवण्याचा प्रयत्न करतो.(Best food for thicker hair) केस वाढण्यासाठी आपण त्याला ट्रिम करणं, सहा महिन्यातून एकदा हेअर कट करणं, हेअर वॉश करणे यांसारख्या अनेक गोष्टी करतो.(Hair fall control home remedy) परंतु केसांना जितके बाहेरचे पोषण महत्त्वाचे असते तितकेच आतून पोषण मिळणे देखील गरजेचे आहे.(How to grow hair faster naturally) यासाठी आपण रोज चमचाभर ही चटणी खाल्ली तर आपले केस वाढण्यास मदत होईल.(Diet for thicker and longer hair)

अंडरआर्म्सचा काळपटपणा होईल दूर, पांढऱ्या पदार्थाचा 'असा' करा उपयोग, ५ सोप्या पद्धती- दिसेल फरक

केसांच्या वाढीसाठी आपण तेलात किंवा त्याचा हेअर मास्क बनवतो. हा मास्क बनवताना आपण अळशी, मेथी दाणे, कढीपत्ता याचा वापर करतो. परंतु हे पदार्थ खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळू शकतात ज्यामुळे आपली केसगळती थांबून केस वाढण्यास मदत होईल. आपण रोज चमचाभर ही चटणी खाल्ली तर केसांची वाढ भराभर होईल. ही चटणी कशी बनवायची पाहूया. 

अळशी आणि कढीपत्ता केसांसाठी खूप फायदेशीर आहे. कढीपत्त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, प्रथिने आणि बीटा-कॅरोटीन असतात. जे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी चांगले आहे. ज्यामुळे आपली केसगळती कमी होते. 

लांबसडक केसांसाठी घरगुती उपाय! मेथी दाण्याच्या पाण्यात मिसळा २ पदार्थ, मुळापासून होईल केसांची वाढ- फाटेही फुटणार नाही

साहित्य 

अळशी - अर्धा कप 
तीळ - २ चमचे 
कढीपत्त्याची पाने सुकवलेली - १० ते १२ 
लसूण पाकळ्या - ४ ते ५
सुक्या लाल मिरच्या - २ ते ३
किसलेले नारळ - १/४ कप 
मीठ - चवीनुसार 
तेल किंवा तूप 

साहित्य 

1.  सगळ्यात आधी अळशी आणि तीळ वेगवेगळ्या पद्धतीने भाजून घ्या. एका ताटात काढून थंड होण्यास ठेवा. 

2. आता कढईत तेल गरम करुन त्यात कढीपत्ता चांगला परतून घ्या. लसूण, लाल मिरच्या घालून परतवा. त्यात खोबरे घालून लालसर होऊ द्या. 

3. मिक्सरच्या भांड्यात भाजलेले सर्व साहित्य मीठ घालून वाटून घ्या. ही चटणी रोज खाल्ल्याने आपल्या शरीराला पुरेसे पोषण मिळेल. ज्यामुळे आपले केस वाढण्यास मदत होईल. 

 


 

Web Title: Remedy for thin hair naturally Homemade flaxseeds curry leaves chutney for hair growth Best food for thicker hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.