आपल्यापैकी अनेकजणींना केसांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सतावतात. काहीवेळा केसांची वाढ खुंटते, केसगळती होते, केस कमकुवत होतात, तसेच केस रुक्ष, निस्तेज आणि खराब दिसू लागतात. या सगळ्या केसांच्या समस्येमुळे हळूहळू केसांचे नैसर्गिक आरोग्य व बिघडू लागते. केसांच्या समस्या (Remedies for hair growth) एकदा सुरु झाल्या की थांबायचे नावच घेत नाहीत. केसांच्या समस्या कमी करून त्यांची नैसर्गिक पद्धतीने वाढ (Hair Roll On Mask) होण्यासाठी आपण अनेक उपाय (How to regrow hair with home remedies) करुन पाहतो. केसांच्या अनेक समस्या कमी करण्यासाठी काहीवेळा घरगुती साधेसोपे उपायही फायदेशीर ठरतात(Natural Secrets for Rapid Hair Growth in 7 Days)
केसांसाठी घरगुती उपाय करताना आपण कडीपत्ता, पुदिना आणि जास्वंदीच्या पानांचा वापर करु शकतो. खरंतर, कडीपत्ता, पुदिना आणि जास्वंदीची पाने केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर घटक मानले जातात. हे सर्व घटक केसांच्या मुळांना पोषण देतात, केसांच्या अनेक समस्या कमी करतात आणि केसांची नैसर्गिक चमक व मऊपणा टिकवून ठेवतात. या पानांपासून बनवलेला खास 'रोल ऑन हेअर मास्क' केसांची खुंटलेली वाढ झपाट्याने वाढवण्यास मदत करतो, केसगळती कमी करतो आणि स्काल्पचे रक्ताभिसरण सुधारतो. यामुळे केस अधिक दाट, मजबूत व निरोगी दिसतात. केसांसाठी हिरव्यागार पानांचा घरगुती 'रोल ऑन हेअर मास्क' कसा करायचा ते पाहा.
केसांसाठी हिरव्यागार पानांचा करा 'रोल ऑन हेअर मास्क'
केसांसाठी घरगुती हिरव्यागार पानांचा करा 'रोल ऑन हेअर मास्क' तयार करण्यासाठी, प्रत्येकी १० ते १२ जास्वंदीची पाने, कडीपत्त्याची पाने व पुदिन्याची पाने आणि २ टेबलस्पून मेथी दाणे, १/२ कप पाणी इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
नेमकं करायचं काय ?
सगळ्यांतआधी पुदिना, कडीपत्ता आणि जास्वंदीची पाने एकत्रित स्वच्छ धुवून घ्यावीत. पाने धुवून घेतल्यानंतर एका मिक्सरच्या मोठ्या भांडयात ही पाने घालावीत, त्यानंतर यात मेथी दाणे आणि थोडे पाणी ओतून घ्यावे. आता हे सगळे मिश्रण एकत्रित फिरवून त्याची पातळसर पेस्ट तयार करून घ्यावी. मग हे मिक्सरच्या भांड्यातील मिश्रण एका भांडयात काढून घ्यावे. आता गॅसच्या मंद आचेवर हे मिश्रण ठेवून थोडे उकळवून घ्यावे. मिश्रण उकळी काढत थोडे आटवून घ्यावे. मिश्रण थोडे आटवून घेतल्यावर गॅस बंद करावा आणि हे मिश्रण गाळणीने गाळून घ्यावे. गाळून घेतलेले हे मिश्रण एका छोट्या रोल ऑन बॉटलमध्ये भरुन घ्यावे.
जास्वंदीचे लालबुंद फुल करते त्वचेवर जादू! त्वचेच्या सगळ्या समस्यांवर गुणकारी सुंदर औषध...
याचा वापर कसा करावा ?
केस धुण्यापूर्वी हा हेअर रोल ऑन मास्क केसांच्या मुळांवर हलकेच चोळून लावावा. त्यानंतर ३० ते ४० मिनिटे हा रोल ऑन मास्क केसांवर तसाच लावून ठेवावा मग केस नेहमीप्रमाणे स्वच्छ धुवून घ्यावे.
केसांसाठी हा 'हेअर रोल ऑन मास्क' वापरण्याचे फायदे...
१. कडीपत्त्याची पाने :- केसांच्या मुळांना बळकटी देते आणि केसगळती कमी करण्यास मदत होते.
२. जास्वंदीची पाने :- जास्वंदीची पाने केसांची खुंटलेली वाढ झपाट्याने वाढवण्यास मदत करतात. नव्या केसांची वाढ करतो आणि दुभंगलेल्या केसांची समस्या कमी करण्यास फायदेशीर ठरते.
३. पुदिन्याची पाने :- स्काल्पला थंडावा देते व डोक्यातील खाज कमी करते.
४. मेथी दाणे :- मेथी दाण्यातील प्रथिने आणि निकोटिनिक अॅसिड केसगळती रोखतात. केस मऊ, चमकदार आणि शायनी करतात.