केसगळतीची समस्या हल्ली मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. केस कोरडे होणे, कोंडा, केसांना फाटे फुटणे यांसारख्या अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते.(scalp red patches) अनेकदा टाळूवर आपल्याला खाज लागते.(dandruff problem) कोंडा समजून आपण याकडे दुर्लक्ष करतो. पण ही खाज इतकी वाढत जाते की टाळूवर लाल चट्टे पडतात, खप्पड दिसू लागते. कोरड्या टाळूवर वेळीच उपचार केले नाही तर केस अधिक प्रमाणात गळतात. (hair loss scalp)टाळूवर ओलावा नसल्यामुळे खाज सुटणे, सोलणे आणि जळजळ होण्याची समस्या होऊ शकते. टाळू स्वच्छ करण्यासाठी आपण महागडे ट्रिटमेंट्स, शाम्पूचा वापर करतो. पण याचा आपल्या त्वचेवर परिणाम होतो. ज्यामुळे टाळू आणखी कोरडी होते. पण काही योग्य पद्धतीने टाळूची काळजी घेतल्यास ओलावा टिकून राहिल आणि केसांची मूळ मजबूत होतील. पाहूया स्वयंपाकघरातील कोणत्या ५ गोष्टी उपयोगात येतील.
कुठल्याही साडीवर मॅच होणारे पाहा सुंदर ६ ब्लाऊज, पैसे वाचवा आणि साडी नेसून दिसा हॉट स्टायलिश
१. सगळ्यात आधी आपल्याला नारळाचे तेल आणि एरंडेल तेल घ्यावे लागेल. नारळाचे तेल टाळूला खोलवर मॉइश्चरायझ करते. तर एरंडेल तेल केसांच्या मुळांना मजबूत करते. दोन्ही तेल समप्रमाणात मिसळून थोडे करम करा. टाळूला ३० ते ४० मिनिटे किंवा रात्रभर लावा. नियमितपणे तेलाने केसांची मालिश केल्यास कोरडेपणा कमी होईल आणि केसगळती नियंत्रणात राहिल.
२. टाळू अतिप्रमाणात कोरडी असेल तर कोरफडीचा गर फायदेशीर ठरू शकतो. कोरफडीमध्ये नैसर्गिक मॉइश्चरायझिंग आणि दाहक- विरोधी गुणधर्म आहेत जे कोरड्या टाळूला आराम देतात. आपण ताज्या कोरफडीचा गर टाळूला लावल्यास जळजळ कमी होईल. तसेच काही वेळाने सौम्य, केमिकलयुक्त शाम्पूने केस धुवा. यामुळे खाज सुटणे, आग कमी होईल. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्यास फायदा होईल.
३. दही आणि मधाचा हेअर पॅक. दही टाळूला पोषण देते, तर मध ओलावा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करते. एक चमचा मध एका वाटी दह्यात मिसळा आणि ते टाळूला लावा. ३० मिनिटांनी केस स्वच्छ धुवा. हा पॅक कोरड्या टाळूला मऊ करतो तसेच केस तुटण्यापासून रोखतो. आपले केस सतत कोरडे आणि रुक्ष होत असतील तर हा उपाय नक्की करुन पाहा. ४. केळी आणि ऑलिव्ह ऑइल पॅक. पिकलेले केळे टाळूच्या कोरडेपणाला आराम देतात. तर ऑलिव्ह ऑइल केसांना मजबूत करतात. यासाठी आपल्याला केळी मॅश करुन त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑइल घाला आणि ते आपल्या केसांना लावा. २० ते २५ मिनिटांनी आपले केस धुवा. हा पॅक आपल्या केसांना पोषण देईल तसेच कोरड्या केसांपासून सुटका होईल.
५. मेथीचे दाणे हे आपल्या स्वयंपाकघरात सहज आढळतात. मेथीच्या दाण्यांमध्ये प्रथिने आणि निकोटिनिक अॅसिड असते, ते केसांच्या वाढीसाठी फायदेशीर असते. मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी याची पेस्ट तयार करा. हे आपल्या टाळूला लावा आणि ३० मिनिटांनी केस स्वच्छ धुवा. यामुळे टाळूचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होईल. तसेच केसांची मुळे मजबूत होतील. या ५ घरगुती उपायांचा नियमितपणे वापर केल्यास कोरड्या टाळूमुळे होणारे केस गळती नियंत्रणात येऊ शकते. भरपूर पाणी पिणे, निरोगी आहार घेणे आणि रासायनिक उत्पादने टाळणे देखील महत्त्वाचे आहे.
Web Summary : Dry scalp causing red patches and hair loss? Coconut and castor oil, aloe vera, yogurt-honey mask, banana-olive oil, and fenugreek seeds offer relief. These kitchen remedies moisturize the scalp, reduce itching, and strengthen hair roots, controlling hair fall.
Web Summary : रूखी खोपड़ी से लाल चकत्ते और बाल झड़ते हैं? नारियल और अरंडी का तेल, एलोवेरा, दही-शहद मास्क, केला-जैतून का तेल, और मेथी के दाने राहत देते हैं। ये घरेलू उपचार खोपड़ी को नमी देते हैं, खुजली कम करते हैं और बालों की जड़ों को मजबूत करते हैं, जिससे बाल झड़ना नियंत्रित होता है।