Join us

सगळे उपाय केले तरी केसगळती थांबत नाही? ६ उपाय - डॉक्टरांचा सल्ला, केस होतील दाट-लांब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2025 16:55 IST

blood test for hair thinning : hair fall diagnosis and treatment: डॉक्टर म्हणतात की, आपल्याला वारंवार केसगळतीच्या समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर ६ ब्लड टेस्ट करुन घेणे खूप महत्त्वाचे आहे.

केसगळती ही समस्या सामान्य वाटत असली तरी ९० टक्के लोक यामुळे हैराण आहेत. केस गळण्यामागे विविध कारणं असली तरी केसांना पुरेशा प्रमाणात पोषण न मिळणे, केमिकल्सचा अतिवापर, प्रदूषण आणि केसांची नीट काळजी न घेणे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे.(Hair care tips)  बरेचदा केसांत कंगवा फिरवल्यानंतर हाताला किंवा कपड्यांना केस चिकटून राहतात. तेल लावताना किंवा केस धुताना केस अधिक गळू लागतात. (blood test for hair thinning)केसगळती रोखण्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय आणि औषधोपचार करतो परंतु, कितीही काही केले तरी केसांचं गळणं मात्र कमी होत नाही. सतत केस गळून ते पातळ होतात. (hair fall diagnosis and treatment) इतकेच नाही तर डोक्यावर अनेक ठिकाणी टक्कल दिसू लागते. अशावेळी डॉक्टर आपल्याला जीवनशैलीत बदल करण्यास सांगतात. याबाबत प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अंकुर सरीन यांनी खास सल्ला दिला.(blood deficiency and hair fall)

Monsoon skin care : पावसाळ्यात चेहऱ्यावर लावा ५ गोष्टी, कोरड्या-तेलकट त्वचेपासून होईल सुटका- दिवसभर दिसाल फ्रेश

डॉक्टर म्हणतात की, आपल्याला वारंवार केसगळतीच्या समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर ६ ब्लड टेस्ट करुन घेणे खूप महत्त्वाचे आहे. या टेस्टमुळे आपल्या शरीरात किंवा रक्तात काही कमतरता असेल तर त्याचे निदान होते. यामुळे आपल्या केसगळतीचे नेमके कारण कळेल. शरीरातील हार्मोन्स बदलामुळे सुद्धा केसगळती होते. अशावेळी नेमकं काय करायला हवं जाणून घेऊया तज्ज्ञांकडून. कोणत्या ६ ब्लड टेस्ट करायला हवे पाहूया. 

1. जर आपल्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर त्याचा परिणाम आपल्या केसांच्या मुळांवर होतो. ज्यामुळे ते कमकुवत होतात  आणि गळू लागतात. यासाठी आपल्याला फेरिटिन चाचणी करायला हवी. ज्यामुळे आपल्या शरीरातील लोहाची पातळी कळेल. 

2. कॅल्शियम हे केवळ हाडांसाठीच नाही तर आपल्या केसांना देखील मजबूत ठेवते. कॅल्शियमची कमतरता शरीरात जाणवू लागली तर केस कोरडे आणि निर्जीव होतात. यासाठी कॅल्शियमची चाचणी करायला हवी. 

3. सूर्यप्रकाशापासून मिळाणारे जीवनसत्त्व हे आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे आहे. शरीरात व्हिटॅमिन डी ३ ची कमतरता झाल्यास केस गळू लागतात. यासाठी याची चाचणी करा. 

 

4. टीएसएच चाचणी हे आपले थायरॉईड योग्यरित्या काम करत आहे की, नाही हे सांगते. थायरॉईड ग्रंथी आपल्या शरीरातील अनेक कार्य नियंत्रित करते. ज्यामध्ये केसांची वाढ रोखली जाते. त्यासाठी ही चाचणी वेळीच करा. 

5. व्हिटॅमिन बी १२ हे जीवनसत्व केसांच्या मुळांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवणाऱ्या लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते. याच्या कमतरतेमुळे केस कमकुवत होऊ शकतात किंवा गळू शकतात. 

6. पीसीओएस ही महिलांमध्ये होणारी हार्मोनल समस्या आहे. जे केस गळण्याचे मुख्य कारण असू शकते. आपल्या अनियमित मासिक पाळी किंवा चेहऱ्यावर सतत केस येण्याची समस्या जाणवत असेल तर वेळीच टेस्ट करुन घ्या. 

या चाचण्यांच्या निकालांवर आपण डॉक्टरांशी बोलून योग्य आहार किंवा औषधे घेऊन यावर योग्य तो सल्ला घेता येईल.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी