केस गळण्याची समस्या हल्ली खूप जास्त वाढलेली आहे. एकीकडे केस खूप गळतात आणि दुसरीकडे केसांना अजिबातच वाढ नसते. त्यामुळे मग काही दिवसांतच टक्कल पडेल की काय अशी भीतीही अनेकांना वाटते. अशावेळी मग आपण केसांवर वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात करतो. तेल, शाम्पू, कंडिशनर बदलून पाहातो. पण असे केमिकलयुक्त पदार्थ केसांवर लावण्यापेक्षा हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा (home made hair mask for the fast growth of hair). हा उपाय रविना टंडन हिने सोशल मीडियावर शेअर केला असून त्यामध्ये तिने केसांसाठी हेअरमास्क कसा तयार करायचा ते सांगितलं आहे (amla hair mask for thick and long hair). हा उपाय करण्यासाठी तिने एका खास पद्धतीने केसांना आवळा लावण्यास सांगितले आहे.(Raveena Tandon Shared Secret of Her Thick Hair)
केस गळणं कमी होण्यासाठी रविना टंडनचा खास उपाय
आवळा केसांसाठी अतिशय उपयुक्त असतो हे आपल्याला माहितीच आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे केसांची मुळं पक्की होण्यास मदत होते. केसांची मुळं पक्की झाली की आपोआपच केस गळण्याचं प्रमाणही कमी होतं. शिवाय आवळ्यामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन सी मुळे केस अकाली पांढरे होत नाहीत.
ओणम २०२५: सणाचा आनंद वाढविणारे खास केरळी पदार्थ- करायला सोपे आणि चवीला अफलातून..
हा उपाय करण्यासाठी ४ ते ५ आवळे घ्या. त्या आवळ्यांचे दोन दोन तुकडे करा आणि ते एका कढईमध्ये घाला.
आता सगळे आवळे व्यवस्थित भिजतील एवढं दूध त्या कढईमध्ये घाला आणि हे मिश्रण गॅसवर गरम करायला ठेवा.
दुधाला चांगली उकळी येऊ द्या आणि जेव्हा दुधातले आवळे व्यवस्थित शिजून मऊ पडतील तेव्हा गॅस बंद करा.
आता आवळे थंड होऊ द्या. त्यानंतर ते दुधातच मॅश करून घ्या. हा झाला तुमचा दूध- आवळा हेअरमास्क तयार.
आता हा हेअरमास्क केसांच्या मुळाशी तसेच केसांच्या लांबीवर लावा. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी कोमट पाणी वापरून केस धुवून टाका.
अमृतसर स्पेशल पनीर भुर्जी- चाखून बघताच म्हणाल बल्ले बल्ले! फक्त १५ मिनिटांत होणारी खास रेसिपी
रविना टंडन म्हणते की हा हेअरमास्क लावल्यानंतर तुम्हाला केस धुण्यासाठी शाम्पू वापरण्याचीही गरज नाही. कारण आवळ्यामध्ये असणारे काही घटक केस आणि स्काल्पवरची सगळी घाण काढून टाकण्यासाठी उपयुक्त ठरतात.