सध्या थंडीचे दिवस सुरु झाल्याने वातावरणातील वाढत्या गारठ्याने त्वचा आणि ओठ फुटण्याची समस्या अधिक त्रासदायक ठरते. कोरडेपणामुळे ओठ फाटणे, त्यांवर भेगा पडणे आणि इतकेच नाही तर ओठांचा नैसर्गिक रंग बदलून ते काळपट आणि निस्तेज दिसू लागतात. वाढत्या गारव्याने ओठांची त्वचा रुक्ष, निस्तेज तर होतेच शिवाय ओठांची त्वचा सोलवटून निघते. बरेचदा आपण शरीराच्या इतर भागांकडे लक्ष देतो परंतु ओठांच्या फुटणाऱ्या त्वचेकडे दुर्लक्षच करतो. जर ओठ फुटण्याच्या या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास महागात पडू शकते(Priyanka Chopra Lip Care During Winter Season).
ओठ फुटण्याच्या या समस्येवर वेळीच योग्य उपाय आणि काळजी न घेतल्यास ओठ फुटून त्यातून रक्त देखील येऊ शकते. अशा फुटलेल्या, रुक्ष, कोरड्या ओठांची समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपायही नक्कीच करू शकतो. ओठांचा हरवलेला ओलावा आणि गुलाबी रंग परत मिळवण्यासाठी आपण अनेक महागड्या लिप बाम आणि ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर करतो. पण, बॉलिवूडची ग्लोबल आयकॉन आणि सौंदर्यवती अभिनेत्री प्रियांका चोप्रा आजही तिच्या ओठांची काळजी घेण्यासाठी घरगुती 'देसी' उपाय करणेचे पसंत करते. प्रियांका चोप्रा करते या देसी उपायाने ओठांना नैसर्गिक ओलावा येतो आणि त्यांचा रंग पुन्हा गुलाबी होतो. यासाठी (priyanka chopras secret lip scrub for winter lip care) नेमकं करायचं काय ते पाहूयात...
थंडीतही ओठ गुलाबी ठेवण्यासाठी प्रियांका चोप्रा करते खास उपाय...
प्रियांका चोप्राने कशा पद्धतीने लीप स्क्रब तयार करायला सांगितले आहे, या विषयीचा एक व्हिडीओ preets_natural या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. प्रियांका चोप्रा ओठांसाठी जो देसी उपाय करते यासाठी, चमचाभर सी सॉल्ट किंवा सैंधव मीठ, ग्लिसरीन आणि गुलाब पाणी इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
एका बाऊलमध्ये, चमचाभर सी सॉल्ट किंवा सैंधव मीठ घ्यावे त्यानंतर त्यात ग्लिसरीन, गुलाब पाणी घालावे. मग चमच्याने कालवून हे मिश्रण एकजीव करून घ्यावे. ओठांसाठी लीप स्क्रब वापरण्यासाठी तयार आहे. सगळ्यांत आधी तयार मिश्रण थोडेसे बोटावर घेऊन ओठांवर हळूवारपणे लावून घ्यावे, ओठांवर लावल्यानंतर हे मिश्रण रगडू नये, फक्त हलक्या हाताने चोळून घ्यावे. यामुळे ओठांच्या त्वचेवर जमा झालेले डेड स्किन काढून टाकण्यास मदत होते आणि ओठ गुलाबी दिसू लागतील.
ओठांवर डेड स्किन साचून राहिली की ओठ काळपट दिसू लागतात. त्यांच्यातील कोरडेपणा वाढत जाऊन पांढरट सालही ओठांवर साचून राहतात. यासाठीच आठवड्यातून एकदम तरी ओठांना स्क्रब करणे गरजेचे असते. घरच्या घरी ओठांना स्क्रब कसे करायचे याचा एक मस्त उपाय प्रियांकाने शेअर केला आहे.
ओठांसाठी हा उपाय करण्याचे नेमके फायदे...
१. सी सॉल्ट किंवा सैंधव मीठ :- सी सॉल्ट किंवा सैंधव मीठ ओठांवरील डेड स्किन हळूवारपणे काढून टाकून ओठांना एक्सफोलिएट करण्यास मदत करते.
२. ग्लिसरीन :- ग्लिसरीन ओठांना खोलवर ओलावा पुरवून त्यांना मऊ आणि मुलायम ठेवते, ज्यामुळे ओठ फाटण्याची समस्या कमी होते.
३. गुलाब पाणी :- गुलाब पाणी त्वचेला शांत करते, ओठांवरील लालसरपणा कमी करते आणि ओठांचा नैसर्गिक गुलाबी रंग टिकवून ठेवण्यास मदत करते.
