Lokmat Sakhi >Beauty > गरोदरपणानंतर खूप केस गळतात? मेथी दाण्यांचा 'असा' उपाय- विरळ झालेले केस होतील दाट...

गरोदरपणानंतर खूप केस गळतात? मेथी दाण्यांचा 'असा' उपाय- विरळ झालेले केस होतील दाट...

post pregnancy hair fall home remedy : methi dana for hair fall after delivery : fenugreek seeds for postpartum hair loss : how to use methi for hair growth after pregnancy : hair loss treatment after pregnancy with methi : प्रेग्नंन्सी नंतर केसगळतीची समस्या अनेकींना सतावते, त्यासाठीच करा हा खास उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2025 11:35 IST2025-08-03T11:30:00+5:302025-08-03T11:35:01+5:30

post pregnancy hair fall home remedy : methi dana for hair fall after delivery : fenugreek seeds for postpartum hair loss : how to use methi for hair growth after pregnancy : hair loss treatment after pregnancy with methi : प्रेग्नंन्सी नंतर केसगळतीची समस्या अनेकींना सतावते, त्यासाठीच करा हा खास उपाय...

post pregnancy hair fall home remedy methi dana for hair fall after delivery fenugreek seeds for postpartum hair loss how to use methi for hair growth after pregnancy how to use methi for hair growth after pregnancy | गरोदरपणानंतर खूप केस गळतात? मेथी दाण्यांचा 'असा' उपाय- विरळ झालेले केस होतील दाट...

गरोदरपणानंतर खूप केस गळतात? मेथी दाण्यांचा 'असा' उपाय- विरळ झालेले केस होतील दाट...

'प्रेग्नंन्सी' हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो. प्रेग्नंन्सी नंतर महिलांच्या शरीरात अनेक शारीरिक आणि हार्मोनल बदल होत असतात. त्याचा सर्वात मोठा परिणाम शरीर आणि केसांवर दिसून येतो. बाळंतपणानंतर केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. आपल्यापैकी बऱ्याच स्त्रियांनी डिलिव्हरीनंतर (fenugreek seeds for postpartum hair loss) केसगळतीची समस्या खूपच त्रासदायक ठरते, याचा अनुभव घेतलाच असेल. काहीवेळा हेअरफॉलच प्रमाण इतकं वाढतं की केसांची घनता कमी होऊ लागते आणि टक्कल पडण्याची भीती वाटते(post pregnancy hair fall home remedy).

अनेक महिलांना तर चक्क गळणारे केस पाहून ताण येतो. परंतु यावर एक सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे मेथी दाणे. मेथी दाणे केसांसाठी खूप फायदेशीर मानले जातात. यामध्ये असलेले पोषक घटक केसांची मुळे (methi dana for hair fall after delivery) मजबूत करतात, केस गळती थांबवतात आणि केसांना पुन्हा वाढण्यास मदत करतात. 'प्रेग्नंन्सी' नंतर होणारी केसांची गळती थांबवण्यासाठी आणि नवीन केसांची वाढ होण्यासाठी मेथी दाण्याचा वापर खूपच फायदेशीर मानला जातो. प्रेग्नंन्सीनंतर (hair loss treatment after pregnancy with methi) होणारी केसगळती कमी करण्यासाठी मेथी दाण्याचा योग्य वापर कसा करायचा ते पाहूयात.. 

प्रेग्नंन्सीनंतर होणारी केसगळती कशी थांबवावी ? 

प्रेग्नंन्सीनंतर होणारी केसगळती थांबवण्यासाठी मेथी दाण्यांचा वापर कसा करावा याची अधिक माहिती pregayog या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. केसगळती थांबवण्यासाठी आपल्याला ३ ते ४ टेबलस्पून मेथी दाणे, २ टेबलस्पून खोबरेल तेल व गरजेनुसार पाणी इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

तुरटी त्वचेसाठी फायदेशीर म्हणून चेहऱ्याला लावाल तर पस्तावाल! पाहा कुणी तुरटी वापरु नये...

नेमका मेथी दाण्यांचा उपाय काय आहे ? 

प्रेग्नंन्सीनंतर होणारी केसगळती थांबवण्यासाठी मेथी दाणे फायदेशीर ठरतात. यासाठी एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात २ टेबलस्पून मेथी दाणे भिजत ठेवावेत. दुसऱ्या दिवशी मेथी दाणे भिजवलेल्या पाण्यासहीत ५ ते १० मिनिटे हलकेच गरम करून घ्यावे. त्यानंतर, पाणी व मेथी दाणे असे दोन्ही घटक गाळणीच्या मदतीने गाळून वेगळे करून घ्यावेत. गाळून घेतलेल्या पाण्याचा वापर केसांसाठी टोनर म्हणून करावा. मग भिजवलेले मेथी दाणे एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात थोडे खोबरेल तेल घालावे. आता हे एकत्रित मिश्रण मिक्सर मध्ये फिरवून त्याची थोडी घट्टसर अशी पेस्ट तयार करून घ्यावी. ही तयार पेस्ट अंघोळीपूर्वी स्काल्प व केसांना लावून मसाज करावा. मग १० ते १५ मिनिटे केस तसेच बांधून ठेवून द्यावेत. १५ मिनिटानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. हा उपाय केल्याने प्रेग्नंन्सी नंतर येणारी केसगळतीची समस्या हळूहळू कमी होण्यास मदत होते. 

स्किन टोननुसार करा परफेक्ट रंगांच्या कपड्यांची निवड! कोणता रंग तुमच्यावर शोभून दिसेल ते पाहा... 


केसगळती थांबवते, केस वाढतात भरभर-लावा ‘हे’ जादुई तेल! एक चंपी-डोकं शांत-केस सुंदर...

केसांसाठी मेथी दाणे वापरण्याचे फायदे...  

१. मेथी दाण्यांमध्ये प्रोटीन आणि निकोटीनिक अ‍ॅसिड असते, जे केसांच्या मुळांना बळकटी देते.

२. मेथी मधील लेसिथिन हे घटक केसगळती रोखण्यासाठी फायदेशीर ठरतात. 

३. केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी आवश्यक पोषण देतो.

४. प्रसूतीनंतरच्या हार्मोनल असंतुलनावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो, यामुळे केसगळती थांबते.

Web Title: post pregnancy hair fall home remedy methi dana for hair fall after delivery fenugreek seeds for postpartum hair loss how to use methi for hair growth after pregnancy how to use methi for hair growth after pregnancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.