Join us  

फाटक्या जीन्समुळे ट्रोल झाली अमृता खानविलकर; सानिया, जान्हवी कपूरलाही ट्रोलिंगचे फटके मारणारा हा ट्रेंड नेमका आला कुठून?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2021 3:51 PM

Origin of ripped jeans : तिच्या डान्स स्टेप पाहून काहींनी तिच्या व्हिडीओला पसंती दिली आहे. तर काहींनी तिच्या कपड्यांवरून निगेटिव्ह कमेंट्स केल्या आहेत. 

प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरने हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगली ओळख निर्माण केली आहे. अमृता सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच अमृताने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवरून अमृता खानविलकरला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकर हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती डान्स करताना दिसते आहे. एकीकडे तिच्या डान्स स्टेप पाहून काहींनी तिच्या व्हिडीओला पसंती दिली आहे. तर काहींनी तिच्या कपड्यांवरून निगेटिव्ह कमेंट्स केल्या आहेत. 

एका युजरने म्हटले की, दिवाळीला यावेळेस नवीन जिन्स घेऊन टाक. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, कपडे फाटले असतील तर मला संपर्क कर. आणखी एकाने लिहिले की, दिवाळीला एक जिन्स नक्की घ्या ताई.  एकाने तर भंगार कपडे म्हटले आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, जिन्स शिवून घेना अमू.

ही रिप्ड जीन्स नेमकी आली कुठून?

१८७० मध्ये जीन्सचा शोध अमेरिकेतील उद्योजक लोब स्ट्रॉस यांनी लावला होता. मजुरांच्या गणवेशासाठी गडद निळ्या रंगाचे पोशाख त्यांनी जीन्स कापडापासून बनवले होते. त्यानंतर डिस्ट्रेस्ड जीन्सची बहीण म्हणून ओळखली जाणारी रिप्ड जीन्स ७० च्या दशकात प्रचंड लोकप्रिय झाली. 

ही फाटकी जीन्सची फॅशन हॉलीवूडमध्ये जन्माला आली. १९७० साली आलेली ही फॅशन सुरूवातीला लोकांना विचित्र वाटली. पण नंतर तिच्यातली स्टाईल लक्षात आल्यावर लोकांनी स्वत:हून त्यांच्याकडच्या जीन्स रिप्ड करायला म्हणजे त्यावर कट मारायला सुरूवात केली. 

त्या काळात केवळ मोठमोठाले ब्रॅण्डच रिप्ड जीन्सचे उत्पादन करायचे. हजारो रूपये मोजून लोक या जीन्स खरेदी करायचे. कधी काळी श्रीमंतांपुरतीच मर्यादित असलेली ही स्टाईलीश जीन्स आता मात्र अगदी सहज आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत बाजारात उपलब्ध आहे.

९० चे दशक उजाडल्यावर मात्र जीन्सचे नवे रुपडे अर्थात रिप्ड जीन्स युवा, वर्गात बहुढंगी, बहुरंगी म्हणून हिट झाली. हॉलिवूड स्टार्स, रॉक बँड स्टार्स रेड कार्पेटवर रिप्ड जीन्समध्ये दिसू लागले.  भारतात सलमानने या जीन्सला हिट केले. त्याच्या ओ ओ जाने जाना या गाण्यात घातलेली रीप्ड जीन्स गाजली होती.

आलिया भट, दीपिका पदुकोन,सोनम कपूर, जाह्नवी कपूर,  सानिया मिर्झा, प्रियंका चोप्रा या दिवा देखील रिप्ड जीन्सच्या प्रेमात पडलेल्या दिसताहेत. बाकी तरुण मुलींच्या जगातही या फाटक्या जिन्सच्या प्रेमात आहेत.  रिप्ड जीन्सचे अनेक डिझाईन्स आता पाहायला मिळू लागले आहेत. पूर्वी फक्त गुडघ्यांपुरतेच फाटलेली वाटेल इतपत आकाराचे कट मर्यादित होते. आता हे कट संपूर्ण पॅण्टवर आढळतात.

कशी वापरायची ही जीन्स

१) नाईट डेट किंवा पार्टीसाठी हा पर्याय झकास ठरतो. कॅज्युअल शर्ट्स म्हणजेच डेनिम शर्ट्स, प्लेन बटन डाऊन शर्ट्स, प्रिंटेड शर्ट्स रीप्ड जीन्सवर कॅरी करुन तुम्ही कूल लूक मिळवू शकता. आणखी कूल लूक हवा असेल तर राऊंड नेकचा ग्रे व्हाईट, काळ्या रंगाचा टी शर्ट घाला.

२) मुलींसाठी रीप्ड जीन्स कॅरी करण्यासाठीही खूूप चांगले ऑप्शन्स आहेत. कूल लूकसाठी टी शर्ट, ब्लेझर, क्लासिक ओव्हरकोट, बॉम्बर जॅकेट्स यांचे कॉम्बिनेशन करताना रंगसंगती व डिझाईन्सची योग्य निवड केल्यास तुम्ही हटके दिसाल यात शंकाच नाही.

३) ब्लेझर, जॅॅकेट्स निवडताना शक्यतो टी शर्टच्या रंगानुसार निवडावेत. कॅज्युअल लूकसाठी स्टेटमेंट टॉप, शर्टची निवड करु शकता, यासाठी लाईट कट्स असलेली, बॉडी फिट जीन्स निवडा. शिवाय लूझ डाऊन बटन शर्ट्स, प्लेन शर्ट्स, क्रॉप टॉप, बोल्ड रंगसंगतीतील पफ्ड स्लीव्हज टॉप्स, डेनिम शर्ट्स, आकर्षक स्वेटर्स घालून रीप्ड जीन्समधला लूक खुलवता येतो.

टॅग्स :ब्यूटी टिप्सफॅशनअमृता खानविलकर