Join us

काजोलची ३४ हजारांची ऑर्गेंझा सिल्क साडी, गोटा पट्टी बॉर्डरमुळे दिसतेय खुलून; साडीची खासियत अशी की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2022 18:11 IST

Organza silk saree of Kajol: ऑर्गेंझा साड्यांची जादू आणि नजाकत खरोखरंच वेगळी असते..  दुर्गा पुजेच्या निमित्ताने काजोलने ऑर्गेंझा साडीच नेसली होती. बघा तिचा हा व्हायरल लूक

ठळक मुद्देसाडीच्या पदरावर पांढरा, निळा, सोनेरी, हिरवा या रंगाने लेस एम्ब्रॉयडरी केलेली असल्याने पदरही अधिक आकर्षक झाला आहे.

काजोल आणि तिचे साडी लूक हा नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी चर्चेचा विषय असतो. मुळातच साड्यांची निवड कशा पद्धतीने करायची आणि ती कशी कॅरी करायची, याचा उत्तम चॉईस काजोलकडे (Kajol in organza saree) आहे. त्यामुळेच तिचे साडी लूक अनेकदा व्हायरल होत असतात. आता सध्या काजोलचा ऑर्गेंझा साडीतला लूकही असाच चर्चेचा विषय झाला आहे. ही साडी तिने नवरात्रीला दुर्गापुजेच्या निमित्ताने नेसली होती. पण साडीची चर्चा मात्र अजूनही सुरूच आहे. साडी खरोखरच सुंदर असून तिची किंमत तब्बल ३४, ५०० रुपयांची आहे.

 

कशी आहे काजोलची साडी?- काजोलने नेसलेल्या साडीचा रंग ब्लश पिंक या प्रकारात मोडणारा आहे. म्हणजे अबोली आणि बेबी पिंक यांच्या अधे- मधे असणारा हा शेड काजोलच्या कॉम्प्लेक्शनला भारीच सूट करतोय.

करवा चौथ स्पेशल : करवा चौथसाठी सुंदर नटलेल्या ७ अभिनेत्री, खास ट्रेण्डी- ट्रॅडिशनल लूक

या साडीचे ब्लाऊजही ब्लश पिंक रंगाचे आहे. ऑर्गेंझा प्रकारात मोडणारी असली तरी या साडीचे फॅब्रिक पुर्णपणे ऑर्गेंझा प्रकारातले नाही. ऑर्गेंझा आणि चंदेरी अशा मिक्स फॅब्रिकचा हा कपडा असून त्यावरचे ब्लाऊज गज्जी सिल्क प्रकारातले आहे. काजोलची ही साडी तुम्हाला आवडली असेल तर Devnaagri या शॉपिंग साईटवरून तुम्ही ती घेऊ शकता. 

 

काजोलच्या या साडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या साडीवर ठिकठिकाणी सिक्विन वर्क केले असून सोनेरी रंगातल्या गोटा पट्टी बॉर्डरमुळे साडीचे देखणेपण आणखी वाढले आहे.

प्रेग्नन्सीमध्ये हाय हिल्स घातल्यानं ट्रोल झालेल्या बिपाशा बसूच्या पायात सोनेरी चपला.. पहा व्हायरल फोटो

साडीच्या पदरावर पांढरा, निळा, सोनेरी, हिरवा या रंगाने लेस एम्ब्रॉयडरी केलेली असल्याने पदरही अधिक आकर्षक झाला आहे. या साडीवर काजोलने बंद गळ्याचे स्लिव्हलेस ब्लाऊज घातले असून स्टोन ज्वेलरीमुळे काजोलचा आणि साडीचा लूक आणखीनच खुलला आहे.   

टॅग्स :ब्यूटी टिप्सफॅशनकाजोल