lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > निरोगी त्वचेसाठी आलिया, दीपिका आणि ऐश्वर्या देतात एकच सल्ला... भरपूर पाणी प्या!

निरोगी त्वचेसाठी आलिया, दीपिका आणि ऐश्वर्या देतात एकच सल्ला... भरपूर पाणी प्या!

निरोगी त्वचेसाठी आलिया, दीपिका आणि ऐश्वर्या भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. निरोगी त्वचेसाठी पाणी पिणे हाच उत्तम उपाय असल्याचं सांगतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 06:28 PM2021-03-26T18:28:49+5:302021-03-26T18:39:06+5:30

निरोगी त्वचेसाठी आलिया, दीपिका आणि ऐश्वर्या भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. निरोगी त्वचेसाठी पाणी पिणे हाच उत्तम उपाय असल्याचं सांगतात.

The only advice Alia, Deepika and Aishwarya give for healthy skin ... Drink plenty of water! | निरोगी त्वचेसाठी आलिया, दीपिका आणि ऐश्वर्या देतात एकच सल्ला... भरपूर पाणी प्या!

निरोगी त्वचेसाठी आलिया, दीपिका आणि ऐश्वर्या देतात एकच सल्ला... भरपूर पाणी प्या!

Highlightsतजेलदार त्वचेसाठी आलिया, दीपिका आणि ऐश्वर्या सौंदर्य उत्पादनांपलिकडचा सोपा उपाय सांगतात. या तिघीही निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी भरपूर पाणी प्यायला हवं यावर भर देतात. या तिघींनी सांगितलेल्या या उपायाला त्वचा तज्ज्ञही दुजोरा देतात.पाणी पिल्याने त्वचेतला ओलसरपणा टिकून राहातो, शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. पाण्याने त्वचा आरोग्यदायी आणि सुंदर होते यात शास्त्रीय सत्य आहे.  


सुंदर दिसण्यासाठी फक्त तेजस्वी आणि चमकदार त्वचा हवी. पण अशी त्वचा होणं हे सोपं काम नाही हे एव्हाना अनेकींच्या लक्षात आलं असेल. जाहिरातीत दाखवलेले महागडे सौंदर्य उत्पादनं वापरुनही ती भेटत नाही. त्वचेची काळजी घेणं, तिचं भरण पोषण करणं म्हणजे फारच वेळखाऊ काम. तेवढा वेळ आहे कोणाला? पण असं असलं तरी सूंदर दिसण्यात निरोगी त्वचेचं असलेलं महत्त्वं कोणीच अमान्य करणार नाही. पण ही आपली ‘बस की बात नाही’ असा समज करुन अनेकजणी यासाठीचे प्रयत्न सोडून देतात. पण आलिया भट, दीपिका पदूकोण आणि ऐश्वर्या राय बच्चन या तिघीजणी तेजस्वी त्वचेसाठीचा एक सोपा आणि सहज करता येण्याजोगा उपाय सांगतात.

आलिया, दीपिका आणि ऐश्वर्या यांचे विदाऊट मेकअपच्या फोटोंची कायम चर्चा होत असते. मेकअप नसतानाही या तिघीजणी एवढ्या छान कशा दिसतात? त्यांची त्वचा एवढी कशी चमकते?

यावर या तिघींकडे मेकअप आणि सौंदर्य उत्पादनांपलिकडचा एक नैसर्गिक उपाय आहे, ज्याचा अवलंब या तिघीजणी आपल्या रोजच्या आयुष्यात करतात. त्या म्हणतात की मेकअप करणं, ग्लॅमरस दिसणं हा आमच्या रोजच्या कामाचा भाग आहे. पण जेव्हा काम संपतं, चेहेऱ्यावरुन मेकअप उतरतो तेव्हा आपला चेहेरा पाहाताना आपल्याला आनंद वाटायला हवा. आपली त्वचा आनंदी दिसायला हवी , त्यासाठी    निरोगी त्वचा ही आम्हाला महत्त्वाची वाटते. निरोगी त्वचा हेच खरं सौंदर्य आहे. त्यासाठी त्वचा जपणं गरजेचं. त्वचेची काळजी ही फक्त आम्ही अभिनेत्री आहोत म्हणून आमच्यासाठी महत्त्वाची आहे असं नाही. तर ही प्रत्येक सर्वसामान्य स्त्रीची, प्रत्येकीच्या सौंदर्याची गरज आहे. ती पूर्ण करण्यासाठीचे उपाय महागडे आणि वेळखाऊ अजिबात नाही. काही सोप्या गोष्टी सवयीच्या केल्या तर हे सहज शक्य आहे.

 

निरोगी त्वचेसाठी आलिया, दीपिका आणि ऐश्वर्या भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. निरोगी त्वचेसाठी पाणी पिणे हाच उत्तम उपाय असल्याचं सांगतात. आलिया भटने एका मूलाखतीत त्वचेची काळजी घेण्यासाठी मी भरपूर पाणी पिते आणि रोज न चुकता व्यायाम करते असं सांगितलं आहे. तर दीपिका म्हणते की निरोगी त्वचेसाठी मी भरपूर फळं खाते, आहारात सर्व प्रकारच्या भाज्या खाण्यावर भर देते. त्वचा स्वच्छ दिसावी यासाठी फेशिअल, क्लीनअप ऐवजी पूरेसं पाणी पिण्याचा नियम पाळते. याचसोबत दीपिका त्वच निरोगी राहाण्यासाठी पूरेशी झोप घेण्याचाही सल्ला देते.
तर ऐश्वर्या राय बच्चन भरपूर पाणी पिणं हाच निरोगी त्वचेसाठीचा उपाय आहे असं सांगते. त्यासोबतच रोज न चुकता मॉश्चरायझर लावणं हे निरोगी त्वचेसाठीचं महत्त्वाचं पथ्यं असल्याचं सांगते. मॉश्चरयझर लावल्याने माझी त्वचा कायम ओलसर राहाते. त्वचा ओलसर राहिली की ती निरोगी होते असं ऐश्वर्या म्हणते.

आलिया, दीपिका आणि ऐश्वर्या या तिघीही निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी भरपूर पाणी प्यायला हवं यावर भर देतात. या तिघींनी सांगितलेल्या या उपायाला त्वचा तज्ज्ञही दूजोरा देतात. पाणी पिल्याने त्वचेतला ओलसरपणा टिकून राहातो, शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. पाण्याने त्वचा आरोग्यदायी आणि सुंदर होते यात शास्त्रीय सत्य आहे. आतापर्यंत अनेक डॉक्टर्स आणि त्वचा विकार तज्ञ्ज्ञ हेच सांगत होते. आता आलिया, दीपिका आणि ऐश्वर्याही हेच सांगत आहेत. 
सोपा आहे ना हा सुंदर दिसण्याचा पाणीदार उपाय!

Web Title: The only advice Alia, Deepika and Aishwarya give for healthy skin ... Drink plenty of water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.