Lokmat Sakhi >Beauty > टक्कल पडलं-केस विरळ झाले? लावा स्वयंपाकघरातल्या ३ गोष्टी, नव्यानं उगवीतल सुंदर केस

टक्कल पडलं-केस विरळ झाले? लावा स्वयंपाकघरातल्या ३ गोष्टी, नव्यानं उगवीतल सुंदर केस

Only 3 Ingredients and Your Bald Spots Will Grow Back - hair growth : केस गळणं वाढलंय? त्यावर ३ घरगुती गोष्टींचा वापर करून पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2024 07:57 PM2024-06-13T19:57:08+5:302024-06-13T19:57:49+5:30

Only 3 Ingredients and Your Bald Spots Will Grow Back - hair growth : केस गळणं वाढलंय? त्यावर ३ घरगुती गोष्टींचा वापर करून पाहा..

Only 3 Ingredients and Your Bald Spots Will Grow Back - hair growth | टक्कल पडलं-केस विरळ झाले? लावा स्वयंपाकघरातल्या ३ गोष्टी, नव्यानं उगवीतल सुंदर केस

टक्कल पडलं-केस विरळ झाले? लावा स्वयंपाकघरातल्या ३ गोष्टी, नव्यानं उगवीतल सुंदर केस

केस गळतीमुळे प्रत्येकजण त्रस्त आहे (Hair Growth Tips). केसांच्या समस्या अनेक कारणांमुळे उद्भवतात (Hair Growth Tips). केस गळती, केसात कोंडा, केस निर्जीव होतात. पण यावर उपाय म्हणून ब्यूटी उत्पादनांचा वापर करण्यात येतो. पण काही ब्यूटी उत्पादनांमध्ये केमिकल रसायनांचा वापर होतो (Hairfall). ज्याचा थेट दुष्परिणाम आपल्या केसांवर होतो. यामुळे केस झपाट्याने गळतात.

शिवाय टक्कल पडण्याची देखील स्थिती निर्माण होऊ शकते. टक्कल पडण्याची समस्या महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त असते. जर आपल्यालाही केस गळतीचा त्रास होत असेल तर, घरगुती उपायांना फॉलो करा. यामुळे केस गळतीची समस्या कमी होईल(Only 3 Ingredients and Your Bald Spots Will Grow Back - hair growth).

केस गळतीची समस्या दूर करणारे घरगुती उपाय

मेथी दाणे

मेथी दाणे केसांसाठी खूप फायदेशीर ठरतात. यात असणारे प्रोटीन, विटामिन - सी हे स्कॅल्प हेल्दी ठेऊन केस अधिक घनदाट आणि लांबसडक करण्यास मदत करतात. यासाठी एका बाऊलमध्ये पाणी घ्या, त्यात मेथी दाणे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी बारीक करून त्याची पेस्ट तयार करा. तयार पेस्टमध्ये दही मिसळून केसांच्या मुळांना लावा. साधारण अर्ध्या तासानंतर केस धुवा. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळेल आणि केस गळणे कमी होईल.

महिन्यातून दोनदा केस कापावे लागतील इतके वाढतील केस; फक्त 'या' तेलात कांद्याचा रस मिसळा

कांदा

कांद्याचा रस केस गळती कमी करण्यास मदत करते. कांद्याच्या रसामध्ये जीवनसत्व, सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म असतात जे आपल्या केसांना मजबूत बनवतात. यासाठी कांदा कापून त्याचा रस तयार करा. नंतर केस विंचरून घ्या. त्याचा रस स्काल्पला लावा. १५ ते २० मिनिटानंतर केस शाम्पूने धुवा.

चहापत्तीच्या पाण्यात दडलंय घनदाट केसांचं सिक्रेट; पण 'या' जादुई पाण्याचा वापर कसा करावा?

मुलेठी

मुलेठी केसांसाठी सर्वात खास आहे. यामुळे केसांची मुळे घट्ट आणि मजबूत होतात. ज्यामुळे केसांची गळती होत नाही. त्यात आवश्यक पोषक घटक असतात जे केसांच्या छिद्रांना पोषण देतात. यासाठी एका बाऊलमध्ये मुलेठी पावडर घ्या. त्यात काही दुधाचे थेंब मिसळा. तयार पेस्ट स्काल्पला लावा. काही वेळा केस शाम्पूने धुवा. याचा फायदा नक्कीच केसांना होईल.

Web Title: Only 3 Ingredients and Your Bald Spots Will Grow Back - hair growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.