Join us

दातावर दागिने, फॅशनच्या जगात हौशीचा मामला! पण हे दागिने घालणं सुरक्षित असतं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 12:41 IST

Fashion: फॅशनच्या जगात हौसेला काही मोल नाही, हेच खरं... आता हेच बघा ना, दातांसाठी चक्क वेगवेगळे दागिने (jwellery for teeth)... दागिन्यांचा हा भलताच ट्रेण्ड तुम्ही पाहिला का...

ठळक मुद्देकव्हरींग करण्यासाठी जो धातू निवडता आहात, तशा पद्धतीने तुम्हाला यासाठी पैसे मोजावे लागतात.

आता जर कोणी हसल्यावर तुम्हाला त्याचे दात चमकताना दिसले, तर त्याचे दात किती स्वच्छ, चमकदार असं म्हणून आश्चर्यचकीत होऊ नका. कारण ही चमक त्याच्या दातांची नसून त्याच्या दातांवर बसविलेल्या दागिन्यांची (new trend of jwellery)असू शकते. हो... हे खरं आहे. आता जसे तुम्ही कानात, गळ्यात, नाकात दागिने घालता ना, तसेच आता तुमच्या दातांवरही तुम्ही दागिने घालू शकता. दातांसाठी खूप वेगवेगळे दागिने असून या दागिन्यांची फॅशन (fashion)करणाऱ्यांचीही काही कमी नाही. 

 

कशी करतात दातांवर सजावट१. दातांवर लावतात हिरे...हो खरं आहे. दातांवर हिरे (diamonds on teeth)लावण्याची फॅशन विदेशात अतिशय लोकप्रिय आहे. डेंटिस्ट (dentist)आणि आर्टिस्ट (artist) या दोघांच्या मदतीने दांतांवर अशाप्रकारची कलाकुसर केली जाते. यामध्ये आपण ज्या दाताला मराठीत सुळे म्हणतो त्या दोन मोठ्या दातांपैकी एका दातावर हिरा किंवा अमेरिकन डायमंड लावण्यात येतो. छोटीशी सर्जरी आणि ड्रिल करून हा हिरा दातांवर पक्का बसविण्यात येतो. यासाठी लाखो रूपये लागतात.

 

२. दातांवर लावतात कव्हर..

दातांवर हिरा किंवा स्टोन लावण्यापेक्षा ही स्टाईल तुलनेने कमी खर्चात होते. हा उपाय करण्यासाठी दातांवर सगळ्यात आधी सोने, चांदी, प्लॅटिनम (gold, silver, platinum on teeth)हे धातू लावून कव्हरींग केले जाते. त्यानंतर या कव्हरवर काही वर्क करायचे असल्यास करता येते. तुम्ही कव्हरींग करण्यासाठी जो धातू निवडता आहात, तशा पद्धतीने तुम्हाला यासाठी पैसे मोजावे लागतात.

 

३. दातांवरचा टॅटू(tattoo on teeth)टॅटू बनविणे हे काही आता आपल्याला नविन राहिलेले नाही. ज्याप्रमाणे आपण शरीराच्या कोणत्याही भागावर टॅटू काढू शकतो, त्याचप्रमाणे आपल्याला दातांवर टॅटू काढता येतो. हा उपाय वरच्या दोन्ही उपायांपेक्षा कमी खर्चात होणारा आहे. यासाठी अनेक जण एकाआड एक दांतांची निवडही करतात. सगळ्यात समोरच्या दोन दातांपेक्षा सुळ्यांवर हे काम जास्त करण्यात येते. तसेच अधिक स्पष्ट आणि उठून दिसण्यासाठी खालच्या दातांपेक्षा वरच्या दातांवरच दागिने लावता येतात. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सफॅशन