Join us  

रणबीरच्या वाढदिवसासाठी आणलेल्या स्पेशल केकवर आई नितू कपूरने लिहिले, राहाज् पापा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2023 7:19 PM

Viral Post of Neetu Kapoor On Ranbir Kapoor's Birth Day: राहाच्या जन्मानंतर अभिनेता रणबीर कपूर पहिल्यांदाच त्याचा वाढदिवस साजरा करतो आहे. म्हणूनच नीतू कपूर यांनी त्याच्या केकवर एक खास गोष्ट लिहीली होती....

ठळक मुद्दे चर्चा आहे ती नितू कपूर यांच्या पोस्टची आणि त्यांच्या त्या 'राहाज् पापा' या दोन गोड शब्दांची.... 

अभिनेता रणबीर कपूर त्याचा ४१ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतो आहे. अगदी मध्यरात्रीपासून त्याच्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन सुरू झालं असून ते सेलिब्रेशन नेमकं कसं झालं हे सांगणारे काही फोटो त्याची आई अभिनेत्री नितू कपूर यांनी नुकतेच सोशल मिडियावर शेअर केले आहेत. नितू कपूर, रणबीर, रणबीरची बहिण रिधिमा असे सगळे त्याच्या वाढदिवसानिमित्त एका खास ठिकाणी गेले होते. तिथे नितू कपूर यांनी रणबीरसाठी जो खास केक मागवला होता, त्यावर त्यांनी 'राहाज् पापा....' असे दोन गोड शब्द लिहिले होते. (Neetu Kapoor wishes Ranbir Kapoor on his Birth day as 'Raha's Papa')

 

रणबीर कपूर आणि आलिया भट यांची कन्या म्हणजे राहा... हा वाढदिवस रणबीरसाठी एकदम स्पेशल आहे, कारण या वाढदिवसाला पहिल्यांदाच त्याच्यासोबत त्याची लेक आहे.

डबल बेड कॉटन बेडशीट फक्त ५०० रुपयांत, बघा ३ मस्त पर्याय- वर्षभराची खरेदी एकदाच करून टाका

आपली मुलगी प्रत्येक वडिलांसाठी एखाद्या राजकुमारीसारखीच असते... म्हणूनच तर आपल्या लेकाच्या मनातला हा आनंद ओळखून नितू कपूर यांनी रणबीरच्या केकवर थेट राहाचंच नाव लिहिलं आणि त्याला सुखद धक्का दिला. आलिया भट हिनेही तिच्या खास स्टाईलमध्ये रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

झाडाफुलांनी छोटीशी बाल्कनी सजविण्याच्या ३ खास टिप्स, बदलून टाका बाल्कनीचं रूप चटकन- ते ही कमी पैशांत

तिने त्या दोघांचे बरेच फोटोही सोशल मिडियावर शेअर केले आहेत. पण तरीही चर्चा आहे ती नितू कपूर यांच्या पोस्टची आणि त्यांच्या त्या 'राहाज् पापा' या दोन गोड शब्दांची.... 

 

टॅग्स :सोशल व्हायरलरणबीर कपूरआलिया भटनितू सिंग