Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > पार्टी, गेट टुगेदर यासाठी परफेक्ट लूक हवा? करा काजोलला कॉपी, दिसा स्मार्ट स्टायलिश

पार्टी, गेट टुगेदर यासाठी परफेक्ट लूक हवा? करा काजोलला कॉपी, दिसा स्मार्ट स्टायलिश

Bollywood Actress Kajol Look स्कूल मीटिंग, पार्टीमध्ये काय परिधान करावे सुचत नाही ? काजोलचा लेटेस्ट लूक पाहा, मिळेल आयडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2022 13:04 IST2022-12-18T12:58:50+5:302022-12-18T13:04:10+5:30

Bollywood Actress Kajol Look स्कूल मीटिंग, पार्टीमध्ये काय परिधान करावे सुचत नाही ? काजोलचा लेटेस्ट लूक पाहा, मिळेल आयडिया

Need a perfect look for a party, get together? Copy Kajol, look smart and stylish | पार्टी, गेट टुगेदर यासाठी परफेक्ट लूक हवा? करा काजोलला कॉपी, दिसा स्मार्ट स्टायलिश

पार्टी, गेट टुगेदर यासाठी परफेक्ट लूक हवा? करा काजोलला कॉपी, दिसा स्मार्ट स्टायलिश

वर्ष सरत चाललं आहे, मुलांच्या शाळेत अनेक कार्यक्रम, ख्रिसमस पार्टी, अथवा ग्रुप मीटिंग पार पडत आहे. यावेळी महिलांना आपण मीटिंग अथवा गेट टुगेदरमध्ये काय परिधान करावे हे सुचत नाही. आपल्याला जर परफेक्ट आणि स्टायलिश मॉम लूक हवा असेल तर, बॉलिवूड अभिनेत्री काजोल यांचा लेटेस्ट लूकला फॉलो करा.

चूलबुली अभिनेत्री काजोल ही आपल्या हटक्या आणि ट्रेण्डी लुकसाठी ओळखली जाते. तिचा प्रत्येक लूक चाहते फॉलो करतात. तिने आपला लेटेस्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात तिने फ्लोरल शिअर टॉप परिधान केला आहे. यासह क्लासिक ब्लॅक ट्राउजर उठून दिसत आहे.

काजोलने ब्लॅक स्टिलेटोस आणि आकर्षक दागिन्यांसह तिचा लूक ऍक्सेसरीझ केला. हेअर स्टाईलमध्ये तिने साइड ब्रश पफसह मध्यम-उंच पोनीटेलमध्ये बांधली आहे. जो सिंपल आणि सोबर लूक देत आहे.

यात तिने हलका मेकअप लूक ठेवला असून, रेड लिपस्टिक उठून दिसत आहे. अभिनेत्रीने तिच्या कानात ड्रेसशी जुळणारे छोटे कानातले घातले आहेत. हा संपूर्ण लूक सेलिब्रिटी स्टायलिस्ट राधिका मेहरा यांनी स्टाईल केली आहे. जर तुम्हालाही काजोलसारखा परफेक्ट लूक हवे असेल. तर, हा लूक नक्की ट्राय करा.

Web Title: Need a perfect look for a party, get together? Copy Kajol, look smart and stylish