Lokmat Sakhi >Beauty > ना डाय, ना हेअर कलर ! आवळा - रिठ्याचा 'हेअर कलर शाम्पू' वापरा, पांढरे केस होतील काळे...

ना डाय, ना हेअर कलर ! आवळा - रिठ्याचा 'हेअर कलर शाम्पू' वापरा, पांढरे केस होतील काळे...

Natural Way to Dye & Color Your Hair without Chemicals : How To Convert Grey Hair To Black Naturally : How to Turn Grey or White Hair Black Naturally : 5 Natural Ingredients That Can Reverse Grey Hair : पांढरे केस काळे करण्यासाठी नको केमिकल्सयुक्त डाय, कलर करुन पाहा हा खास घरगुती उपाय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2025 17:14 IST2025-04-18T07:09:27+5:302025-04-18T17:14:40+5:30

Natural Way to Dye & Color Your Hair without Chemicals : How To Convert Grey Hair To Black Naturally : How to Turn Grey or White Hair Black Naturally : 5 Natural Ingredients That Can Reverse Grey Hair : पांढरे केस काळे करण्यासाठी नको केमिकल्सयुक्त डाय, कलर करुन पाहा हा खास घरगुती उपाय..

Natural Way to Dye & Color Your Hair without Chemicals How To Convert Grey Hair To Black Naturally How to Turn Grey or White Hair Black Naturally | ना डाय, ना हेअर कलर ! आवळा - रिठ्याचा 'हेअर कलर शाम्पू' वापरा, पांढरे केस होतील काळे...

ना डाय, ना हेअर कलर ! आवळा - रिठ्याचा 'हेअर कलर शाम्पू' वापरा, पांढरे केस होतील काळे...

आजकाल बरेचजण पांढऱ्या केसांच्या समस्येने हैराण आहेत. काहीजणांचे केस वयोमानानुसार पांढरे होतात तर काहींचे केस अकाली पांढरे होतात. एवढेच नव्हे तर केसांवर सारख्या ब्युटी ट्रिटमेंट्स, केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर केल्याने देखील केस पांढरे होतात. असे पांढरे केस लपवण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही उपाय करत असतात. हे पांढरे केस लपवण्यासाठी अनेकजण केसांना मेहेंदी, डाय, हेअर कलर लावतात, परंतु ही समस्या दूर होण्याऐवजी केसांसंबंधित अनेक समस्या उद्भवतात(Natural Way to Dye & Color Your Hair without Chemicals).

केसांना मेहेंदी, डाय, हेअर कलर लावल्यानंतर लगेच केस काळे होत असले तरी ते पुन्हा कधी दिवसांनी पांढरे होतातच. या आर्टिफिशियल पर्यायांपेक्षा केसांसाठी नैसर्गिक घटकांचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते. फार पूर्वीपासून केसांसाठी रिठा, आवळ्याचा वापर केला जातो. पांढऱ्या केसांना नैसर्गिक पद्धतीने काळे करण्यासाठी रिठा, आवळ्यासोबतच आणखी काही नैसर्गिक (How To Convert Grey Hair To Black Naturally) पदार्थ घालून त्याचा हेअर कलर शाम्पू घरच्याघरीच तयार करु शकतो. केसांसाठी उपयुक्त असा हेअर कलर शाम्पू वापरल्याने, केस अगदी १५ मिनिटांत काळे करता येतात. हा हेअर कलर शाम्पू तयार करण्याची सोपी पद्धत पाहूयात(How to Turn Grey or White Hair Black Naturally).         

साहित्य :- 

१. डाळिंबाच्या साली - २ (डाळिंबाच्या सुकवून घेतलेल्या साली) 
२. पाणी - २ कप 
३. रिठा - ६ ते ७ रिठा 
४. आवळा - २ ते ३ टेबलस्पून (सुकलेल्या आवळ्याच्या फोडी)
५. तुरटीचा खडा - १ मध्यम आकाराचा तुकडा 
६. शाम्पू - १ टेबलस्पून 

चेहऱ्यावर येईल नॅचरल गुलाबी ग्लो, पाहा 'ब्लश' लावण्याची सेलिब्रिटी टेक्निक! गाल दिसतील आलिया-दीपिकासारखे...


हनुवटी आणि ओठावरचे केस सतत वाढणं होईल बंद, प्या हे घरगुती नॅचरल ड्रिंक...

कृती :- 

१. सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन ते एक उकळी येईपर्यंत गरम करून घ्यावे. 
२. डाळिंबाच्या सालींचा काळा रंग पाण्याला आल्यावर त्यात रिठा आणि सुकलेल्या आवळ्याच्या फोडी घालाव्यात. 
३. एका दुसऱ्या बाऊलमध्ये थोडे पाणी घेऊन त्यात तुरटी विरघळवून पाणी तयार करून घ्यावे. 
४. आता कलिंगडाच्या सालींचे पाणी गाळून एका बाऊलमध्ये ओतावे, हे पाणी थोडे थंड झाल्यावर त्यात तुरटीचे तयार केलेले पाणी ओतावे. सगळ्यात शेवटी या पाण्यांत तुम्ही नेहमी वापरत असलेला शाम्पू मिसळून घ्यावा. 

१ चमचा खोबरेल तेलात मिसळा ‘या’ ५ पैकी १ पदार्थ, तुमचं तारुण्य परत आणणारी जादूई युक्ती!

याचा वापर कसा करावा ?

हा तयार झालेला नॅचरल हेअर कलर ब्रशच्या मदतीने केसांवर लावून घ्यावा. हा कलर केसांवर अर्धा तास तसाच लावून ठेवावा. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. अशाप्रकारे तुम्ही केमिकल्सयुक्त हेअर डाय किंवा हेअर कलरचा वापर न करता देखील पांढरे केस काळे करु शकता.

Web Title: Natural Way to Dye & Color Your Hair without Chemicals How To Convert Grey Hair To Black Naturally How to Turn Grey or White Hair Black Naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.