Join us

केमिकलवाली विकतची मेहेंदी कशाला, ‘या’ ३ पानांची पेस्ट देईल केसांना सुंदर रंग! शून्य साईड इफेक्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2025 22:21 IST

Natural Mehendi Hair Color Paste : 3-leaf herbal mehendi for hair : Chemical-free hair color at home : Homemade herbal mehendi for dark hair : Mehendi paste without chemicals : Ayurvedic mehendi paste for hair : Natural ingredients for hair coloring : विकतच्या मेहेंदी पावडर आणि डायला म्हणा बाय.

केसांचे आरोग्य व सौंदर्य चांगले टिकवून ठेवण्यासाठी मेहेंदीचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे. मेहेंदी केसांना नैसर्गिकरित्या निरोगी ठेवून केसांना खोलवर पोषण देऊन निगा राखण्यास (3-leaf herbal mehendi for hair) मदत करते. केसांच्या अनेक समस्यांवर मेहेंदीचा वापर हा फायदेशीरच ठरतो. केसांच्या (Chemical-free hair color at home) वेगवेगळ्या समस्यांपैकी पांढरे झालेले केस रंगवण्यासाठी विशेष करुन मेहेंदीचा वापर केला जातो. आपल्यापैकी बरेचजण केसांचा पांढरा रंग लपवण्यासाठी मेहेंदीचा वापर करतात(Homemade herbal mehendi for dark hair).

रासायनिक रंगांचा वापर टाळून केसांना नैसर्गिकरित्या रंग देण्यासाठी मेहेंदी हा उत्तम पर्याय आहे. परंतु सध्या बाजारात विकत मिळणाऱ्या मेहेंदी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स आणि केसांसाठी हानिकारक रंग मिसळले असतात. या विकतच्या मेहेंदीने केसांवर छान रंग तर चढतो परंतु त्यात असणाऱ्या हानिकारक घटकांमुळे केसांना फायद्याऐवजी नुकसान (Mehendi color with curry leaves, aloe vera, and Mehendi Leaves) होण्याची भीती असतेच. यासाठीच, केसांचे आरोग्य व सौंदर्य नैसर्गिकरित्या जपायचे असेल तर आपण मेहेंदी ऐवजी काही नैसर्गिक पदार्थांच्या मदतीने केसांचा छान रंग देऊ शकतो. या खास घरगुती (Ayurvedic mehendi paste for hair) उपायाच्या मदतीने केसांवर फक्त रंगचं चढत नाही तर केसांच्या समस्या कमी होऊन ते अधिकच सुंदर व आकर्षक दिसू लागतात. केसांसाठी हानिकारक मेहेंदी वापरण्याऐवजी आपण कोणते नैसर्गिक घटक वापरु शकतो ते पाहूयात. 

केसांसाठी हानिकारक मेहेंदी नको मग करा हा नैसर्गिक उपाय... 

केसांसाठी हानिकारक मेहेंदी वापरायची नसेल तर आपण त्याऐवजी एक खास घरगुती आयुर्वेदिक उपाय करु शकतो. हा खास घरगुती उपाय beautifulyoutips या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला प्रत्येकी कपभर मेहंदीची ताजी पाने, एलोवेरा जेल, कडीपत्त्याची पाने व ४ ते ६ टेबलस्पून लिंबाचा रस इतक्या पदार्थांची गरज लागणार आहे. 

नेमका उपाय काय आहे ? 

एका मोठ्या बाऊलमध्ये ताजी, हिरवीगार मेहंदीची पाने घेऊन त्यात एलोवेरा जेल सालीसकट घालावे. त्यानंतर त्यात कडीपत्त्याची पाने व लिंबाचा रस घालावा. आता हे सगळे मिश्रण एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात भरुन गरजेनुसार त्यात थोडे पाणी घालून पातळ अशी पेस्ट तयार करून घ्यावी. 

केस अचानकच पांढरे व्हायला लागलेत? ‘हे’ घरगुती तेल ठरते असरदार, केसांचं पांढरं होणं ‌थांबवतं...

अथिया शेट्टी केसांना लावते तिच्या आईने तयार केलेलं हे पारंपरिक तेल! म्हणून तिचे केस दाट-लांबसडक...

याचा वापर कसा करावा ?

मिक्सरमध्ये वाटून घेतलेली तयार पेस्ट ब्रशच्या मदतीने केसांवर व्यवस्थित लावून घ्यावी. त्यानंतर किमान ३ तास ही पेस्ट केसांवर तशीच राहू द्यावी. मग स्वच्छ पाण्याने केस धुवून घ्यावेत. दुसऱ्या दिवशी एखाद्या सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यावेत. सर्वात विशेष म्हणजे हा उपाय घरातील लहान मुलांपासून वयोवृद्ध देखील करु शकतात, सर्वच वयोगटांतील व्यक्तींसाठी हा उपाय फायदेशीर ठरतो. आजकाल लहान वयातच मुलांचे केस पिकू लागतात तेव्हा हा उपाय असरदार ठरतो. 

ओपन पोर्समुळे चेहरा म्हातारा दिसतोय, करा गुलाब पाकळ्यांचा हा उपाय, चेहरा दिसेल गुलाबी गुलाबासारखा...

हा उपाय करण्याचे फायदे... 

१. मेहेंदीची पाने :- मेहेंदीची पाने केसांना नैसर्गिक रंग देऊन केस मऊ आणि मुळांपासून मजबूत बनवतात.

२. एलोवेरा जेल :- केसांची कोरडेपणा दूर करुन नैसर्गिक चमक वाढवते.

३. कडीपत्त्याची पाने :- कडीपत्त्याची पाने केसांचा रंग अधिक गडद करण्यास आणि अकाली पांढरे होणारे केस कमी करतात.

४. लिंबाचा रस :- लिंबाचा रस डॅंड्रफ कमी करतो आणि केसांच्या मुळांतील साचलेली घाण काढतो.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय