Lokmat Sakhi >Beauty > कोंड्यामुळे टाळूला खाज येते- जखमा होतात-खपल्या धरतात? केस धुण्यापूर्वी १ काम करा, कोंडा जाणारच

कोंड्यामुळे टाळूला खाज येते- जखमा होतात-खपल्या धरतात? केस धुण्यापूर्वी १ काम करा, कोंडा जाणारच

dandruff remedy: Hair care Tips: itchy scalp treatment: आपल्याला वारंवार कोंड्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असेल तर आपली ही एक चूक यासाठी जबाबदार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2025 09:05 IST2025-08-12T09:00:00+5:302025-08-12T09:05:01+5:30

dandruff remedy: Hair care Tips: itchy scalp treatment: आपल्याला वारंवार कोंड्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असेल तर आपली ही एक चूक यासाठी जबाबदार आहे.

natural home remedy to remove dandruff before washing hair how to treat itchy scalp and scabs caused by dandruff | कोंड्यामुळे टाळूला खाज येते- जखमा होतात-खपल्या धरतात? केस धुण्यापूर्वी १ काम करा, कोंडा जाणारच

कोंड्यामुळे टाळूला खाज येते- जखमा होतात-खपल्या धरतात? केस धुण्यापूर्वी १ काम करा, कोंडा जाणारच

धूळ, प्रदूषण, बुरशीजन्य संसर्ग आणि त्वचारोग यासारख्या कारणांमुळे डोक्यात कोंडा तयार होतो. (Hair care tips)यामुळे अनेकदा डोक्यात खाज लागते. कोंडा इतका वाढतो की, लहान जखमा- खपली तयार होतात. ही समस्या सध्या अनेकांमध्ये पाहायला मिळत आहे.(dandruff remedy) याचे मुख्य कारण टाळू अति कोरडी पडणे, फंगल इन्फेक्शन, धुळीचे वातावरण, चुकीची हेअर केअर पद्धत आणि अतिप्रमाणात केसांवर केमिकल्सचा वापर करणं.(scabs on scalp treatment) इतकेच नाही तर काहीवेळा ताण-तणाव, हार्मोनल बदल किंवा पोषणाची कमतरता देखील कोंड्याला कारणीभूत ठरु शकते. (remove dandruff naturally)
केसातील कोंडा वाढला की त्याचा आपल्या त्वचेवर देखील परिणाम होतो.(ways to get rid of dandruff) अनेकदा हा कोंडा आयब्रो भोवती, डोळ्यांच्या पापण्यांवर देखील जमा होऊ लागतो. कोंडा वाढल्यास खाज सुटणे, त्वचा सोलून पडणे किंवा खपली तयार व्हायला सुरुवात होते.(itchy scalp) या खपली नखांनी काढल्यास टाळूला जखमा होतात, यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो. 

ऐन तारुण्यात केस पिकले- कोंडा झाला? तेलात मिसळा पांढरा पदार्थ, पांढरे केस होतील काळे-टाळूही होईल स्वच्छ

अनेकदा केसातील कोंडा घालवण्यासाठी अँटी-डॅन्ड्रफ शाम्पू वापरतो. पण कितीही शाम्पू लावला तरी केसांतील कोंडा काही कमी होत नाही. यामुळे टाळूला आणखी खाज येत राहते. जर आपल्याला देखील या समस्येला वारंवार सामोरे जावे लागत असेल तर आपली ही एक चूक यासाठी जबाबदार आहे. 

त्वचारोगतज्ज्ञ डॉ. जुष्या सरीन म्हणतात ज्या लोकांची टाळू जास्त प्रमाणात तेलकट असते. त्यांना कोंड्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. जर आपली टाळू तेलकट असेल तर इतरांपेक्षा जास्त डोक्यातील कोंड्याची समस्या असू शकते. डोक्यातील कोंडा हा मालासेझिया फरफर नावाच्या यीस्टमुळे होतो. हा बॅक्टेरिया तेलकट टाळूमध्ये सहज प्रवेश करतो. ज्यामुळे केसात कोंडा तयार होतो. 


जर आपली टाळू कायम तेलकट असेल तर केसांना तेल लावू नका. यामुळे डोक्यातील कोंडा कमी होण्याऐवजी अधिक वाढेल. जर केसांना तेल लावायचे असेल तर कमी प्रमाणात  लावा. टाळूचा सामान्य pH हा ५.५ असू शकतो. जर आपली pH  पातळी कमी किंवा जास्त झाली तर केसात कोंडा होतो. यासाठी आपण योग्य प्रकारचा शाम्पू निवडायला हवा. पिरोक्टोन ओलामाइन असणारा शाम्पू आपण निवडायला हवा. यामुळे टाळूचे आरोग्य निरोगी राखण्यास मदत होते. तसेच केसातील कोंडा देखील कमी होतो. 

Web Title: natural home remedy to remove dandruff before washing hair how to treat itchy scalp and scabs caused by dandruff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.