आपल्यापैकी बऱ्याचजणांना केसांच्या अनेक समस्या त्रास देतात. केसांच्या वेगवेगळ्या समस्यांपैकी केस पांढरे होणे ही फारच कॉमन समस्या आहे. वयोमानानुसार, केस पांढरे होणे हे (Oils to Reverse Grey Hair Naturally) साहजिकच आहे परंतु अकाली केस पांढरे व्हायला लागले तर अनेकींना त्याच टेंन्शन येत. डोक्यावरील (Grey hair to black hair naturally) केसांच्या रंगात असमानता दिसणं म्हणजेच वरचे केस काळे आणि आतील मूळाजवळचे केस पांढरे होणं या (Reverse grey hair with essential oils) समस्येचा अनुभव आत्तापर्यंत बऱ्याचजणींना आला असेल. केसांच्या अशा स्थितीमध्ये, केसांच्या रंगात असमानता असल्याने केस बाहेरुन काळे आणि आतून पांढरे होत जातात. यामुळे आपले केस धड काळेही नाहीत आणि धड पांढरेही दिसत नाहीत(Home remedies for grey hair with oils).
अर्ध्या केसांचा रंग काळा आणि अर्ध्या केसांचा पांढरा यामुळे आपल्याला केसांची म्हणावी तशी हेअरस्टाईलही करता येत नाही. इतकेच नाही तर या काळ्या - पांढऱ्या दोन्ही रंगांच्या शेडमुळे केसांचे सौंदर्य हरवल्यासारखे वाटते. यासाठीच, डोक्याच्या आतील भागातील केस पांढरे झाले असतील तर ते पुन्हा नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी आपण घरगुती पदार्थांच्या मदतीने एक सहजसोपा उपाय करु शकतो. विशेषतः वरचे केस काळे आणि आतल्या बाजूने म्हणजे मुळांजवळचे केस पांढरे दिसू लागले तर ते काळे करण्यासाठी करा घरगुती उपाय..
आतल्या बाजूचे म्हणजेच मुळांजवळचे केस पांढरे दिसू लागले तर...
केसांच्या बाबतीत, विशेषतः वरचे केस काळे आणि आतल्या बाजूने म्हणजे मुळांजवळचे केस पांढरे दिसू लागले तर ते नैसर्गिकरित्या पुन्हा काळेभोर करण्यासाठी हा खास घरगुती उपाय आहे. केस काळे करण्याचा घरगुती उपाय healthflashy या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. डोक्याच्या आतल्या भागातील केस काळे करण्यासाठी आपल्याला प्रत्येकी २ टेबलस्पून मेथी दाणे, कलोंजी, ४ ते ५ बदाम, १ टेबलस्पून आवळा पावडर, १ कप तिळाचे तेल इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
ओपन पोर्समुळे चेहरा म्हातारा दिसतोय, करा गुलाब पाकळ्यांचा हा उपाय, चेहरा दिसेल गुलाबी गुलाबासारखा...
अंडरआर्म्स खूप काळेकुट्ट झालेत? स्वयंपाक घरातील ४ पदार्थ लावा, काळपटपणा होईल कमी...
नेमका उपाय काय आहे ?
सगळ्यातआधी एका पॅनमध्ये प्रत्येकी २ टेबलस्पून मेथी दाणे, कलोंजी घालावी. त्यानंतर त्यात ४ ते ५ बदाम, १ टेबलस्पून आवळा पावडर घालावी. आता हे सगळे मिश्रण एकत्रित मंद आचेवर भाजून घ्यावे. या संपूर्ण मिश्रणाचा रंग जोपर्यंत बदलून पूर्णपणे काळा होत नाही तोपर्यंत हे मिश्रण भाजून घ्यावे. मिश्रणाचा रंग काळा झाल्यावर ते एका बाऊलमध्ये काढून घ्यावे. मिश्रण गार झाल्यावर त्यात त्यात तिळाचे तेल घालून चमच्याने हलवून मिक्स करून घ्यावे.
याचा वापर केसांवर कसा करावा ?
हे तेल एका काचेच्या हवाबंद बाटलीत भरुन स्टोअर करुन ठेवावे. आपण एकदा तयार केलेलं तेल महिनाभर वापरु शकतो. रात्री झोपण्यापूर्वी हे तेल केसांवर लावून घ्यावे. रात्रभर तसेच ठेवावे दुसऱ्या दिवशी सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यावेत. या उपायामुळे मुळांजवळचे पांढरे केस पुन्हा नैसर्गिकरित्या काळे होतात.
अथिया शेट्टी केसांना लावते तिच्या आईने तयार केलेलं हे पारंपरिक तेल! म्हणून तिचे केस दाट-लांबसडक...
हे तेल वापरण्याचे फायदे...
१. मेथी दाणे :- केसांच्या मुळांना पोषण देऊन अकाली पांढरे केस काळे करण्यास मदत करतात.
२. कलोंजी :- केसांची वाढ सुधारून पांढरे केस हळूहळू काळे करण्यास उपयुक्त ठरते.
३. बदाम :- केसांना आतून पोषण देऊन त्यांचा नैसर्गिक काळा रंग टिकवून ठेवण्यास मदत करतात.
४. आवळा पावडर :- आवळा पावडर मधील व्हिटॅमिन 'सी' आणि अँटीऑक्सिडंट्समुळे केस पुन्हा काळे होण्यास मदत होते.
५. तिळाचे तेल :- केसांना खोलवर पोषण देऊन त्यांची रंगत आणि चमक टिकवते तसेच पांढरे केस कमी होतात.