सध्या आपल्यापैकी बऱ्याचजणींना केसांच्या अनेक लहान - मोठ्या समस्या सतावतात. केसांच्या अनेक समस्यांपैकी केस फार मोठ्या प्रमाणात गळणे किंवा टक्कल पडणे (Natural Hair Loss Remedy Ayurvedic Morning Tonic for Strong and Healthy Hair) या दोन अगदीच कॉमन समस्या खूप त्रास देतात. केस दररोज भरपूर प्रमाणांत गळून डोक्यावरील केसांचे प्रमाण हळूहळू कमी होईल की काय अशी भीती अनेकींना सतावते. ऐन तारुण्यात (Best Natural Tonic for Hair Regrowth) जर अशा पद्धतीने केसगळती झाली किंवा टक्कल दिसू लागले तर अनेकदा लाजिरवाणे वाटते. आजकाल अगदी तरुण वयातही केस गळती आणि टक्कल पडण्याच्या समस्या झपाट्याने वाढत आहेत( Natural Hair Growth Remedy Drink : Morning Ayurvedic Drink to Stop Hair Loss).
सततचा ताण, झोपेचा अभाव, चुकीचे हेअर प्रॉडक्ट्स आणि अपूर्ण आहार यामुळे केसांची मूळ कमकुवत होतात आणि हळूहळू डोक्यावरील केस विरळ होऊ लागतात. या समस्येकडे वेळीच योग्य लक्ष दिले नाही तर भरपूर केस गळती होऊन कायमस्वरूपी टक्कल पडण्याची शक्यता असते. यासाठीच, केसगळती व टक्कल पडण्याची समस्या दूर करण्यासाठी घरगुती आणि आजीबाईच्या बटव्यातील खास आयुर्वेदिक उपाय करुन पाहू शकतो. केसगळती व टक्कल पडण्याच्या समस्येवर प्राचीन, आयुर्वेदिक घटक साजूक तूप व अश्वगंधा फायदेशीर ठरतात. अश्वगंधा पावडर आणि साजूक तूप यांचे एकत्रित मिश्रण केसगळती व टक्कल पडण्याच्या समस्येवर अतिशय गुणकारी व नैसर्गिक उपाय ठरतो. केसांच्या समस्येवर हा उपाय नेमका काय ते पाहा...
केसगळती व टक्कल पडलं तर करा हा आजीबाईच्या बटव्यातील उपाय...
केसगळती व टक्कल पडण्याच्या समस्येवर खास घरगुती उपाय divinomhealing या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला चमचाभर साजूक तूप, अश्वगंधा पावडर आणि ७ ते ८ केशर काड्या इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
करायचं काय ते पाहा...
रोज सकाळी एक चमचा साजूक तूपामध्ये, थोडं केशर आणि अश्वगंधा पावडर मिसळून घ्या. आता हे मिश्रण हलक्या कोमट पाण्यासोबत प्या. या उपायामुळे फक्त केसांनाच नव्हे, तर संपूर्ण शरीराला देखील पोषण मिळते. यामुळे शरीरातील सर्व धातू संतुलित राहतात, जे शरीराच्या एकूण आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. या उपायाने केसांची मुळे मजबूत होतात आणि हेअर ग्रोथ सुधारते.
आणा बेकिंग सोडा, विसरा केसातला कोंडा! बेकिंग सोड्यासह ३ पदार्थ मिसळून केसांना लावा, कोंडा गायब...
बिनपैशांचा घरगुती उपाय-‘या’ पांढऱ्या फुलांची जादू-चेहऱ्यावरचे ओपन पाेर्स करते गायब...
आजीबाईच्या बटव्यातील खास उपाय करण्याचे फायदे...
१. साजूक तूप :- साजूक तुपामध्ये व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के यांसारखे महत्त्वाची जीवनसत्त्व तसेच आरोग्यदायी फॅटी अॅसिड्स भरपूर प्रमाणात असतात, जे केसांना पोषण देण्याचं मुख्य काम करतात. साजूक तुपामध्ये असे अनेक पोषक घटक असतात जे केसांना मजबूत, चमकदार आणि दाट बनवण्यासाठी उपयोगी ठरतात. यामुळे केसांचा पोत सुधारतो, केसगळती कमी होते आणि केस अधिक निरोगी दिसू लागतात.
२. अश्वगंधा :- अश्वगंधा पावडर हेअर फॉलिकल्सना होणाऱ्या नुकसानावर नियंत्रण ठेवते, त्यामुळे केसांची मुळे मजबूत राहतात. याशिवाय, अश्वगंधा रक्तातील कोर्टिसोलचं प्रमाण कमी करण्यात मदत करते, यामुळे तणावामुळे होणारी केसगळती देखील कमी होते.
३. केशर :- केशरमध्ये असणारे ॲण्टीऑक्सिडंट्स केसगळती थांबवतात, केसांची वाढ करतात आणि टाळूला निरोगी ठेवण्यास मदत करतात. केशरमुळे केसांची मुळे मजबूत होतात, केस अधिक चमकदार आणि दाट दिसतात. त्यामुळे केशराचा वापर केसांसाठी खूपच उपयुक्त ठरतो.