Join us

गुडघ्यापर्यंत वाढतील केस, आठवड्यातून २ वेळा लावा 'हे' तेल! केस होतील काळेभोर-लांबसडक-सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2025 12:53 IST

Hair growth oil: Natural hair growth remedy: How to grow long hair fast: काही घरगुती उपाय किंवा तेल लावल्यास केसगळती थांबेल आणि केस भराभर वाढण्यास मदत होईल.

बदलते हवामान, प्रदूषण, चुकीचा आहार, अपुरी झोप आणि ताण यांचा आपल्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम होतो. (Hair falls issue ) ज्यामुळे सगळ्यात आधी केसगळतीच्या समस्या वाढतात. हल्ली केसगळतीची समस्या सामान्य वाटत असली तरी तिचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होत असतो.(Hair care Tips) केसगळतीच्या समस्यांमुळे केस विरळ होऊन तुटतात. ज्यामुळे टक्कल पडण्याची शक्यता अधिक असते.(Hair oil) केसगळती रोखण्यासाठी आपण अनेक औषधोपचार, शाम्पू, कंडिशनर सारखी उत्पादने केसांसाठी वापरतो. ज्यामुळे केसगळती कमी होण्याऐवजी ती अधिक वाढते.(Hair growth oil) केसांना जितके बाहेरुन पोषण महत्त्वाचे आहे. तितकेच ते आतून देखील गरजेचे आहे. परंतु केसांसाठी अनेक महागडे उत्पादने वापरुन देखील काही उपयोग होत नाही.( Natural hair growth remedy) अशावेळी काही घरगुती उपाय किंवा तेल लावल्यास केसगळती थांबेल आणि केस भराभर वाढण्यास मदत होईल. 

फक्त १ पिकलेलं केळ करते खराटा झालेल्या कोरड्या केसांवर जादू, केस होतील मऊमऊ रेशमासारखे

केसगळती होण्यामागे अनेक कारणे आहेत. ज्यात आनुवांशिक, हार्मोन्स बदल, वैद्यकीय समस्या, औषधे, ताण आणि शरीराला पुरेसे पोषण तत्व न मिळणे. यामुळे केसगळती अधिक प्रमाणात वाढते. कंटेंट क्रिएटर दिव्या मलिकने केसांची वाढ वाढवण्यासाठी इंस्टाग्रामवर घरगुती तेलाची रेसिपी शेअर केली आहे. केस मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्या वाढीसाठी तेल खूप महत्त्वाचे आहे असे ती म्हणते. तिने तिच्या लांब, काळ्याभोर केसांचे सिक्रेट शेअर केले आहे. आठवड्यातून २ वेळा हे तेल केसांना लावल्याने केसांची वाढ होईल. 

केसगळती रोखण्यासाठी आवळा, कडुलिंबाची पाने, कढीपत्ता, कोरफड, जास्वंदीची फुले, मेथीचे दाणे, कलोंजी आणि रोझमेरीची पाने यांसारखे घटक वापरा. आपल्याला केस मजबूत, जाड, रेशमी आणि गुळगुळीत करायचे असतील. तर फ्रेश आवळा, कडुलिंबाची पाने, कढीपत्ता आणि कोरफडीचा गर मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पेस्ट करा. त्यानंतर आपल्याला मेथी आणि कलोंजीच्या बियांची बारीक पावडर करावी लागेल. या सर्व गोष्टी नारळाच्या तेलात मिक्स करा. हे तेल मंद आचेवर चांगले शिजू द्या. थंड झाल्यानंतर गाळून बाटलीत भरा. आठवड्यातून दोन वेळा हे तेल केसांना लावल्याने केस अधिक मजबूत आणि जाड होतील. तसेच केसांची वाढ होण्यास मदत होईल. हे तेल आपण केसांच्या टाळूवर लावायला हवे. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी