सध्याच्या धावपळीच्या, बिझी लाईफस्टाईलमध्ये केस पांढरे होणे ही समस्या खूपच कॉमन झाली आहे. पांढऱ्या केसांमुळे अनेकांना लाजिरवाणे वाटते किंवा केस पांढरे झाले म्हणून ते लपवण्याचा प्रयत्न देखील करतो. आपल्यापैकी बरेचजण पांढऱ्या केसांवर झटपट आणि इन्स्टंट उपाय म्हणून रासायनिक हेअर डायचा वापर करतात. पण असे हेअर डाय दीर्घकाळ वापरल्यास केसांची मूळ कमकुवत होतात त्यांचे आरोग्य बिघडते आणि त्यामुळे केस गळणे किंवा स्काल्पला ॲलर्जी होणे यांसारख्या समस्या वाढू शकतात. केसांना रंग देण्यासाठी बाजारात मिळणारे आर्टिफिशियल हेअर डाय जरी आकर्षक दिसत असले तरी, त्यातील केमिकल्समुळे केस कोरडे पडणे, गळणे किंवा स्काल्प पांढरी होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे केस नैसर्गिक पद्धतीने रंगवणे हा आज अनेकांसाठी सर्वात सोपा आणि उपयोगी पर्याय ठरत आहे(home remedies to colour grey hair).
केसांसाठी हानिकारक, महागडे हेअर डाय वापरण्याऐवजी आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक नैसर्गिक पदार्थ आहेत, ज्यांचा वापर करून आपण केस काळे, मजबूत आणि चमकदार करु शकतो. हे घरगुती उपाय केसांना फक्त नैसर्गिक रंगच देत नाहीत, तर केसांना खोलवर पोषण देऊन त्यांचे आरोग्य सुधारतात. घरच्याघरीच सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थांपासून तयार केलेला हेअर डाय केसांसाठी वापरणे कधीही फायदेशीरच ठरते. केसांसाठी घरातीलच नैसर्गिक पदार्थांच्या मदतीने हेअर डाय (how to make natural hair colour at home) कसा तयार करायचा ते पाहूयात.
केसांसाठी फायदेशीर हेअर डाय...
१. कॉफी :- बहुतेकवेळा पांढरे केस काळे करण्यासाठी आपण केसांवर मेहेंदी लावतो. परंतु आपण मेहेंदी सोबतच चमचाभर कॉफी पावडर केसांना लावून देखील पांढऱ्या केसांना अधिक डार्क रंग देऊ शकता. केसांसाठी कॉफीचा हेअर डाय तयार करण्यासाठी सर्वात आधी, एका भांड्यात एक कप कोमट पाणी घेऊन त्यात चमचाभर कॉफी पावडर घालावी, जेव्हा पाणी थंड होईल, तेव्हा त्यात मेंदी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट तासभर तशीच ठेवून द्यावी. तासाभरानंतर त्यात चमचाभर ऑलिव्ह ऑईल मिसळा. आता या मिश्रणाला एका भांड्यात झाकून तासभर ठेवा. तासाभरानंतर तयार पेस्ट केसांवर लावावी. यामुळे सफेद केसांना कॉफीचा नैसर्गिक रंग येईल.
२. एलोवेरा जेल :- एलोवेरा जेल देखील पांढऱ्या केसांना रंग देण्याचा एक उत्तम उपाय आहे. यामुळे केसांच्या मुळांना मजबूती मिळते. एलोवेरा जेलमुळे पांढरे केस काळे करता येतात तसेच केसांना योग्य पोषण देखील मिळते. जर तुमचे केस नुकतेच सफेद होण्यास सुरुवात झाली असेल तर हा उपाय फायदेशीर ठरु शकतो. या उपायासाठी, एका भांड्यात एलोवेरा जेल घ्या. या कोरफड जेलमध्ये लिंबाचा रस मिसळा. ही पेस्ट कुठल्याही सफेद केसांवर लावा आणि अर्धा तास तशीच राहू द्या. असे आठवड्यातून फक्त २ ते ३ वेळा करा यामुळे नैसर्गिकरित्या पांढरे केस काळे होण्यास मदत मिळते.
३. कडीपत्ता :- कडीपत्ता फक्त जेवणाची चवच वाढवत नाही, तर केस काळे करण्याचे काम देखील करतो. कडीपत्त्याची पाने केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. या उपायासाठी कडीपत्ता चांगल्या प्रकारे बारीक करायचा आहे. आता २ चमचे आवळा पावडर आणि २ चमचे भृंगराज पावडर मिसळून एक जाडसर अशी पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट केसांवर लावा आणि एक तास तशीच राहू द्या. एक तासानंतर केस साध्या पाण्याने धुवा. तुम्हाला याचा लवकरच फरक दिसेल. यामुळे तुमचे केस काळे आणि चमकदार दोन्ही होतील. आठवड्यातून किमान ३ ते ४ वेळा हा उपाय करणे फायदेशीर ठरते.
